पणजी 12 जुलै : गोवा काँग्रेसमधील (Goa Congress) बंडखोरीचे कथित ढग थोडेसे थंडावताना दिसत आहेत. काँग्रेस पक्षाने नेते मायकल लोबो, यांचं वर्णन “देशद्रोही” आणि “पाठीत चाकू खुपसणारा” असा केला होता. मात्र, लोबो सोमवारी रात्री पणजीतील काँग्रेस कार्यालयात परतले. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, लोबो आणि अन्य तीन आमदारांनी सोनिया गांधींनी गोवा काँग्रेसमधील फूट रोखण्यासाठी पाठवलेले पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्यासारख्या नेत्यांसोबत बैठक घेतली (Goa Political Updates).
BREAKING : खासदारांच्या दबावापुढे उद्धव ठाकरेंनी बदली भूमिका, शिवसेना देणार एनडीएला पाठिंबा?
या बैठकीनंतर आम्ही काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकून आलो आहोत आणि काँग्रेस पक्षासोबत आहोत. आम्ही कुठेही जाणार नाही, असं लोबो यांनी सांगितलं. मात्र, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्यावर काँग्रेसने भाजपसोबत युती करून काँग्रेस आमदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलेला होता, यावर त्यांनी काहीही बोललं नाही.
काँग्रेस पक्षाकडून कठोर पाऊल उचलली जाताच २४ तासांच्या आत मायकल लोबो सोमवारी रात्री मुकुल वासनिक, गोवा व्यवहार प्रभारी दिनेश गुंडू राव आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. लोबो यांच्यासोबत त्यांच्या पत्नी डेलिया लोबो, केदार नाईक आणि राजेश फळदेसाई हे दोन आमदार होते. है चौघंही गुंडू राव यांनी शक्ती प्रदर्शनासाठी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला गेले नव्हते. यावेळी राव यांनी लोबो आणि कामत यांच्यावर आरोप केला होता की ते भाजपसोबत मिळून काँग्रेसच्या आमदारांना बंडखोर करण्यासाठी भडकवत आहेत.
गोव्यापाठोपाठ उत्तराखंडमध्येही काँग्रेसला मोठा धक्का; 3 बड्या नेत्यांचा पक्षाला रामराम
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रात्री 11 वाजेपर्यंत काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्यानंतर बाहेर आलेले लोबो म्हणाले, “मी त्यांना सांगितलं आहे की आम्ही काँग्रेसमधून निवडून आलो आहोत आणि आमचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे… आम्ही कुठेही जाणार नाही. पक्ष फोडण्याचा प्रयत्न कोण करत आहे, याचा काही फरक पडत नाही, आम्ही पक्षासोबत खंबीरपणे आहोत, असं ते म्हणाले. विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवल्याच्या मुद्द्यावर लोबो म्हणाले की, मी स्वतः पक्षाला सांगितलं होतं की, मला या पदावर राहायचं नाही. ते असंही म्हणाले की काँग्रेस पक्षाकडे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचं कोणतंही कारण नाही.
लोबो आणि इतर आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर मुकुल वासनिक यांनीच बैठक चांगली झाल्याचे सांगितलं. त्याचवेळी काँग्रेस नेते दिनेश गुंडू राव यांना लोबो हे अजूनही पक्षातील गद्दार आहेत का? असा प्रश्न विचारला असता ते हसले आणि म्हणाले की, काँग्रेस हा मोठ्या मनाचा पक्ष आहे, पण काही गोष्टी अद्याप सुटलेल्या नाहीत. जे काही करायचे होते ते आम्ही केले. काँग्रेस पक्षात कथित बंडखोरी झाल्याच्या वृत्तानंतर विधानसभा अध्यक्षांनी उपसभापतीपदाची निवडणूक पुढे ढकलली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Goa, Political tension