Home /News /explainer /

प्लास्टिक सर्जरीत शरीरात टाकलेल्या प्लास्टिकचं पुढे काय होतं? वाचून बसेल धक्का!

प्लास्टिक सर्जरीत शरीरात टाकलेल्या प्लास्टिकचं पुढे काय होतं? वाचून बसेल धक्का!

आजच्या काळात सुंदर दिसण्यासाठी लोक प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) करून घेतात. यामध्ये ब्रेस्ट इम्प्लांटपासून (Breast Implant) हिप्स ट्रान्सप्लांटपर्यंतचा (Hips Transplant) समावेश आहे. पण तुम्ही विचार केला आहे का की मृत्यूनंतर माणसांच्या शरीरात टाकलेल्या या प्लास्टिकच्या (Dead Body After Plastic Surgery) तुकड्यांचे काय होते?

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 मे : कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री चेतना राज (chethana raj Death) यांचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्लास्टिक सर्जरीमुळे अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला. या बातमीनंतर पुन्हा एकदा कॉस्मेटिक सर्जरी चर्चेत आली आहे. प्लास्टिकचा वापर निसर्गासाठी अत्यंत घातक आहे (Harmful Effects Of Plastic). प्लास्टिक ही अशी गोष्ट आहे जी कधीही सडत नाही. यामुळे जगात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. लोकांना प्लास्टिकचा वापर कमी करण्यास सांगितले जाते. प्लास्टिक कधीच विघटित होत नाही, तर कल्पना करा की एखाद्या व्यक्तीवर प्लास्टिक सर्जरी होत असेल, तर मृत्यूनंतर त्याच्या शरीरात टाकलेले प्लास्टिक (Dead Body After Plastic Surgery) जातं कुठं? आजच्या काळात माणूस ब्रेस्ट इम्प्लांटपासून (Breast Implant) ते हिप्स ट्रान्सप्लांटपर्यंत (Hips Transplant) अनेक कॉस्मेटिक सर्जरी करतो. यामध्ये प्लास्टिकचे तुकडे शरीरात वापरले जातात. अशा स्थितीत लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याच्या शरीरात टाकलेल्या या प्लास्टिकच्या तुकड्यांचं काय होतं? काही धर्मांमध्ये मृतदेह जाळला जातो, तर काहींमध्ये मृतदेह पुरला जातो. अशा स्थितीत प्रश्न पडतो की या दोन्ही परिस्थितीत मृतदेहाच्या आत असलेल्या प्लास्टिकचे काय होत असेल? दफनभूमीतील व्यक्तीनं दिलं उत्तर युट्युबवर असलेल्या कॅटलिन दोघ्ती, लोकांना मृत्यूशी संबंधित प्रश्नांची उत्तरे ऑनलाइन देते. कॅटलिनचे YouTube वर सुमारे 1.6 लाख सदस्य आहेत. अनेकांना अंत्यसंस्कारानंतर मृतदेहांची स्थिती जाणून घ्यायची इच्छा असते. ते कॅटलिनला ऑनलाइन प्रश्न विचारतात. अशाच एका प्रश्नाचे उत्तर आता कॅटलिनने दिले आहे. अनेकांनी ऑनलाइन कॅटलिनला विचारले होते की, जर एखाद्या व्यक्तीने प्लास्टिक सर्जरी केली, तर मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील प्लास्टिकचे काय होते? Explainer : कॉस्मेटिक सर्जरी बेतली 21 वर्षीय अभिनेत्रीच्या जीवावर! कशा असतात या शस्त्रक्रिया? काय आहे जोखीम? प्लास्टिक सडत नाही कॅटलिनने सांगितले की, तिने अशा अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत ज्यांच्या शरीरात प्लास्टिक टाकण्यात आले होते. ब्रेस्ट इम्प्लांट किंवा हिप रिप्लेसमेंट केलेल्या लोकांचे मृतदेह पुरले असल्यास त्यांचा मृतदेह मातीत मिसळून जातो. पण प्लास्टिकचे तुकडे टिकून आहेत. कधीकधी हे तुकडे कुटुंबाला परत केले जातात. दुसरीकडे, प्रेत जाळल्यास त्याच्या शरीरात घातलेले धातू चुंबकाद्वारे काढून घेतले जातात. अनेक प्रकारे वापरले जाते या प्रश्नाच्या उत्तरात कॅटलिनने सांगितले की, यापूर्वी हे प्लास्टिकचे तुकडे काढून स्मशानभूमीत टाकले जात होते. पण, आता अमेरिका आणि युरोपमध्ये त्यांच्यापासून अनेक वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात. उदाहरणार्थ, ब्रेस्ट आणि हिप्समध्ये ठेवलेले प्लास्टिक वितळले जाते आणि त्यापासून विमानाचे भाग आणि कारचे भाग बनवतात. यासोबतच रस्त्यावरील फलकही तयार करण्यात आले आहेत. कॅटलिनने सांगितले की, कंपन्या यासाठी निविदा काढतात. त्या आधारे मृतदेहाचे उर्वरित भाग वापरले जातात.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Health Tips, Plastic

    पुढील बातम्या