मराठी बातम्या /बातम्या /Viral /Dream job! फक्त खा आणि झोपा; कंपनी देणार तब्बल 81 हजार रुपये पगार

Dream job! फक्त खा आणि झोपा; कंपनी देणार तब्बल 81 हजार रुपये पगार

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 29 जानेवारी : कुणी जास्त खात असेल किंवा जास्त झोपत असेल तर तुला खायला किंवा झोपायला पैसे दिले तर तू श्रीमंत होशील, असं म्हणत अनेक जण अशा व्यक्तींची थट्टा करतात. काहींना तर खरंच असा जॉब असता तर किती बरं झालं असतं, असंही वाटतं. तुमचंही तसं स्वप्न असेल तर आता ते पूर्ण होऊ शकतो. एक कंपनीच खरंच फक्त खाण्यासाठी आणि झोपण्यासाठी पैसे देत आहे.

स्लीप जंकी या कंपनीने असा ड्रिम जॉब ऑफर केला आहे. डेअरी ड्रिमर्स असं या जॉबचं नाव आहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवर याची नोटीसही दिली आहे.

ही कंपनी युरोपिअन थिएरी तपासण्यासाठी झोपेसंबंधी एक एक्सपरिमेंट करणार आहे. चीझ खाऊन झोपल्यानंतर वाईट आणि भीतीदायक स्वप्नं पडतात असं म्हटलं जातं. यात कितपत तथ्य आहे, हे पडताळणं हा स्लीप जंकीच्या या अभ्यासाचा उद्देश आहे. चीझ खाल्ल्यानंतर झोपेची गुवणत्ता, ऊर्जेच्या पातळीवर काय परिणाम होतो आणि वाईट स्वप्नांशी याचा संबंध काय हे या अभ्यासात तपासलं जाणार आहे.

हे वाचा - या पदार्थांमुळे उडते झोप आणि पडतात वाईट स्वप्न; रात्रीच्यावेळी चुकूनही खाऊ नका

या एक्सपरिममेंटसाठी कंपनीला 5 उमेदवारांची गरज आहे. जे या एक्सपरिमेंटमध्ये सहभागी होतील. या उमेदवारांना करायचं काय आहे तर फक्त चीझ खाऊन झोपायचं आहे. स्लीप टाइमरचा वापर करून झोपेची वेळ, झोपेची गुणवत्ता, ऊर्जेची पातळी, वाईट स्वप्ने याची नोंद करायची आहे.  तुम्हाला फक्त एकप्रकारचं नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे चीझ खावे लागणार आहेत. या जॉबसाठी अप्लाय करणारे आणि सिलेक्ट होणारे उमेदावर कंपनीचे चीझ टेस्टर असतील जे वेगवेगळ्या प्रकारच्या चीझची चव चाखून झोपेच्या गुणवत्तेवर काय परिणाम होतो तेसुद्धा सांगतील.

मार्चमध्ये हा प्रयोग सुरू होईल, जो तीन महिने असेल.  यासाठी तुम्हाला कामाचे आणि चीझचेही पैसे मिळणार आहेत.   हे संशोधन पूर्ण झाल्यानंतर कंपनी उमेदवाराला एक हजार डॉलर म्हणजे जवळपास 81 हजार रुपये देईल.

हे वाचा - चांगल्या आरोग्यासाठी किती तास झोप घ्यावी? विविध आजार होण्याचा धोका 30% घटतो

जो कुणी या जॉबसाठी अर्ज करणार आहे,

त्याच्याजवळ स्लिपिंग पॅटर्न ट्रॅक करण्यासाठी स्वतःचं स्मार्टवॉच असावं.

ट्रायलच्या कालावधीत उमेदवाराने एकटं झोपायचं आहे.

त्याला कोणतीही झोपेशीसंबंधित समस्या नसावी.

उमेदवाराचं वय 21 वर्षे असलं पाहिजे.

First published:

Tags: Job, Sleep, Viral