मराठी बातम्या /बातम्या /देश /

गोव्यापाठोपाठ उत्तराखंडमध्येही काँग्रेसला मोठा धक्का; 3 बड्या नेत्यांचा पक्षाला रामराम

गोव्यापाठोपाठ उत्तराखंडमध्येही काँग्रेसला मोठा धक्का; 3 बड्या नेत्यांचा पक्षाला रामराम

उत्तराखंड प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र प्रसाद रातुडी, राज्य महिला काँग्रेसचे उपाध्यक्ष कमलेश रमण आणि सोशल मीडिया सल्लागार कुलदीप चौधरी यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला (Uttarakhand Congress Crisis).

पुढे वाचा ...
    देहरादून 12 जुलै : उत्तराखंड काँग्रेसच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी राजीनामा देऊन दिल्लीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. आप उत्तराखंडचे संयोजक जोतसिंग बिश्त यांनी सांगितलं की, उत्तराखंड प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र प्रसाद रातुडी, राज्य महिला काँग्रेसचे उपाध्यक्ष कमलेश रमण आणि सोशल मीडिया सल्लागार कुलदीप चौधरी यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला (Uttarakhand Congress Crisis). या सर्वांचे पक्षात स्वागत करताना मनीष सिसोदिया म्हणाले की, यामुळे उत्तराखंडमध्ये आप मजबूत होईल. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही पक्षातील वाढता कलह हे काँग्रेस सोडण्यामागचे कारण सांगितलं गेलं आहे. या नेत्यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर, उत्तराखंड विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते प्रीतम सिंह आणि आमदार भवन चंद्र कापरी यांच्यासह राज्यातील नेत्यांनी माजी कॅबिनेट मंत्री हरकसिंग रावत यांच्या निवासस्थानी बैठक घेतली आणि पक्षाप्रती चिंता व्यक्त केली. 'अब नही कोई बात खतरे की..'; फोटो शेअर करत राऊतांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनाही केलं टॅग उल्लेखनीय बाब म्हणजे प्रदेश प्रवक्ते राहिलेले आर पी रातुडी आणि देहरादून महिला काँग्रेसचे महानगर अध्यक्ष कमलेश रमण यांनी पक्षाला रामराम करत आपमध्ये प्रवेश केला. 2017 आणि 2022 च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठ्या फरकाने पराभव झाला. पक्ष बळकट करण्याची गरज होती मात्र आता परिस्थिती टोकाला पोहोचली आहे. आर.पी. रातुडी आणि कमलेश रमण हे प्रदीर्घ काळ खरे सैनिक म्हणून काँग्रेसमध्ये होते. आता अचानक नाराज होऊन त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. आरपी रातुडी यांनी पक्ष सोडण्यापूर्वी सोशल मीडियावर वेदना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिलं, "आज माझं मन खूप दुखावलं आहे. मी माझ्या आयुष्यातील 45 वर्षे काँग्रेस पक्षाला दिली आणि आता काँग्रेसची भविष्यातील स्थिती चांगली नाही. पक्ष नेतृत्वाकडून घेतले जाणारे निर्णय कलहाचं कारण हे खूप दुःखद आहे". काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रतुरी यांनी पक्षात सगळं सुरळीत सुरू नसल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली. jayant patil vs anil babar : मंत्री -संत्री व्हा पण सगळ्यांचा सातबारा माझ्याकडे, करेक्ट कार्यक्रम करणार : जयंत पाटील विशेष म्हणजे नुकतंच प्रीतम सिंह यांनी 2016 मधील बंड हे काँग्रेस कमकुवत होण्याचे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगून हरीश रावत यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. 2016 मध्ये, हरीश रावत मुख्यमंत्री असताना, नऊ नाराज नेत्यांनी काँग्रेसमधून बंड करून भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून बड्या नेत्यांच्या आपसी भांडणामुळे पक्षातील लहान कार्यकर्तेही अस्वस्थ होते. आता पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी काँग्रेसमधील अंतर्गत कलहाची भाषा केली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Political tension, Uttarakhand

    पुढील बातम्या