पणजी, 31 मार्च : गोव्यात पुन्हा एकदा पर्यटकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. एका डच महिलेवर विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. योगासन शिकण्यासाठी आलेल्या असा प्रकार घडला आहे. ती राहत असलेल्या रिसॉर्टच्या एका कर्मचाऱ्याने डच महिलेवर विनयभंग केल्याची तक्रार समोर आली आहे. तिने विरोध केला असता त्याने तिला चाकूने वार करून जखमी केले.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या महिलेवर रिसॉर्टमधील कर्मचारी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी ती महिला इतक्या जोरात ओरडली की शेजारी असलेल्या रूममधून लोकांनी धाव घेतली. दरम्यान मदतीला आलेल्यांवरही त्या युवकाने हल्ला केल्याचे सांगण्यात आले. 28 मार्च रोजी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे गोवा पोलिसांनी सांगितले.
पतीसोबत झाला वाद अन् समोरून रेल्वे येताच तीन मुलांसह उचललं टोकाचं पाऊल
पोलिसांनी एका 27 वर्षीय तरुणाला अटक केली आहे, तो मूळचा उत्तराखंडचा आहे. मागच्या दोन वर्षांपासून तो या रिसॉर्टमध्ये बारटेंडर म्हणून काम करत आहे. जखमी डच महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिने पोलिस तक्रारीत म्हटले आहे की, 'मी या महिन्याच्या सुरुवातीपासून प्रवास करत आहे.
राजस्थान आणि मुंबईला भेट दिल्यानंतर, गोव्यात चार दिवसांच्या योगा रिट्रीटला जाण्यापूर्वी मी एक रात्र रिसॉर्टमध्ये राहण्याचा विचार केला. रात्रीचे जेवण करून मी माझ्या टेंट झोपायला गेलो. तंबूला कुलूप लावता येण्याजोगा दरवाजा नव्हता, फक्त कापडाने झाकलेला होता. रात्री दोनच्या सुमारास अचानक लाईट गेली. सकाळी उठल्यावर एक माणूस बेडभोवती मच्छरदाणी काढत असल्याचे दिसले. त्याच्या हातात डक्ट टेप होता. त्याने मला जबरदस्तीने धरण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा त्याने माझा हात धरण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी मदतीसाठी ओरडले. तो मला म्हणाला गप्प बस नाहीतर तुला मारून टाकीन. त्याने माझ्या तोंडात बोटे घातली तेव्हा मी त्याला जोरात चावा घेतला आणि बेडवर ढकलण्याचा प्रयत्न केला. मग मी आणखी एक माणूस तंबूत येताना पाहिला. सुरुवातीला मला भीती वाटली की तो आरोपीचा सहकारी असेल, पण त्याने मला मदत करायला आल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. यामध्ये त्याने चाकून वार केले.
Pune Crime: पुण्यात पुन्हा मुळशी पॅटर्न, भरदिवसा घडली थरारक घटना...
तिला आरोपीने केलेल्या चाकू हल्ल्यात तिच्या पाठीच्या वरच्या बाजूला आणि पोटाच्या डाव्या बाजूला अनेक जखमा झाल्या आहेत. यामध्ये रक्तस्त्राव झाला आहे. ती मदत मागण्यासाठी रिसॉर्टच्या रिसेप्शनवर गेली. रिसॉर्टच्या एकाही कर्मचाऱ्याने माझी ओरड ऐकली नाही आणि माझ्या मदतीला आला नाही. एक परदेशी नागरिक आणि काही स्थानिक लोकांनी माझी मदत केल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Goa, Local18