गोवा, 16 जानेवारी : अपघात टाळण्यासाठी गाडी कमी वेगात चालवा असं वारंवार सांगितलं. पण, एका भरधाव कारचालकाच्या (skoda car accident) हलगर्जीपणामुळे दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना गोव्यात (goa) घडली आहे. भरधाव कारने नाकाबंदीवर दोन पोलिसांना उडवले, यात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
दक्षिण गोव्यातील पणजीपासून (panji) 30 किलोमीटर सेरावली इथं पोलीस नाकाबंदीवर घटना घडली आहे. नाकाबंदीच्या वेळेस भरधाव वाहनाने दोन पोलीस शिपायाचा उडवले. पोलीस कर्मचारी शैलेश गावकर आणि विश्वास देईकर असं या मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
आरोपी क्रेग रोड्रीगीस हा भरधाव वेगात आपली स्कोडा कार (skoda car accident) चालवत होता. नाकाबंदीजवळ आल्यावर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट नाकाबंदीवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी शैलेश गावकर आणि विश्वास देईकर उभे असलेल्या चौकीजवळ वाहनाला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर 11 ते 12 वेळा पलटी झाली आणि त्यानंतर थांबली. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे.
(मार्कांच्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी, प्राध्यापकाला 2 वर्षांची शिक्षा)
यावेळी नाकाबंदीची ड्युटी करीत असलेले पोलीस कर्मचारी शैलेश गावकर यांचा जागीच मृत्यू झाला आणि विश्वास देईकर या आयआरबी बटालियनच्या पोलीस कर्मचाऱ्याला हॉस्पिटलमध्ये नेताना मृत्यूने गाठले.
गोवा सरकारतर्फे मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना पोलीस दलात नोकरी दिली जाईल असं यावेळेस पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी जाहीर केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Goa