मराठी बातम्या /बातम्या /heatlh /कोरोनानंतर Monekypox या नव्या संकटाची चाहूल, जाणून घ्या काय आहेत लक्षणं

कोरोनानंतर Monekypox या नव्या संकटाची चाहूल, जाणून घ्या काय आहेत लक्षणं

गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या ( Coronavirus Pandemic) संकटातून जग अद्याप बाहेर पडलेलं नाही. कोरोनाचं सावट कायम असतानाच 'मंकीपॉक्स' (Monkeypox) या आजाराची चाहूल लागली आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या ( Coronavirus Pandemic) संकटातून जग अद्याप बाहेर पडलेलं नाही. कोरोनाचं सावट कायम असतानाच 'मंकीपॉक्स' (Monkeypox) या आजाराची चाहूल लागली आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या ( Coronavirus Pandemic) संकटातून जग अद्याप बाहेर पडलेलं नाही. कोरोनाचं सावट कायम असतानाच 'मंकीपॉक्स' (Monkeypox) या आजाराची चाहूल लागली आहे.

  मुंबई, 19 मे : गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या ( Coronavirus Pandemic) संकटातून जग अद्याप बाहेर पडलेलं नाही. कोरोनाचं सावट कायम असतानाच  'मंकीपॉक्स' (Monkeypox) या आजाराची चाहूल जगाला लागली आहे. यापूर्वी 2021 साली ब्रिटनमध्ये या आजाराचे काही रूग्ण आढलले होते. त्यानंतर आता अमेरिकनं या आजारानं डोकं वर काढलं आहे. कोरोनानंतर कोणत्याही आजारासंबधी माहिती ही सर्वांची काळजी वाढवणारी असते. या प्रकारच्या आजाराबाबत अनेक समजुती या वेगानं पसरतात. मंकीपॉक्सबाबत अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत. न्यूज 18नं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहे.

  मंकीपॉक्स म्हणजे काय?

  मंकीपॉक्स हा एक विषाणू (Virus) आहे. स्मॉल पॉक्स व्हायरस फॅमिलीमध्ये याचा समावेश होतो. ज्याची लागण झाल्यामुळे ताप (Fever) येऊन अंगावर विचित्र झुबकेदार पुरळ (Bumpy Rash) दिसू लागतात. सहसा सौम्य समजल्या जाणाऱ्या या विषाणूचे दोन मुख्य स्ट्रेन आहेत. पहिला म्हणजे काँगो स्ट्रेन (Congo Strain) आणि दुसरा वेस्ट आफ्रिकन स्ट्रेन (West African Strain). यापैकी काँगो स्ट्रेन हा अधिक गंभीर आहे. या स्ट्रेनमधील (Fatality Rate) मृत्यूदर 10 टक्क्यांपर्यंत आहे. तर, वेस्ट आफ्रिकन स्ट्रेनमधील मृत्यूदर 1 टक्क्यांच्या आसपास आहे. ब्रिटनमध्ये आढळलेले रुग्ण हे वेस्ट आफ्रिकन स्ट्रेनचे आहेत.

  'आतापर्यंच्या अभ्यासातून असं निदर्शनास आलं आहे की, आफ्रिका खंड वगळता बाहेर याची खूप कमी प्रकरणं नोंदवली गेली होती. आतापर्यंत फक्त आठ वेळा या प्रकराचे रूग्ण आढळले आहेत.  ही अतिशय असामान्य गोष्ट आहे,' अशी माहिती लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (London School of Hygiene and Tropical Medicine) येथील आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य (International Public Health) विषयाचे प्राध्यापक जिमी व्हिटवर्थ (Jimmy Whitworth) यांनी रॉयटर्सला दिली आहे.

  थायरॉईड असल्यास शरीरात होतात 'हे' बदल, चुकूनही करु नका दुर्लक्ष

  कुठे आढळले रूग्ण?

  पोर्तुगालमध्ये (Portugal) पाच कन्फर्म केसेसची नोंद झाली आहे.  स्पेनमध्ये (Spain) 23 संभाव्य प्रकरणांची टेस्ट घेतली गेली आहे. या दोन्ही देशांमध्ये यापूर्वी कधीच मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले नव्हते. दरम्यान, अमेरिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी (US Health Officials) दिलेल्या माहितीनुसार, मॅसॅच्युसेट्समधील (Massachusetts) एक व्यक्तीची मंकीपॉक्स टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. युनायटेड स्टेट्समध्ये हा दुर्मिळ विषाणू सापडण्याची या वर्षातील ही पहिलीच घटना आहे. मॅसॅच्युसेट्स डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थच्या (Massachusetts Department of Public Health) म्हणण्यानुसार, मंकीपॉक्स झालेला रूग्ण एक प्रौढ पुरुष असून तो नुकताच कॅनडाला गेला होता. मंगळवारी एजन्सीद्वारे त्याची प्रारंभिक चाचणी केली गेली होती. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानंही याला दुजोरा दिला आहे.

  ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सची नऊ प्रकरणं नोंदवली गेली आहेत. यातील बहुतेक रुग्ण गे किंवा बायसेक्शुअल (Bisexual) पुरुष आहेत. मंकीपॉक्स कुठल्या विशिष्ट देशातून पसरला असं आता स्पष्टपणे सांगता येणार नाही असं अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. सध्या फक्त या रोगाची लागण झालेले रुग्ण सापडत आहेत पण त्यांना त्याची लागण कुठे झाली याबद्दल तपास केला जात आहे. या आजारासंबंधी इतर काही माहितीही सध्या उपलब्ध नसल्याचं या रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.

  'आम्ही विशेषतः गे आणि बायसेक्शुअल असलेल्या पुरुषांना शरीरावरील पुरळ किंवा जखमांबद्दल जागरूक राहण्यास सांगितलं आहे. त्वचेमध्ये काही बदल दिसल्यास तत्काळ लैंगिक आरोग्य सेवेशी (Sexual Health Service) संपर्क साधण्याचं आवाहन करत आहोत', अशी माहिती यूकेएचएसएच्या (UKHSA) मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. सुझान हॉपकिन्स (Dr Susan Hopkins) यांनी दिली.

  श्रीमंतांनाही कंगाल करतो हा 'आजार'; ज्यावर जगातील सर्वात महाग औषधानेच होतो उपचार

  कसा पसरतो मंकीपॉक्स?

  हा विषाणू रुग्णाच्या जवळून संपर्कात आल्यास पसरतो. हे प्रमाण प्राण्यांमध्ये जास्त तर मानवांमध्ये कमी आहे. 1958 मध्ये प्रथम माकडांमध्ये (Monkeys) हा व्हायरस आढळला होता. म्हणून त्याला मंकीपॉक्स हे नाव देण्यात आलं. त्याची सुरुवात माकडांपासून झाली असली तरी आता उंदीरवर्गीय (Rodents) प्राणी हे त्याचे मुख्य प्रसारक असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, आता सुरू झालेलं ट्रान्समिशन (Transmission) तज्ज्ञांना गोंधळात टाकणारं आहे. कारण, युनायटेड किंग्डममध्ये 18 मे पर्यंत सापडलेल्या नऊ रुग्णांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं आतापर्यंतच्या अभ्यासात निदर्शनास आलं आहे. फक्त 6 मे रोजी आढळलेला पहिला रुग्ण नुकताच नायजेरियाला जाऊन आला होता.

  या आजारातील काही केसेसची नोंद  (Unreported Cases) राहिल्या तर मंकीपॉक्सचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ब्रिटनमधीस आरोग्य सुरक्षा विभागानंही याबाबत खास अलर्ट दिला आहे. सध्या सापडलेले बहुतेक रुग्ण बायसेक्शुअल, गे किंवा पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञ आता व्हायरस सिक्वेन्सचा अभ्यास करत आहेत. जेणेकरून या रुग्णांचा एकमेकांशी संबंध आहे की नाही, हे लक्षात येईल.

  भारताला किती धोका?

  भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. ब्रिटन आणि अमेरिकेत सापडलेल्या रुग्णसंख्येला या आजाराचा उद्रेक म्हणता येईल की नाही याबद्दल तज्ज्ञांमध्ये दुमत आहे. शिवाय, हा आजार कसा पसरतो आणि संसर्ग वाढतो की नाही याचा रिसर्चदेखील अद्याप बाकी आहे.

  प्लास्टिक सर्जरीत शरीरात टाकलेल्या प्लास्टिकचं पुढे काय होतं? वाचून बसेल धक्का!

  आत्ताच का?

  कोविड निर्बंध (Covid Restrictions) उठल्यामुळे प्रवासाचं प्रमाण पुन्हा एकदा वाढलं आहे. मंकीपॉक्स प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागील हे एक संभाव्य कारण असू शकतं. प्राध्यापक जिमी व्हिटवर्थ (Jimmy Whitworth) म्हणाले, 'माझा वर्क थिअरीनुसार पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत याबद्दल बरेच काही आढळले. आता प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे आता मंकीपॉक्सची जास्त प्रकरणं निदर्शनास येत आहेत. मंकीपॉक्स हा व्हायरस देवीचा आजार (Smallpox) गटातील असल्यामुळे व्हायरॉलॉजिस्ट (Virologists) जास्त सतर्क झाले आहेत.

  1980 मध्ये लसीकरणाद्वारे देवीच्या आजाराचा नायनाट करण्यात आला होता. तीच लस मंकीपॉक्सपासूनही संरक्षण करते. देवीचा  प्रसार संपल्यानंतर लसीकरण थांबवण्यात आलं. लसीकरण मोहीम बंद झाल्यामुळे मंकीपॉक्सच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असं मत कॅलिफोर्नियातील यूसीएलए येथील एपिडेमिऑलॉजीच्या (Epidemiology) प्राध्यापक अ‍ॅन रिमोइन (Anne Rimoin) यांनी व्यक्त केलं.मंकीपॉक्सच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असली तरी लोकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Covid-19, United kingdom, United States of America