वुहान, 31 मे: गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ जगभरात थैमान घातलेल्या, लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गाला (Corona Virus Pandemic) चीनमधील (China) वुहानमधून (Wuhan) सुरुवात झाली, हे सर्वांनाच माहित आहे. चीननं हा विषाणू वटवाघळातून (Bats) माणसात प्रसारित झाल्याचं सांगितलं असलं तरी, चीननं प्रयोगशाळेत (Lab) याची निर्मिती केल्याचा संशय सुरवातीपासूनच व्यक्त केला जात आहे. आता या बाबतीत झालेल्या एका नवीन संशोधनात, कोरोनाचा विषाणू नैसर्गिक नसून वुहानमधील प्रयोगशाळेतच तयार करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आल्यानं पुन्हा एकदा चीनकडेच संशयाची सुई वळली आहे. ‘ आज तक ’नं दिलेल्या वृत्तानुसार, वुहानमधील काही कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2019मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतरच कोरोना विषाणूच्या संसर्गाला सुरुवात झाली, असा दावा अमेरिकेच्या (USA) गुप्तचर यंत्रणांनी अलीकडेच दिलेल्या एका अहवालात केला आहे. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत तपास करण्याचा आग्रह धरला असून जगभरातील अनेक देशांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकेतील आरोग्य यंत्रणेनं या संशोधनासाठी गुंतवणूक केल्याचा आरोपही चीननं केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, चीनच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेतच तयार केला असून रिव्हर्स इंजिनीअरिंगच्या (Reverse Engineering) सहाय्यानं तो वटवाघळांपासून निर्माण झाल्याचं दाखवल्याचा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आल्यानं चीनविरुद्धच्या आरोपांना पुष्टी मिळाली आहे. हेही वाचा- सामान्य रेल्वे प्रवासी अजूनही वेटिंग लिस्टमध्ये, आणखी बघावी लागणार वाट ब्रिटनमधील (UK) डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटिश प्राध्यापक एंगस आणि नॉर्वेतील शास्त्रज्ञ डॉ. बर्जर यांनी हे संशोधन केलं आहे. गेल्या वर्षी हे दोन्ही शास्त्रज्ञ कोरोना विषाणूवरील लस तयार करण्यासाठी संशोधन करत होते. तेव्हा त्यांना या विषाणूमधील काही युनिक फिंगरप्रिंट (Unique Fingerprint) सापडले. प्रयोगशाळेत विषाणू तयार केलेला असल्यास असे युनिक फिंगरप्रिंट आढळतात. त्या वेळी या संशोधकांनी हे संशोधन प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक मोठ्या संस्थांनी याला नकार दिला आणि कोरोनाचा विषाणू हा वटवाघूळ वटवाघळांमधून माणसांच्या शरीरात आल्याचा सिद्धांतच खरा मानला. या संशोधकांनी तयार केलेल्या अत्यंत सखोल अभ्यास अहवालात वुहान प्रयोगशाळेची सगळी कुंडली मांडण्यात आली आहे. 2002 ते 2019 पर्यंत इथं काय काय घडलं याची सगळी माहिती यात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) पथकानं वूहानमधील प्रयोगशाळेत जाऊन तपास करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चीननं या पथकाला सहकार्य केलं नाही. त्यामुळं याबाबतचं गूढ कायमच राहिलं आहे. आता या नव्या दाव्यामुळे चीन्या खोटारडेपणाविरुद्ध सबळ पुरावा मिळाला आहे, असं मानलं जात आहे. हेही वाचा- वाईट! संशयावरुन एकाचा घात, बेदम मारहाणीत जमावाकडून एकाची हत्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.