जाहिरात
मराठी बातम्या / गोवा / गोव्यात सोमवारपासून 15 ते 18 वयोगटाचं लसीकरण, चारच दिवसांत देणार 72 हजार डोस

गोव्यात सोमवारपासून 15 ते 18 वयोगटाचं लसीकरण, चारच दिवसांत देणार 72 हजार डोस

गोव्यात सोमवारपासून 15 ते 18 वयोगटाचं लसीकरण, चारच दिवसांत देणार 72 हजार डोस

सोमवारपासून 15 ते 18 वयोगटाचं लसीकरण होणार असून पुढील चार दिवसांत 72000 डोस दिले जातील, अशी माहिती गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पणजी, 2 जानेवारी: गोव्यात (Goa) सोमवारपासून (Monday) 15 ते 18 (15 to 18 age group) वयोगटासाठीच्या लसीकरणाला सुुरुवात होणार आहे. पुढच्या चार दिवसांतच (Four days) पहिला डोस (First dose) देण्याचं काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajeet Rane) यांनी दिली आहे. गोव्यात 15 ते 18 या वयोगटातील मुलांची एकूण संख्या आहे 72000. यापैकी सर्वच्या सर्व मुलांना पुढील चार दिवसांत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे.

जाहिरात

अशी असेल मोहिम केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्यासोबत गोव्यातील लसीकरणाविषयी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. गोव्यात कोरोना प्रतिबंधक लसींचे 72 हजार डोस दाखल झाले असून पुढच्या चार दिवसांत त्यांचं वितरण केलं जाणार आहे. जलदगतीनं लसीकरणाचं काम पूर्ण करून गोव्यातील लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वेगानं पावलं टाकण्याचा गोवा सरकारचा मानस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. असं होणार लसीकरण वेगवेगळ्या लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध असणार आहेत. त्याशिवाय वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊनही कोरोनाची लस दिली जाणार असल्याची माहिती गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. या वयोगटातील मुले आणि त्यांचे पालक यांनी पुढील चार दिवसात लसीकरण केंद्रावर जाऊन लसी टोचून घ्याव्यात, असं आवाहन सरकानं केलं आहे. कोरोनाबाबत काळजी हे वाचा- या महिन्यात शिगेला पोहोचणार कोरोना रुग्णांची संख्या; रोज आढळणार 2 लाख रुग्ण? गोव्यात जय्यद तयारी मुख्यत्वे पर्यटनावर अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या गोव्याला दोन्ही लॉकडाऊनचा जबर फटका बसला आहे. आता अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येत असताना पुन्हा ओमिक्रॉन व्हेरिएंटनं तोंड वर काढलं आहे. त्यामुळे सर्व ती काळजी घेतली जात आहे. गोव्यात येत असलेलं 2000 प्रवासी असलेलं एक जहाज परत पाठवण्यात आल्याची माहिती गोवा प्रशासनानं दिली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत सोमवारी कोरोना टास्क फोर्सची बैठक घेणार असून काही नवे नियम आखले जाण्याची शक्यता आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात