मराठी बातम्या /बातम्या /explainer /तरुणांना कोरोना लस का दिली जात नाही? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

तरुणांना कोरोना लस का दिली जात नाही? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

आता 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींचं कोरोना लसीकरण (Corona vaccination) केलं जाणार आहे. पण मग 18 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोना लस (Corona vaccine) का नाही?

  नवी दिल्ली, 24 मार्च : सध्या दिवसागणिक कोरानाचा (Corona) संसर्ग वाढताना दिसतो आहे. ही स्थिती बघता केंद्र सरकारने निर्बंध कमी करून लस (Vaccine) अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. परंतु एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत तीव्र विषाणू संसर्गामुळे मृत्यू होण्याचा धोका उद्भवलेला नाही अशा परिस्थितीतील तरुणांना योग्य वयापूर्वी लस देणं देखील चुकीचं आहे.

  न्यूज 18 शी व्यापक स्वरुपात चर्चा करताना डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, सरकारने ठरवलेल्या प्राधान्य गटांसाठीच लसीकरण सुरू ठेवावं लागेल. तसंच दुसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांच्या अनुषंगाने योग्य वर्तन, टेस्टिंग (Testing), ट्रेसिंग (Tracing) आणि आयसोलेशन (Isolation) यावर भर द्यावा लागेल.

  1) लशीचा अपव्यय पाहता, सरकार सर्वांसाठी लसीकरण सुरू करणार का?

  आदर्श परिस्थितीत सर्व प्रौढांचं लसीकरण होणं आवश्यक असतं. परंतु,आपल्याकडे पुरेसे डोस उपलब्ध आहेत का देखील पाहणं गरजेचं आहे. जर आपण 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीस लस दयायची म्हटलं तर त्यांची संख्या 90 कोटींच्या आसपास आहे. याचा अर्थ असा की दोन डोसचा विचार करता आपल्याला किमान 2 अब्ज डोस उपलब्ध होणं गरजेचं आहे. हे शक्य नाही. त्यामुळे आम्हाला दोन मूलभूत तत्वे लक्षात घेऊनच टप्प्याटप्प्यानं लसीकरण करावं लागेल. त्यात सर्वप्रथम कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू होण्याची शक्यता आधिक आहे आणि जे उच्च जोखीम गटात येतात त्यांना लस दयावी लागेल. त्यानंतर दुसरे म्हणजे फ्रंट लाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी आणि कोरोना विरुद्धच्या लढाईत सामील झालेले घटक यांना लस द्यावी लागेल, कारण आपल्याला ही शक्ती गमवायची नाही त्यामुळे त्यांचं संरक्षण केलंच पाहिजे.

  हे वाचा - संशोधनातून आलेली GOOD News: 10 वर्षांखालील मुलांना COVID-19 पासून मिळते ढाल

  एकदा हे लसीकरण पूर्ण झालं की सर्वांसाठी लसीकरण खुलं करता येईल. परंतु तसं करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे डोस उपलब्ध पाहिजेत. म्हणूनच त्यासाठी केवळ भारतातील मार्गदर्शक तत्वेच नाहीतर आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांवर आधारित ही प्राधान्य यादी आहे. या प्राधान्य गटातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान असलं तरी आम्ही लवकरात लवकर त्यांना कव्हर करू. त्यामुळे लशीचा अपव्यय टळेल तसंच जे लोक तंत्रज्ञानाचा वापर करू शकत नाहीत किंवा लसीकरण स्थळापर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा लोकांच्या लसीकरणाची देखील सोय केली जाणार आहे. तसेच त्यांची योग्य काळजी घेतली जाणार आहे.

  2) मोठ्या प्रमाणात लशीचा अपव्यय होतो आहे यावर काय स्पष्टीकरण द्याल? कारण 6.5 टक्के अपव्यय हा खरंच खूप मोठा आहे.

