Home /News /pune /

भरपूर शिकला पण वाया गेला; कौमार्यभंगाच्या कारणातून पुण्यातील तरुणीचा अमेरिकेत छळ

भरपूर शिकला पण वाया गेला; कौमार्यभंगाच्या कारणातून पुण्यातील तरुणीचा अमेरिकेत छळ

Crime in Pune: अमेरिकेत नोकरी करणाऱ्या एका उच्चशिक्षित पतीने भलत्याच कारणातून आपल्या उच्चशिक्षित पत्नीचा अमानुष छळ (inhuman persecution) केला आहे.

    पुणे, 21 जानेवारी: अमेरिकेत नोकरी करणाऱ्या एका उच्चशिक्षित पतीने भलत्याच कारणातून आपल्या उच्चशिक्षित पत्नीचा अमानुष छळ (inhuman persecution) केला आहे. आरोपीनं कौमार्यभंगाचा ठपका ठेवत (suspicion of virginity lost) पत्नीचा मानसिक आणि शारिरीक छळ केला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात पतीसह सासू सासऱ्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी कौटुंबीक हिंसाचारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला उच्चशिक्षित असून पुण्यातील एका नामांकित कंपनीत काम करते. तर आरोपी पती देखील उच्चशिक्षित असून तो सॉफ्टवेअर अभियंता आहे. आरोपी पती सध्या अमेरिकेतील टेक्सास याठिकाणी नोकरी करतो. आरोपीनं लग्नानंतर काही दिवसांतच फिर्यादीचा छळ सुरू केला होता. चारित्र्यावर संशय घेऊन आरोपीनं पीडितेला सतत शिवीगाळ करत मारहाण केली आहे. हेही वाचा-झोपेतच केला घात; पत्नीने अपंग पतीला दिला भयंकर मृत्यू,कोल्हापुरला हादरवणारी घटना कौमार्यभंगाचा ठपका ठेवत आरोपी पतीने पीडितेला सतत मानसिक आणि शारिरीक यातना दिल्या आहेत. तसेच घटस्फोट देण्यासाठी सतत पीडितेवर दबाव टाकला जात होता. मागील बऱ्याच दिवसांपासून आरोपींकडून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. आरोपींनी अमेरिकेतील टेक्सास आणि कर्नाटकातील फुरसुंगी याठिकाणी जानेवारी ते 26 डिसेंबर 2021 दरम्यान हा छळ केला आहे. हेही वाचा-संसाराचं स्वप्न भंगलं! नवऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन नव विवाहिता फरार... आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात पतीसह सासू सासऱ्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune

    पुढील बातम्या