मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

भारतात या महिन्यात शिगेला पोहोचणार कोरोना रुग्णांची संख्या; दररोज आढळणार 2 लाख नवे रुग्ण?

भारतात या महिन्यात शिगेला पोहोचणार कोरोना रुग्णांची संख्या; दररोज आढळणार 2 लाख नवे रुग्ण?

Third Wave of Coronavirus: कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, तज्ञांचं म्हणणं आहे की महामारीची तिसरी लाट आधीच उंबरठ्यावर आहे आणि ओमायक्रॉनने डेल्टा व्हेरिएंटची जागा घेण्यास  सुरुवात केली आहे

Third Wave of Coronavirus: कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, तज्ञांचं म्हणणं आहे की महामारीची तिसरी लाट आधीच उंबरठ्यावर आहे आणि ओमायक्रॉनने डेल्टा व्हेरिएंटची जागा घेण्यास सुरुवात केली आहे

Third Wave of Coronavirus: कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, तज्ञांचं म्हणणं आहे की महामारीची तिसरी लाट आधीच उंबरठ्यावर आहे आणि ओमायक्रॉनने डेल्टा व्हेरिएंटची जागा घेण्यास सुरुवात केली आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 02 जानेवारी : भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे (Corona Cases in India) रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाच्या 'ओमायक्रॉन' या नवीन प्रकारामुळे दररोज रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. 1 जानेवारी म्हणजेच वर्षाच्या पहिल्या दिवशी देशात एकाच दिवसात कोरोनाची 22,775 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, ही 6 ऑक्टोबरनंतरची सर्वाधिक प्रकरणं आहेत. आता देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही एक लाखाच्या पुढे गेली आहे. यासोबतच कोरोनाच्या 'ओमायक्रॉन' व्हेरिएंटची (Omicron Variant) 161 नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर ओमायक्रॉनबाधित एकूण रुग्णांची संख्या 1431 वर पोहोचली आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, तज्ञांचं म्हणणं आहे की महामारीची तिसरी लाट आधीच उंबरठ्यावर आहे आणि ओमायक्रॉनने डेल्टा व्हेरिएंटची जागा घेण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या शिगेला पोहोचेल आणि त्या काळात दररोज रुग्णांची संख्या दोन लाखांवर पोहोचू शकेल (Third Wave of Coronavirus), अशी भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Omicron ची तिसरी लाट चिंता करू नका... डॉ. रवी गोडसेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

2 डिसेंबर रोजी देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटची पहिली दोन प्रकरणे समोर आल्यापासून आरोग्य मंत्रालय एका मिशन मोडमध्ये काम करत आहे. 15 डिसेंबरच्या आसपास दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या सुमारे 6000 होती, मात्र आता अचानक संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. परिस्थिती पाहता, केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क केलं आहे की कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे सर्वांनी तयार राहणं आवश्यक आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांची मते विभागली गेली आहेत. जेव्हा NITI आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल यांना साथीच्या रोगाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेवर प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले की किती लोकांना लसीकरण केलं गेलं आहे यावर ते अवलंबून आहे. ते म्हणाले की, सध्याच्या काळात लसीकरण हा संसर्ग टाळण्यासाठी सर्वात खात्रीचा मार्ग आहे. मात्र, यासोबतच त्यांनी कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करण्यावरही भर दिला. तर काही विशेषतज्ञांचं असं म्हणणं आहे की नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ तर होईल, मात्र हा व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत जास्त गंभीर नाही.

कोरोना लशीचं कारण सांगून तरुणाची नसबंदी, काही महिन्यांपूर्वीच झालं लग्न

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात दावा केला आहे, की भारतात कोविड-19 महामारीची तिसरी लाट 3 फेब्रुवारीपर्यंत शिगेला पोहोचू शकते. हा अंदाज या गृहितकावर आधारित आहे की ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या

First published:

Tags: Corona spread, Corona updates