  लशी वाया जाऊ नयेत यासाठी राज्यांना धोरण विकसित करावं लागेल. एका कुपीत 20 डोस असतात. त्यामुळे आपल्याला असं धोरण विकसित करावं लागेल की आपल्याला किती कुपी उघडायच्या आहेत हे माहिती पाहिजे. दिवसाच्या शेवटी आपण कुपी उघडत असाल आणि तुमच्या समोर फक्त किंवा दोन केसेस असतील आणि तुम्ही त्यांना लस देणार असाल तर उर्वरित 8 डोसेस वाया जाणार आहेत. त्यामुळे उघडलेल्या कुपींची संख्या आणि लसीकरणासाठी आलेल्या व्यक्ती यांचं संतुलन ठेवण्यासाठी प्रत्येक स्तरावर योग्य धोरण आखलं गेलं पाहिजे. लसीकरणासाठी नेमक्या किती व्यक्ती येणार आहेत हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आपल्याला एक जरी व्यक्ती आली तरी जोखीम घ्यावी लागते आणि कुपी उघडावी लागते. अशावेळी त्या व्यक्तीला लस द्यायची की नाही हे आपल्याला ठरवावं लागेल.

  3) सध्याचा लसीकरणाचा दर पाहता, त्यानुसार हर्ड इम्युनिटी येण्यासाठी आणखी 12 वर्षे लागतील. केवळ हर्ड इम्युनिटी विकसित करणे हाच विषाणूचा पराभव करण्याचा एकमेव मार्ग आहे का?

  मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की हर्ड इम्युनिटी प्राप्त करण्यास बराच वेळ लागेल. कारण आपण सध्या असं मानत आहोत की हर्ड इम्युनिटी मिळवली तरी विषाणू कायम राहणार आहे. हा विषाणू स्वत:मध्ये कायम बदल करत राहणार आहे. हा विषाणू इतक्या प्रमाणात बदलेल की जे लोक 6 ते 7 किंवा 8 महिन्यांपूर्वी संक्रमित होते, त्यांना देखील या नवीन स्ट्रेनपुढे आपली प्रतिकारक शक्ती कमी वाटेल. त्यामुळे कोरोनाचे नवे स्ट्रेन बघता प्रतिबंधात्मक नियमांचं पालन, कोरोनाचा नवा स्ट्रेन दिसून आल्यास अशा भागात रुग्णांची तपासणी तातडीनं सुरू करणं, तसंच टेस्टींग, ट्रॅकिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून रुग्णांना आयसोलट किंवा क्वारंटाईन करणं, कन्टेंमेंट झोन्स तयार करून प्रसार रोखणं याच उपाययोजना करणं अधिक महत्त्वाचं वाटतं. पूर्वी इतक्या केसेस अधिक नसल्यानं आपण या उपाययोजना नक्कीच करू शकतो.

  4) भारतात दुसरी लाट येण्यामागचं काय कारण आहे? कोरोनाच्या म्युटेट स्ट्रेनमुळे दुसरी लाट आली आहे का आणि हा स्ट्रेन मूळ स्ट्रेनपेक्षा अधिक शक्तिशाली आहे का?

  लाट येण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. एक घटक असा नक्कीच आहे की विषाणू विकसनशील आणि प्रभावी होऊ शकतो. परंतु, तो जरी अधिक प्रभावी आणि संसर्गजन्य झाला असला तसंच झपाट्याने पसरत असला तरी त्याचा प्रसार झाला तरच तो पसरतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं नाही, मास्क वापरला नाही, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केलं नाही, मास्क न घालता मोठ्या पार्ट्या किंवा गेट-टुगेदरला गेलो तर कोरोनाचा कोणताही व्हेरिएंट किंवा म्युटंट झपाट्यानं पसरू शकतो. सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार होऊ शकतो असं चित्र आहे कारण अनेक राज्यात सुपर स्प्रेडींग इव्हेंटस आयोजित केले जात असल्याचं दिसून येते.

  5) होळी हा सुपर स्प्रेडर इव्हेंट ठरू शकतो का?

  तीच खरी भीती आहे. त्यामुळे होळी हा सण मर्यादित स्वरुपात आणि निर्बंधासह साजरा करावा, हे लोकांना समजायला हवं. जरी होळी निमित्ताने मिरवणुका काढल्या जात नाहीत किंवा गेट-टुगेदर आयोजित केले जात नाहीत तरी देखील होळी सुपर स्प्रेडर इव्हेंट ठरू शकते.

