नवी दिल्ली, 30 मे : कोरोनाविषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळं
(Corona Second Wave) जगात अनेक ठिकाणी हाहाकार माजला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी कोरोनाचे रूप आणखीनच अक्राळविक्राळ होत चाललं आहे. विषाणूच्या स्वरूपात बदल होत असल्यानं तो अधिक घातक बनत चालला आहे. आता असाच विषाणूच्या स्वरूपात बदल झालेला कोरोना विषाणू प्रकार व्हिएतनाम (Vietnam corona) देशात सापडला आहे. हा नवा विषाणू प्रकार हवेतून वेगानं पसरत असल्यानं भीती व्यक्त होत आहे.
अशा स्वरूपाचा विषाणू अलीकडे भारत आणि ब्रिटनमध्ये
B.1.617 सापडल्याचे व्हिएतनामचे आरोग्यमंत्री गुयेन थान लाँग यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाविषाणूमुळं आजारी पडलेल्या रुग्णांच्या संसर्गाची तपासणी केली असता हा कोरोनाविषाणू नव्या स्वरूपाचा असल्याचे संशोधनातून समोर आलं. अगोदरच जगात ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि भारतामध्ये कोरोनाच्या नव्या स्वरुपामुळं हाहाकार उडाला आहे. त्यामुळं व्हिएतनाम देशातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
नव्या स्वरूपाचा कोरोनाविषाणू सापडल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा विषाणू हवेतून वेगात पसरतो आणि त्याच्यामुळे आजूबाजूचे लोक बाधित होऊ शकतात. नव्या विषाणू स्वरूपाची लागण झालेले नेमके किती रुग्ण आहेत, याबाबत मात्र आरोग्य मंत्र्यांनी माहिती दिलेली नाही. पण, याअगोदरही व्हिएतनाम देशात कोरोनाविषाणूच्या स्वरूपात बदल झालेले सात प्रकारचे विषाणू सापडले आहेत.
हे वाचा- 89 वर्षाच्या आजीला कोरोना होऊन गेल्याचंही कळालं नाही; नातवांनी घेतली पूर्ण काळजी
टाळेबंदीचा उपाय
देशात मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण सापडत असल्याने त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूच्या नवीन स्वरूपाची लागण झाली असल्याची शक्यता आहे. जवळपास 30 हून अधिक भागांमध्ये विषाणूचा फैलाव झाला आहे. रुग्णसंख्या जास्त प्रमाणात वाढत असल्यामुळं विविध प्रतिबंधक उपाय लागू करण्यात आले आहेत. काही ठिकाणी मोठे धार्मिक कार्यक्रम केल्यानंतर रुग्णसंख्या वाढून आल्याचे दिसून आले. त्यानंतर अशा कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मोठ्या शहरांमध्ये गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर निर्बंध आणले असून पब्लिक पार्क, रेस्टॉरन्ट, बार, क्लब आणि स्पा सेंटर बंद ठेवण्यात आले आहेत.
हे वाचा- अजितदादा, झोपेत सरकार तुम्हीच आणलं, सांभाळून बोला, चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा
लसीकरणही सुरू आहे
9.7 कोटी लोकसंख्या असलेल्या व्हिएतनाममध्ये सध्या अॅस्ट्रोजेनका-ऑक्सफोर्डची कोरोना लस दिली जात आहे. आतापर्यंत येथे 10 लाख लोकांना लसीचे डोस दिले गेले आहेत. नुकतीच फाइझर या अमेरिकन कंपनीबरोबर 3 कोटी डोसांसाठी स्वाक्षरी झाली आहे. मॉडेर्नाबरोबरही लवकरच एक करार अपेक्षित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.