अनेकांना अशी समस्या असते की, दिवसभर ते अर्धे झोपेतच असतात. त्याचं खर कारण म्हणजे रात्री पूर्ण झोप न होणं. माणसाला किमान 8 तासाची झोप गरजेची असते. पण अनेकांची झोप अर्धवट होते. ज्येष्ठ नागरिक या समस्येने जास्त त्रासलेले असतात. आज आम्ही तुम्हाला अशा लोकांबद्दल सांगणार आहोत ज्यांना रात्री झोप येत नाही.
नेहमी घड्याळ्याकडे लक्ष असणं – ज्या लोकांना रात्री झोप येत नाही त्यांचं रात्री सारखं घड्याळाकडे लक्ष असतं. अशी लोकं झोप लागावी म्हणून रात्री 9-9:30 वाजताच झोपून जातात. पण झोप न येण्याच्या सवयीमुळे तासा दोन तासातच त्यांची झोप मोडते. एकदा का झोपमोड झाली की असे लोक रात्री वारंवार उठून वेळ पहातात.
बाथरुममधील पाणी बंद केलं का? – या विचारानेच अनेकांना झोप लागत नाही. त्यांना सतत असं वाटत राहतं की, बाथरुममध्ये आपण काहीतरी विसरलोय. या विचाराने त्यांना नीट झोप लागत नाही.
झोपेच्या गोळ्या घातकच – ज्या लोकांना रात्री झोप येत नाही ते नेहमी त्रासलेल्या अवस्थेत असतात. याचा उपाय म्हणून ते झोप येण्याच्या गोळ्या घेतात. रोजच या गोळ्या खाल्याने त्याची सवय होते. ही सवय जर तुम्हाला असेल तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता.
डोखेदुखीचा त्रास – तुम्हाला आवश्यक असलेली झोप जर पूर्ण झाली नाही, तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. त्यामुळे मग तुमचे डोळे लाल होतात.
वेळ निश्चित पण झोपेचं काय ? – ज्या लोकांना झोप येत नाही ते लोकं आपली झोपण्याची वेळ निश्चित करतात आणि त्यावेळी ते झोपतात देखील. पण त्यांना एक- दोन तासातच जाग येते आणि पूर्ण रात्र मग ते कूस बदलत राहतात.
पुरेसा आराम न मिळणे – अशी लोकं एका पोजीशनमध्ये कधीच झोपू शकत नाहीत. मग ते रात्रभरत कूस बदलत राहतात आणि यामुळे त्यांची झोप अर्धवट राहते.
सतत डुलकी येणे – ज्या लोकांना रात्री झोप लागत नाही त्या लोकांना दिवसा डुलकी येते. पण दिवसा ते झोपू शकत नाही.
दुसऱ्यांच्या घरी येते चांगली झोप – ज्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या घरी चांगली झोप येत नाही त्यांना दुसऱ्यांच्या घरी चांगली झोप लागते.
नेहमी चहा, कॉफी पितात – असे लोकं दिवसा झोप येऊ नये यासाठी सतत चहा आणि क़ॉफी पित असतात जेणेकरूण त्यांना झोप येऊ नये.