मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer: चीनला आता वाढवायची आहे लोकसंख्या? 5 वर्षांत बदलल्या 2 Child Policy

Explainer: चीनला आता वाढवायची आहे लोकसंख्या? 5 वर्षांत बदलल्या 2 Child Policy

चिनी सरकारनं विवाहित जोडप्यांना तीन मुलं जन्माला घालण्याची परवानगी दिली (China Three child Policy) आहे. चीनमधील लोकसंख्या वाढीचा दर गेल्या 71 वर्षांमधील सर्वात कमी नोंदवला आहे. हा दर 1950 नंतर यंदाच्या जनगणनेत सर्वांत कमी राहिला आहे.

चिनी सरकारनं विवाहित जोडप्यांना तीन मुलं जन्माला घालण्याची परवानगी दिली (China Three child Policy) आहे. चीनमधील लोकसंख्या वाढीचा दर गेल्या 71 वर्षांमधील सर्वात कमी नोंदवला आहे. हा दर 1950 नंतर यंदाच्या जनगणनेत सर्वांत कमी राहिला आहे.

चिनी सरकारनं विवाहित जोडप्यांना तीन मुलं जन्माला घालण्याची परवानगी दिली (China Three child Policy) आहे. चीनमधील लोकसंख्या वाढीचा दर गेल्या 71 वर्षांमधील सर्वात कमी नोंदवला आहे. हा दर 1950 नंतर यंदाच्या जनगणनेत सर्वांत कमी राहिला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
बीजिंग, 31 मे : चीनने आपल्या देशातील एका दाम्पत्यानं दोन मुलं जन्माला घालण्याचं धोरण लागू केल्यापासून पाच वर्षांच्या आतच त्यामध्ये बदल केला आहे. आता चिनी सरकारनं विवाहित जोडप्यांना तीन मुलं जन्माला घालण्याची परवानगी दिली (China Three child Policy) आहे. चीनमधील लोकसंख्या वाढीचा दर गेल्या 71 वर्षांमधील सर्वात कमी नोंदवला आहे. हा दर 1950 नंतर यंदाच्या जनगणनेत सर्वांत कमी राहिला आहे. चीनमध्ये दर 10 वर्षांनी एकदा जनगणना केली जाते. मागील दशकात या देशातील लोकसंख्या वाढीचा दर सर्वांत कमी राहिला आहे. चीनच्या निर्णयामागे ही 5 कारणे. मुलं जन्माला घालण्याचा धोरणाबाबत केव्हा निर्णय झाला? चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं चीनची वृत्तसंस्था शिन्हुआनं सांगितलं आहे. याबाबत इथल्या पोलित ब्युरोनं सविस्तर माहिती दिली आहे. या निर्णयामुळं चीनमधील वृद्धांच्या वाढत्या संख्येचा समतोल साधता येईल. तसंच चीनला देशात कमी खर्चात मजूर मिळणं (Manpower Advantage) सुरूच राहील. यासह आणखी काही सुधारणा केल्या जाणार आहेत, मात्र त्या काय असतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. चीनमध्ये जन्म दराविषयी आणखी काय काय धोरणे आखली गेली? चीनमधली जन्मदराविषयीचं पहिलं धोरण 70 च्या दशकात तयार करण्यात आलं. तेव्हा विवाहित जोडप्यांना केवळ एक मूल जन्माला घालण्याची परवानगी होती. देशाच्या वेगानं वाढणाऱ्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी हा निर्णय घेतला होता. या धोरणात 2016 मध्ये बदल करून एक मूल जन्माला घालण्याऐवजी विवाहित जोडप्यांनी दोन मुलं जन्माला घालता येण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं. आता पाच वर्षातच धोरण बदलून हे तीन मुलांवर आणलं गेलं आहे. 'चीनमध्येच कोरोना विषाणूची निर्मिती; वटवाघळाचा फक्त बहाणा' चीनच्या लोकसंख्या वाढीच्या दरात काय बदल झालाय? चीन सरकारने काही दिवसांपूर्वी म्हणजेच 11 मे रोजी गेल्या दहा वर्षातील जनगणनेचे आकडे जाहीर केले होते. मागील वर्षात हे जनगणनेचं काम पूर्ण झालं. मात्र सर्वच आकडे जाहीर करण्यात आले नाहीत. 2011 ते 2020 दरम्यान चीनच्या लोकसंख्या वाढीचा दर 5.38 टक्के राहिला आहे. 