वॉशिंग्टन, 29 मे : कोरोना बाधित (Corona) रुग्णांची घटती संख्या आणि लसीकरणाचं (Vaccination) प्रमाण वाढत असल्याने जगातील काही देशांमध्ये कोरोनाशी संबंधित निर्बंध हटवले जात आहेत. सध्या काही देशांमध्ये मास्क वापरण्याचं बंधन काहीसं शिथिल केल्याचंही दिसून येत आहे. परंतु, याला अनेक वैज्ञानिकांनी विरोध दर्शवला आहे. या वैज्ञानिकांची असं मत मांडलं आहे की संपूर्ण लसीकरण झाल्यानंतरही नागरिकांनी ऑफिसेस, मॉल्स, दुकानं, बसेस आणि गाड्यांमधून प्रवास करताना मास्क (Mask) हा वापरलाच पाहिजे. या सर्व मतमतांतरामध्ये अमेरिकेतल्या एका राज्याचं नाव सातत्यानं पुढे येत आहे. हे राज्य न्यू हॅम्पशायर (New Hampshire) असून, या राज्याने कोरोना विषयक नियम आणि मास्कबाबत राबवलेला फॉर्म्युला सर्वोत्तम असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
न्यू हॅम्पशायरनं नेमकं काय केलं?
डीएनएच्या वृत्तानुसार, न्यू हॅम्पशायर हे न्यू इंग्लडमधील शेवटचं असं राज्य होतं की ज्याने कोविड-19 SARS-COV-2 चा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यास सुरुवात केली होती. मात्र 16 एप्रिल रोजी मास्क वापराबाबतचे निर्बंध उठवणारे न्यू हॅम्पशायर प्रदेशातील पहिले राज्य ठरले. यामुळे देशातील ज्या राज्यांनी मास्क वापराबाबतचे निर्बंध उठवले आहेत, त्यांच्या यादीत आता न्यू हॅम्पशायरचा समावेश झाला.
20 दिवसांत केसेसमध्ये 75 टक्क्यांनी घट
संशोधकांच्या अंदाजानुसार, हा नियम लागू झाल्यानंतर 20 दिवसांत शहरात 10,000 केसेसची नोंद झाली असून, केसेस आढळण्याचं प्रमाण 75 टक्क्यांनी घटलं आहे. शास्त्रज्ञांच्या मते, एकीकडे लसीकरणाचा वेग वाढत आहे, परंतु मास्क न वापरण्याचा निर्णय हा फार घाईत घेतला गेला आहे असं वाटतं. मात्र यामागे बरीच कारणं दिली जात आहेत. या राज्यातील सर्व नागरिकांना लस दिली गेलेली नाही. लसीकरण पूर्ण झाले असल्याचा कोणताही ठोस पुरावा किंवा डेटा नाही. जेव्हा जर्मनीमध्ये मास्क वापरणं अनिवार्य करण्यात आलं तेव्हा तेथील संसर्गाचा दर 75 टक्क्यांनी कमी झाला.
Explainer: अमेरिकेतल्या लशी भारतात अद्याप का येईनात? कुठे अडलंय घोडं?
नेचर मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, न्यू हॅम्पशायरमध्ये नागरिक जर इनडोअर (Indoor) असतील (मॉल्स, ऑफिसेस, दुकाने) तर त्यांना मास्क वापरणं बंधनकारक आहे. परंतु, नागरिक जर रस्त्यावर, शेतांमध्ये असतील त्यांना मास्क वापरणं अनिवार्य नाही.
तज्ज्ञ काय म्हणतात?
न्यू हॅम्पशायर येथील डार्टमाउथ कॉलेजमधील साथरोग विशेषज्ज्ञ अनी होन म्हणाल्या की इनडोअर असताना मास्क परिधान करणं आवश्यक आहे. कारण बंदीस्त जागेत संसर्गाचा धोका अधिक असतो.
सॅन फ्रॅन्सिको येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील संसर्गजन्य रोग चिकित्सक मोनिका गांधी म्हणाल्या की मला असा विश्वास वाटतो की सार्वजनिक ठिकाणी आता संसर्ग होण्याचा धोका कमी आहे.
मास्कबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचा फेरविचार होण्याची गरज
अटलांटा येथील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शनने (CDC) त्यांच्या मागील मार्गदर्शक सूचनांमध्ये ज्यांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे ते मास्क वापरणं थांबवू शकतात, तसेच त्यांनी सोशल डिस्टन्सिंगसारख्या (Social Distancing) नियमांचं पालन करण्याचं गरज नाही, असं म्हटलं होतं.
मात्र आता सीडीसीने आपलं नवीन संशोधन प्रकाशित केल्यानंतर एजन्सीचे संचालक रोशेल वॅलेस्की यांनी नमूद केले की आमच्या मास्क वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये पुन्हा बदल होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.