Home /News /lifestyle /

श्रीमंतांनाही कंगाल करतो हा 'आजार'; ज्यावर जगातील सर्वात महाग औषधानेच होतो उपचार

श्रीमंतांनाही कंगाल करतो हा 'आजार'; ज्यावर जगातील सर्वात महाग औषधानेच होतो उपचार

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Shutterstock)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Shutterstock)

हा असा आजार आहे, ज्यावरील औषध जगातील सर्वात महाग औषध आहे. कित्येकांना ते परवडणारंच नाही.

मुंबई, 19 मे : जगात अनेक प्रकारचे आजार आहेत. कोरोनानंतर (Corona Virus) सर्दी-खोकलादेखील एवढा भयंकर असू शकतो हे सगळ्या जगाने अनुभवलं आहे. पूर्वतयारी असली तर काही आजारांचा सामना करणं आपल्याला सोपं जातं; मात्र काही आजारांच्या बाबतीत असं होत नाही. काही आजार दीर्घ काळ आपली पाठ सोडत नाहीत आणि त्यामुळे शरीराचं अतोनात नुकसान होतं; पण आज आम्ही तुम्हाला ज्या आजाराबद्दल सांगणार आहोत, त्यामुळे शारीरिक नुकसान तर होतंच, पण श्रीमंत व्यक्तीदेखील गरीब होऊ शकतात. कारण हा आजार जगातल्या सर्वांत महागड्या औषधानेच (Expensive Medicine) बरा होऊ शकतो. भारतीय चलनानुसार या औषधाची किंमत सुमारे 18 कोटी रुपये आहे. स्पायनल मस्क्युलर अ‍ट्रॉफी (Spinal Muscular Atrophy) असं या आजाराचं नाव आहे. हा जगातला सर्वांत महागडा आजार आहे. स्पायनल मस्क्युलर अ‍ट्रॉफी या आजाराचा थेट परिणाम पाठीच्या कण्यावर होतो. या आजारामध्ये सर्वप्रथम पाठीच्या कण्याला खूप त्रास होतो. या आजारात रुग्णाच्या शरीरात स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची कमतरता असते. त्यामुळे रुग्णाला उभं राहता येत नाही आणि बसतादेखील येत नाही. या रुग्णाला चालणं अवघड जातं आणि कोणतंही काम करताना खूप त्रास होतो. बहुतेक केसेसमध्ये पाठीचा कणा वाकडा होतो. शरीरात कंपन सुरू होतं आणि त्याला खोकणंदेखील अवघड जातं. हे वाचा - ऐकावं ते नवल! ज्या बाळाला जन्म दिला त्याच बाळामुळे पुन्हा प्रेग्नंट झाली महिला काही काळापूर्वीपर्यंत या आजारावर कोणतेही उपचार उपलब्ध नव्हते; मात्र अलीकडेच या आजारावर उपाय असलेल्या या औषधाचा शोध लागला आहे. स्पायनल मस्क्युलर अ‍ट्रॉफी या आजाराच्या उपचारांमध्ये दिल्या जाणाऱ्या या औषधाची किंमत सुमारे 18 कोटी रुपये आहे. म्हणूनच या आजाराला जगातला सर्वांत महागडा आजार असं म्हटलं जातं. या औषधाचं नाव झोलगेन्स्मा ( Zolgensma) असं आहे. ही एक चिनी थेरपी असून  हे औषध या आजाराच्या उपचारासाठी खूप क्रांतिकारक समजलं जातं. खूप महाग असल्यामुळे सर्वांनाच ते परवडण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे या आजाराने ग्रस्त असलेल्या अनेक व्यक्ती औषधोपचार करून घेऊ शकत नाहीत. हे वाचा - 2 मुलं होताच लठ्ठ झाली बायको; नवऱ्याने तिच्या शरीरावर 'चाकू' फिरवला आणि झाला चमत्कार या आजाराचे रुग्ण भारतातही सापडले आहेत.  या आजाराने ग्रस्त असलेल्या एका मुलीच्या उपचारासाठी जेव्हा मदत मागितली गेली, तेव्हा तिला सरकारकडून बरीच मदत मिळाली. परंतु त्यानंतरही या मुलीचे प्राण वाचवणं शक्य झालं नाही.
First published:

Tags: Health, Lifestyle, Medicine

पुढील बातम्या