मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्ही अप्लाय केलंत, तर तुम्हाला हे माहितच असेल की त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते, यामध्ये रस्त्यांशी संबंधीत अनेक साइन्स अॅड सिम्बॉल विषयी माहिती असते. तसेच तुम्हा सर्वसाधारण नागरीक म्हणून जरी बाहेर पडलात, तरी तुम्हाला रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे साइन्स दिसतील, ज्यांपैकी काहींबद्दल आपल्याला माहिती असते, तर काहींकडे आपण फारसं लक्ष देत नाही. त्यांपैकीच एक आहे, ते म्हणजे रस्त्यावर असलेल्या रेषा, या रेषा वेगवेगळ्या रंगात असतात तर कधी त्या वेगवेगळ्या आकारात, म्हणजेच सरळ सिंगल रेष, डबल रेष, तुटक रेष, पिवळी रेष, सफेद रेष इत्यादी. जगातील असं शहर जिथे 11 नंतर थेट वाजतो 1 पण या रेषा कशासाठी आखल्या जातात किंवा त्यांचं महत्व काय आहे तुम्हाला माहितीय का? वाहतूक नियमांनुसार, प्रत्येक ओळीला स्वतःचा एक अर्थ आणि महत्वा आहे आणि जर लोकांना त्या सर्वांची माहिती मिळाली तर रस्ते अपघात कमी होऊ शकतात. यासोबतच वाहन चालवणाऱ्या लोकांनाही गाडी चालवताना बरीच सोय होऊ शकते. अशा परिस्थितीत या विविध प्रकारच्या ओळींचा अर्थ काय आहे? चला जाणून घेऊ. सरळ पांढरी रेषेचा अर्थ काय? जर रस्त्यावर एक सरळ पांढरी रेषा असेल तर याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ओळीत किंवा लाईनीत चालावे लागेल, ज्या लाईनीत तुम्ही आधीच आहात. जर ती लाईन क्रॉस करताना एखाद्या ट्राफीक पोलिसांने तुम्हाला पकडलं तर ते तुम्हाला फाईन मारु शकतात. रस्त्याच्या मधोमध तुटलेल्या रेषा जर तुम्हाला रस्त्याच्या मधोमध तुटलेली पांढऱ्या रंगाची रेषा दिसली, तर तुम्ही तेथून वाहनाला ओव्हरटेक करू शकता, पण जर लाइन तुटलेली नसेल किंवा ती सरळ रेषा असेल, तर तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही. रस्त्याच्या मध्ये दोन पांढऱ्या रेषा रस्त्याच्या मधोमध दोन पांढऱ्या रेषा असल्या तरी तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही. रस्त्याच्या मधोमध जिथे जिथे दोन पांढऱ्या रंगाच्या रेषा एकत्र दिसतील तिथे एकाच लाईनने गाडी चालवावी लागेल, तेथे चुकूनही ओव्हरटेक करू नका. रस्त्यावर पिवळी रेष जर रस्त्यावर पांढऱ्या ऐवजी पिवळ्या रंगाची सिंगल लाईन असेल तर तुम्ही तिथे ती पिवळी रेषा ओलांडू शकत नाही. तुम्ही तुमच्या स्वत:च्या रांगेत राहून वाहने पास करू शकता आणि ओव्हरटेक करू शकता परंतु क्रॉस करू शकत नाही. दोन पिवळ्या रेषा रस्त्यावर जर दोन पिवळ्या रेषा असतील तर तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही किंवा पुढे जाऊ शकत नाही. रस्त्याच्या कडेला पिवळी लाईन असल्यास तुम्ही तुमचे वाहन पार्क करू शकत नाही. अशा रस्त्यावर तुम्ही तुमची गाडी किंवा वाहन उभे केल्यास तुम्हाला चालान केले जाईल.
कधी कधी रस्त्याच्या मधोमध तुटलेल्या लाईनसोबत एक सरळ लाईन असते, याचा अर्थ असा की जिथे तुटलेली रेषा आहे तिथून तुम्ही ओव्हरटेक करू शकता आणि जिथे सरळ रेषा आहे त्या बाजूने ओव्हरटेक करू शकत नाही. अशी रेषा डोंगराळ भागातील रस्त्यावर पाहायला मिळेल.