  6) दुसरी लाट पुन्हा येण्याची शक्यता पहिल्या लाटेच्या तुलनेत 1.32 ने अधिक आहे? याचा अर्थ असा घ्यायचा का की गेल्या लाटेतील संक्रमित रुग्णापेक्षा या लाटेतील संक्रमित रुग्ण अधिक व्यक्तींना संक्रमित करत आहे? त्यामुळे दुसरी लाट अधिक शक्तिशाली आहे असे म्हणता येईल का?

  कोरोनाची दुसरी लाट अधिक शक्तिशाली असू शकते. परंतु त्यावर नियंत्रण कसं आणायचं याबाबतच्या उपाययोजना आमच्याकडे आहेत. त्यासाठी आपल्याला दोन ते तीन महत्त्वाच्या गोष्टींचं कटाक्षानं पालन करावं लागेल. एक म्हणजे प्राधान्य यादीतील व्यक्तींनी तातडीनं लसीकरण करून घ्यावं, ही यादी पूर्ण झाल्यावर आपल्याला दुसऱ्या यादीकडे जाता येईल. कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक असलेल्या तरुणांना आपण पहिली लस देतो आणि वृद्धांना मात्र ती देत नाही हे चुकीचं ठरेल. त्यामुळे नागरिक आणि राज्यांच्या सरकारच्या दृष्टीकोनातून वेगाने लसीकरण होणं महत्त्वाचं आहे.

  हे वाचा - मी डायबेटिक, ब्लड प्रेशर, हार्ट पेशंट रुग्ण आहे; मला कोरोना लस घेता येईल का?

  दुसरं म्हणजे कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन. कारण नियमांचं पालन खूपच शिथील झालं आहे. लस आली म्हणजे कोरोना गेला आणि आपण सामान्य स्थितीत आलो असा समज लोकांमध्ये दिसून येत आहे. पण तो खरा आणि योग्य नाही.

  7) डॉ. गुलेरिया, लसीकरण झालेल्या लोकांना पुन्हा संसर्ग कसा होतो? हे कसं?

  उत्तर : जर तुम्ही लस घेतली असेल त्यातही केवळ पहिला डोस घेतला असेल तर आणि दुसरा डोस घेतला नसेल तर तुमच्या शरीरात पुरेशी रोग प्रतिकारक शक्ती विकसित झालेली नाही. अशा वेळी तुम्ही कोविड-19 होण्यासाठी संवेदनशील आहात. जर तुम्ही दुसराही डोस घेतला असेल आणि त्यालाही दोन आठवडे उलटून गेले असतील तर तुमच्या शरीरात अँटिबॉडीज तयार झालेल्या आहेत. लस घेतल्यानंतरही कोरोना होऊ शकतो परंतु गंभीर संक्रमण होणार नाही.तुम्हाला सौम्य संसर्ग किंवा विषाणूजन्य संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच आम्ही लसीकरणानंतरही मास्क वापरण्याचा सल्ला प्रत्येकाला देतो.

  8) लस किती काळ प्रभावी ठरेल? प्रत्येक वर्षी आम्हाला लसीकरण करून घ्यावंच लागेल?

  हा कठीण प्रश्न आहे. कारण प्रतिकारशक्ती किती काळ टिकेल हे सांगण्यासाठी आम्ही कोणत्याही लशीचा दिर्घकाळ पाठपुरावा करत नाही. ही एका लशीतून दुसऱ्या लशीत बदलते. मात्र मॉडेलच्या आकडेवारीनुसार रोगप्रतिकारक शक्ती ही आठ महिने ते एक वर्षांपर्यंत टिकू शकते. पण या दोन गोष्टींवर हे अवलंबून आहे. 1) लस किती प्रतिकारशक्ती देते 2) आपल्याला मिळालेल्या लशींद्वारे तयार झालेल्या अँटिबॉडीज या व्हायरस बदलाच्या तुलनेत कशा आहेत. यामुळे हे सांगणं अत्यंत अवघड आहे. सध्याच्या आकडेवारीवरून प्रतिकारशक्ती आठ महिने ते एक वर्षांपर्यंत राहिल. परंतु मी असं सांगू शकतो की लस दीर्घावधीत किती संरक्षण देते हे सांगण्यासाठी विषाणू कसा विकसित होतो हे पाहण्यासाठी आम्हाला सातत्यानं पाठपुरावा करावा लागेल.

  First published:
  top videos

   Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Lifestyle, Test