मुंबई, 31 मार्च : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कोकणचा समृद्धी महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि कोकणची भाग्यरेषा ठरलेल्या मुंबई- गोवा महामार्गावरी सर्वात मोठा कशेडी बोगदा येत्या मे महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे. दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून दोन पैकी एक बोगदा वाहतुकीस सुरु होणार असल्याचे महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून या बोगद्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. नोव्हेंबर 2018 मध्ये या बोगद्याच्या कमला सुरवात झाली.
रस्त्यावर पांढरी किंवा पिवळ्या रंगाची रेषा का असते? तुटक रेषांचा अर्थ काय?
या प्रकल्पासाठी 441 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कशेडी बोगदा तीन पदरी असून असे दोन बोगदे हाती घेण्यात आले आहेत. त्यातील मुंबईच्या बाजूने जाणाऱ्या एका बोगद्याचे काम 80 टक्के झाले आहे.
खेळण्या बागडण्याच्या वयात चक्क एव्हरेस्टचा बेस कँप गाठला, सहा वर्षाच्या चिमुकलीचा वर्ल्ड रेकॉर्ड
मे महिन्याअखेरीस म्हणजेच येत्या दोन महिन्यात या बोगद्यातून वाहतूक सुरु होणार असल्याचे महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कशेडी ते रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर येथील भोगाव इथपर्यंत कशेडी बोगदा हा 2 किलोमीटरचा असून एक तासाचे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.