मोरोक्को, 16 जानेवारी: विद्यार्थिनींना (Students) चांगले गुण (Marks) देण्यासाठी त्यांच्याकडून शरीरसंबंधांची मागणी (Physical relations) कऱणाऱ्या प्राध्यापकाला (Professor) दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा (Two year imprisonment) ठोठावण्यात आली आहे. आपल्या विद्यार्थिनींना चांगले मार्क्स न देण्याची धमकी देऊन त्यांना शरीरसंबंध ठेवण्यासाठी या शिक्षकाने भाग पाडल्याचं पोलीस चौकशीत दिसून आलं आहे. काय आहे प्रकरण हे प्रकरण आहे मोरोक्को देशातलं. एकूण चार शिक्षकांवर विद्यार्थिनींकडून शरीरसुखाची मागणी करणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे आणि मानसिक छळ करणे असे आरोप ठेवण्यात आले होते. अनेक विद्यार्थिनींनी या शिक्षकांविरोधात तक्रारी दाखल केल्यानंतर मोरोक्कोतील न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सुरू केली होती. या प्रकरणातील एका प्राध्यापकाला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून इतर तिघांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांच्या शिक्षेवर अद्याप सुनावणी झालेली नाही. विद्यार्थिनींनी फोडली वाचा परीक्षेत चांगले गुण मिळूनही शरीरसुखाची मागणी पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थिनींना हे प्राध्यापक कमी मार्क्स देत असत. कमी मार्कांमुळे आपल्या करिअरमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत, या कारणासाठी अनेकदा विद्यार्थिनी या प्रकारासाठी तयार होत असत. याचाच गैरफायदा हे प्राध्यापक उचलत आणि विद्यार्थिनींसोबत सतत लैंगिक अत्याचार करत असत. मात्र काही विद्यार्थिनींनी या प्रकाराला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला आणि थेट या प्रकरणाची तक्रार पोलिसांत केली. हे वाचा -
मोरोक्कोत खळबळ मोरोक्को हा तसा अफ्रिकेतील देश असून मुख्यत्वे सनातनी विचारांचा मानला जातो. प्रगत देशांच्या तुलनेत या भागात महिलांना असणारे अधिकार आणि कायदे कमी आहेत. मात्र तिथे अशा प्रकारांना वाचा फुटणं, कोर्टात या प्रकरणाची केस उभी राहणं आणि आरोपींना शिक्षा होणं ही बाबदेखील लक्षवेधी असल्याचं मानलं जात आहे.