मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पतीसोबत झाला वाद अन् समोरून रेल्वे येताच तीन मुलांसह उचललं टोकाचं पाऊल

पतीसोबत झाला वाद अन् समोरून रेल्वे येताच तीन मुलांसह उचललं टोकाचं पाऊल

झारखंडमधील पलामूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका महिलेने तीन मुलांसह रेल्वेखाली येत आत्महत्या केली आहे.

झारखंडमधील पलामूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका महिलेने तीन मुलांसह रेल्वेखाली येत आत्महत्या केली आहे.

झारखंडमधील पलामूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका महिलेने तीन मुलांसह रेल्वेखाली येत आत्महत्या केली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Jharkhand, India

नील कमल (पलामू), 30 मार्च : झारखंडमधील पलामूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका महिलेने तीन मुलांसह रेल्वेखाली येत आत्महत्या केली आहे. ही घटना बिसाफुटा रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे. दरम्यान ही महिला आणि तीन मुले रेल्वे खाली गेल्याने मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. या हृदयद्रावक घटनेची माहिती परिसरात मिळताच ही घटना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

हरिहरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरकपूर गावातील रवि सिंह यांची पत्नी मनिता देवी असे मृत महिलेचे नाव आहे. सातबरवा पोलीस स्टेशन हद्दीतील एकता गावात मनिता देवी यांच्या मामाचे घर आहे. मनिताने बुधवारी तिच्या दोन मुली आणि एका मुलासह आत्महत्या केली. सर्व मुलांचे वय 3 ते 7 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच पलामूचे पोलीस अधीक्षक (एसपी) चंदन कुमार सिन्हा घटनास्थळी दाखल होत संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. घटनास्थळावरून सापडलेल्या मृत महिलेच्या कुटुंबीयांशी मोबाईलवरून चर्चा करत माहिती दिली.

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची अशीही भारी आयडिया; युट्यूबवालेच देतात पैसे

महिलेचे पतीसोबत भांडण झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पतीसोबत भांडण झाल्यानंतर माहेरी येत असल्याची माहिती नातेवाइकांकडून देण्यात आली. परंतु, ती माहेरी पोहोचली नाही यानंतर आम्हाला अचानक तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. एसपी चंदन कुमार सिन्हा यांनी सांगितले की, सर्व मुद्यांवर चौकशी केली जाणार आहे. अखेर या महिलेने येथे येऊन आत्महत्या कशी केली याचा आम्ही लवकरच छडा लावणार असल्याची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आठ वर्षांपूर्वी मनिताचा विवाह रवी सिंहसोबत झाला होता. दोघांना दोन मुली आणि एक मुलगा होता. आर्थिक अडचणींमुळे मनिताचे पतीसोबत भांडण होत होते. बुधवारीही मनिता आपल्या माहेरी जाण्यासाठी सासरच्या ठिकाणाहून निघून गेली होती. त्यांनी रेल्वे रुळाजवळ बसून मुलांना डाळ आणि संत्री खाऊ घातली असल्याची माहिती आहे.

मध्यरात्री पतीचे पत्नी-मुलीसोबत भयानक कृत्य; दोन मुलं लपून बसल्याने वाचला जीव

पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल जप्त केला आहे. त्याआधारे पोलिसांनी महिलेच्या नातेवाईक आणि कुटुंबीयांना बोलावून घेतले. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

First published:
top videos

    Tags: Crime news, Jharkhand, Local18