News18 Lokmat

उत्तम टीम मेंबर व्हायचं असेल तर 'हे' 7 गुण तुमच्यात असायलाच हवेत

एखाद्या संस्थेत काम करताना यशस्वी होण्यासाठी संघभावना ही अत्यंत महत्त्वाची ठरते

News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2019 05:58 PM IST

उत्तम टीम मेंबर व्हायचं असेल तर 'हे' 7 गुण तुमच्यात असायलाच हवेत

मुंबई, 12 जून : एखाद्या संस्थेत काम करताना यशस्वी होण्यासाठी संघभावना ही अत्यंत महत्त्वाची ठरते. चांगले नेतृत्व गुण तुमच्या अंगी असतील तर तुम्हाला आणि तुमच्या टीमला यशस्वी होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. एक उत्तम टीम मेंबर होण्यासाठी कोणकोणते गुण अंगी असायला हवेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एखाद्या संस्थेत काम करत असताना तुम्हाला एक उत्तम टीम मेंबर होऊन काम करायला हवं. त्यामुळे केवळ ऑफिसमधलंच वातावरण चांगलं राहतं असं नाही, तर तुमचं आणि तुमच्या सहकाऱ्यांचं काम करण्यातही मन लागतं. चांगल्या टीम मेंबरच्या अंगी काही आवश्यक गुण असायलाच हवे.

करिअर घडवायचं असेल तर आधी करा 'ही' महत्त्वाची गोष्ट

1 - स्वतःला टीमच्या अनुकूल बनवा. सर्वांच्या मदतीसाठी आणि नवनवीन कल्पना आणि विचारांसठी कायम तयार रहा. तसंच वेळोवेळी आपल्या भूमिकेचं मुल्यांकन करा.

2 - सहकार्य ही यशस्वीतेची किल्ली आहे. म्हणून उत्तम टीम मेंबर होण्यासाठी समोर येणाऱ्या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी तत्पर राहा. टीममध्ये ताळमेळ आणि सहकार्याची भूमिका ही कायम राखल्यात निश्चितच तुम्हाला यश मिळतं.

Loading...

3 - प्रत्येक टीम मेंबरने आपल्या कामाशी नेहमी बांधिलकी जपायला हवी. आपल्या क्षमतेच्या शंभर टक्के देण्यासाठी नेहमी तत्पर असायला हवं. कारण चालढकर करत केलेल्या कामात कधीच यश मिळत नाही.

4 - टीमचं नेतृत्व करणाऱ्यांच्या अंगी कौशल्य असायला हवं. म्हणजेच फक्त आपण स्वतः सक्षम होणं असं नव्हे, तर आपल्या कौशल्याने संघातील प्रत्येक सदस्याला प्रोत्साहित करता यायला हवं.

5 - टीममधील प्रत्येक सदस्यात केवळ जबाबदारीच असायला हवी असं नाही, तर प्रत्याक सदस्यांत निर्णय घेण्याची कुवत असायला हवी. अशी व्यक्तीच विश्वसनीय असते.

माणसं ओळखायला नाही, तर समजायला शिका

6 - जे काम तुम्हाला प्रत्यक्षात करण्याची इच्छा नसेल, पण ते पूर्ण करण्यासाठी जी जबाबदारी तुम्ही स्वीकारता त्यालाच शिस्त असं म्हणता येईल. आपले विचार, भावना आणि प्रत्यक्ष काम यांच्यात अनुशासन ठेवलं तरच तुम्ही एक चांगले टीम मेंबर म्हणून स्वतःला सिद्ध करू शकता.

7 - अधिकाऱ्यांशी आणि सहकाऱ्यांशी तुमचा संवाद हा स्पष्ट आणि खेळीमेळीचा असायला हवा. यामुळे कोणतही काम करताना तुमच्यावर अतिरिक्त ताण निर्माण होत नाही. हसत खेळत तुम्ही ते पूर्ण करता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Jun 12, 2019 05:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...