मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Pune Crime: पुण्यात पुन्हा मुळशी पॅटर्न, भरदिवसा घडली थरारक घटना..

Pune Crime: पुण्यात पुन्हा मुळशी पॅटर्न, भरदिवसा घडली थरारक घटना..

सांकेतिक छायाचित्र

सांकेतिक छायाचित्र

खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेला परंतु आता जामिनावर बाहेर आलेल्या एकावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

पुणे, 30 मार्च : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. शहरात पुन्हा एकदा कोयता गँगकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुण्यातील हडपसर परिसरात तर गेल्या काही दिवसांपासून गँगवॉर टोकाला गेले आहे. खूनाचा बदला खून म्हणत सराईत गुन्हेगारांकडून आरोपीवर कोयत्याने वार केला. या घटनेनंतर शहरात खळबळ माजली आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणी ओम उर्फ पिंटू भंडारी (वय 23), सागर घायतडक (वय 19) राजन लवांड (वय 22), मेघराज शितोळे या चौघांविरुदध हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला. आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील दोन आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या प्रकरणी अनिकेत शुभम भोंडे हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि शुभम भोंडे हे दोघे हडपसर येथील सरकारी 32 शाळा येथे सिगारेट ओढून रिक्षाने घरी जात असताना त्यांच्या समोर दोन दुचाकीवर चौघे आले. शुभम भोंडे हा सन 2020 मध्ये अनिकेत शिवाजी घायतडक याचे खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता. सध्या तो जामिनावर बाहेर आला आहे. त्याचा राग मनात धरुन आरोपी यांनी हातामध्ये धारधार शस्त्रे घेवुन शुभम याला रिक्षाच्या बाहेर ओढून, त्याला लाथाबुक्कयांनी मारहाण करुन तू अनिकेतचा मर्डर केला आहे ना, आता बघ मर्डरला मर्डरने रिप्लाय देणार किंवा मला 5 लाख रुपये दे. आज तुला कायमचे संपवुनच टाकणार असे बोलून धारदार शस्त्राने डोक्यावर, डोळ्यावर व पाठीवर वार केले. जर कोणी मध्ये आले तर आम्ही कोणालाही सोडणार नाही असे बोलून दहशत निर्माण करुन निघून गेले. या प्रकरणी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

वाचा - पतीसोबत झाला वाद अन् समोरून रेल्वे येताच तीन मुलांसह उचललं टोकाचं पाऊल

कोयता गँगची काढली धिंड

28 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेत दोघेजण सहभागी होते. यातला एक अल्पवयीन होता तर दुसरा सज्ञान. करण अर्जुन दळवी 20 वर्षाचा हा आरोपी त्या घटनेनंतर मात्र फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेरीस तो बीड येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या एका पथकाने त्याला बीड शहरात जाऊन बेड्या ठोकल्या. अटक केल्यानंतर पोलिसांनी जेव्हा त्याला पुण्यात आणलं तेव्हा सर्वात आधी त्याला त्याच जागी आणलं जिथे त्याने दहशत माजवली होती. दोरखंडाने हात पाठीमागे बांधलेले होते. अवतीभवती पोलिसांचा गरांडा. अशा अवस्थेत करण दळवी याची धिंड काढण्यात आली.

First published:
top videos

    Tags: Crime, Pune