2010 मध्ये तो 5.84 टक्के होता. या आकडेवारीवरून लोकसंख्यावाढीचा दर आधीच्या तुलनेत कमी असल्याचं समोर येतंय. मात्र, चीनचे तज्ज्ञ हा देशासाठी चांगला संकेत नसल्याचं म्हणत आहेत. हा 1979 मध्ये लागू केलेल्या चाईल्ड पॉलिसीचा रिव्हर्स इफेक्‍ट असल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, हे धोरण 2016 मध्ये रद्द केलं होतं. मात्र, आता येथील जोडपी या धोरणाबरोबर रुळली आहेत. ताज्या आकडेवारीनुसार चीनची लोकसंख्या सध्या 1 अब्ज 41 कोटी आहे. हा आकडा 2010च्या तुलनेत 72 दशलक्षनं जास्त आहे. चीनमधील पहिली जनगणना 1953 मध्ये झाली होती. तेव्हापासूनचा हा सर्वांत कमी वृद्धीदर आहे. नेमकी आता ही बीजिंगसाठी चिंतेची बाब ठरत आहे. नव्या चाइल्ड पॉलिसीवर चीनच्या जनतेची काय प्रतिक्रिया? शांघायचा 26 वर्षीय विमा व्यवसायिक एनी झांग यानं मागील वर्षी एप्रिलमध्ये लग्न केलं होतं. एखाद्या महिलेला या वयात एक मूल होणं ही तिच्या करिअरला नुकसानकारक ठरणारी बाब आहे. तसंच शांघायसारख्या शहरात एका मुलाला सांभाळण्याचा खर्चही खूप जास्त आहे. यामुळं कुठंतरी आमचंही स्वातंत्र्य हिरावलं जातं, असं त्यानं म्हटलं आहे. आता व्हिएतनाममध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला, हवेतून वेगात होतोय संसर्ग एका अभ्यास गटानं 2005 मध्ये तयार केलेल्या अहवालानुसार, चीनमध्ये एखाद्या सामान्य कुटुंबाला एका मुलाचं पालन-पोषण करण्यासाठी 4,90,000 ($74,838) युआन लागतात. स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार 2020 पर्यंत हा खर्च चौपट वाढून 1.99 दशलक्ष युआन झाला आहे. इतर देशांनी चीनबाबत काय म्हटलं आहे? न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालात, चीन सरकारला आता भविष्यात देशात काम करण्यायोग्य वयोगटातील माणसं कमी होतील की काय, अशी भीती वाटत असल्याचं म्हटलं आहे. मागील वर्षात चीनमध्ये 12 लाख मुलांचा जन्म झाला. चीनमधील जनगणना अधिकारी निंग जिंझे यांनी गेल्या चार वर्षात आम्ही जन्मदर कमी होत असल्याचं पहात आहोत, असं सांगितलं आहे. हे भविष्यासाठी चांगले संकेत नसल्याचं ते म्हणाले. अहवालानुसार चीन सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आणि महाशक्ती आहे. याच वेगाने येथील काम करणार्‍या लोकांची संख्या कमी झाली तर भौगोलिक परिस्थितीतही बदल होतील. याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेच्या वाढीवर आणि चिनी सैन्यावरही पडेल. वृद्धांच्या तुलनेत युवकांचे संख्या कमी होणे ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. यामुळं खर्च वाढतील आणि प्राप्ती कमी होईल. अशा स्थितीत सरकारला पेन्शन आणि इतर उपायांवर जास्त खर्च करावा लागेल. Explainer : 'या' शहरातील नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरत नाहीत; पाहा कारण लग्नाचं वाढतं वय याच अहवालात 2014 नंतर चीन मध्ये लग्न करण्याचं सरासरी वय वाढत असल्याचं सांगितलं आहे. याचाच अर्थ तरुणवर्ग लग्नासाठी योग्य असलेल्या वयात लग्न करण्यास तयार नाही याचा थेट परिणाम जन्म दरावर होत आहे. एका बाजूला युवकांची लग्नाबाबत ची मानसिकता बदलत असताना दुसऱ्या बाजूला 2003 नंतर घटस्फोटांचं प्रमाण खूप वाढलं आहे. यामुळं समस्या अधिकच गंभीर झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये कुटुंब आणि मुलांचं महत्त्व सांगणारे विशेष कोर्सेस घेतले जात आहेत. ही देखील आहेत चीनच्या समस्येची आणखी काही कारणं देशातील मातृत्व दर 1.3 टक्के आहे. बहुतेक जोडप्यांना एकाहून अधिक मुलं नको आहेत. वन चाइल्ड पॉलिसीमुळं पुरुष आणि महिलांच्या परस्पर प्रमाणात (Gender Gap) दरी निर्माण झाली आहे. देशात मोठ्या प्रमाणात स्त्री-भ्रूणहत्या झाल्यात. सध्या प्रत्येक 112 पुरुषांमागे केवळ 100 महिला आहेत. 2010 मध्ये हे प्रमाण 118 पुरुषांमागे 100 महिला असं होतं. चीनमधील युवक सध्या शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. अनेकदा करिअर करण्याच्या नादात ते कुटुंबव्यवस्थेपासून दूर राहत आहेत.
First published:

Tags: China, India china, Parents and child

पुढील बातम्या