Home /News /lifestyle /

संशोधनातून आलेली GOOD News: 10 वर्षांखालील मुलांना COVID-19 पासून मिळते नैसर्गिक ढाल

संशोधनातून आलेली GOOD News: 10 वर्षांखालील मुलांना COVID-19 पासून मिळते नैसर्गिक ढाल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत एकट्या माहाराष्ट्रात 60 हजारपेक्षा जास्त मुलं संक्रमित झाली आहेत.तर, कर्नाटकात 7 हजार, छत्तीगडमध्ये 6 हजार आणि उत्तर प्रदेशमध्ये 3 हजार मुलं कोरोनाबाधीत झाली आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेपासून आपल्या चिमुकल्यांना वाचवा.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत एकट्या माहाराष्ट्रात 60 हजारपेक्षा जास्त मुलं संक्रमित झाली आहेत.तर, कर्नाटकात 7 हजार, छत्तीगडमध्ये 6 हजार आणि उत्तर प्रदेशमध्ये 3 हजार मुलं कोरोनाबाधीत झाली आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेपासून आपल्या चिमुकल्यांना वाचवा.

10 वर्षांखालच्या वयाच्या मुलांमध्ये कोविड -19ला (Covid 19) प्रतिकार करणाऱ्या शक्तिशाली अँटिबॉडी (Covid Antibodies) असल्याचं एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे.

नवी दिल्ली, 23 मार्च: दहा वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये(Children at age 10 or Less)कोविड -19ला(Covid 19)प्रतिकार करणाऱ्या अधिक शक्तिशाली अँटीबॉडी (Antibodies) असल्याचं एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे. जामा (JAMA) नेटवर्क ओपनवर प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन निबंधात हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये कोविड-19 चा संसर्ग होण्याचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामागचं कारण काय याबाबत संशोधन करण्यात येत आहे. त्यात हे आढळलं असून याबाबत आणखी संशोधन सुरू आहे. वेल कॉर्नेल मेडिसिन (Weill Cornell Medicine) या संस्थेतील संशोधकांच्या नेतृत्वाखालील पथकानं एप्रिल ते ऑगस्ट 2020 दरम्यान न्यूयॉर्क शहरातील सुमारे 32 हजार अँटिबॉडी चाचण्यांचा अभ्यास केला तेव्हा असं आढळलं की,1,200 मुले आणि 30,000 प्रौढांमध्ये आधी संसर्ग होऊन गेल्याचं प्रमाण अनुक्रमे 17 टक्के आणि 19 टक्के होतं. कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर का वाढवण्यात आलं? वैज्ञानिकांनी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेली 85 मुले आणि 3,648 प्रौढ व्यक्तींच्या सबसेटची तपासणी केली. त्याव्दारे इम्युनोग्लोबुलिन जी (आयजीजी)(Igg)अँटीबॉडीची पातळी तपासण्यात आली. निश्चित करण्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रकार आहे न्यूट्रलाइझिंग अँटीबॉडी जी विषाणूच्या(Virus)स्पाइक प्रोटीनशी बांधली जाते आणि विषाणूला पेशींवर आक्रमण करण्यापासून रोखते,त्या अँटीबॉडी ओळखण्याची ही महत्त्वाची चाचणी आहे. एक ते 10 वर्षे वयोगटातील 32 मुलांमध्ये 19 ते 24 वर्षे वयोगटातील 127 तरुण प्रौढांपेक्षा साधारण आयजीजीची पातळी पाच पट जास्त असल्याचं या अभ्यासात आढळून आलं आहे. अँटीबॉडीजची वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी नंतर तज्ज्ञांनी कोविड-19चा अनुभव आलेला नसलेल्या एक ते 24 वर्ष वयोगटातील 126 पॉझिटिव्ह रूग्णांच्या सबसेटवर लक्ष केंद्रित केले. Covid-19 शी लढण्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन; राज्यांना दिले 3 महत्त्वाचे आदेश या गटात, एक ते 10 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये 11 ते 18 वर्षे वयोगटातील पौगंडावस्थेतील मुलांच्या शरीरात आढळलेल्या आयजीजी अँटीबॉडीच्या पातळीपेक्षा दुप्पट पातळी आढळून आली. तर 19 ते 24 वर्षे वयोगटातील मुलांमधील सरासरीपेक्षा दुप्पट पातळी होती. या निष्कर्षांवरून असं दिसून येतं की प्रौढ रूग्णांच्या तुलनेत बाल रुग्णांमध्ये कोविड -19च्या रोगप्रतिकारक शक्तीतील फरक हा वयाशी संबंधित आहे,असं या संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. लहान मुले कोविड-19चा अधिक सक्षमपणे प्रतिकार करू शकतात, हे स्पष्ट झालं असलं तरीही मुलांना असणारे श्वसनाचे आजार आणि इतर गोष्टीही लक्षात घेणं गरजेचं आहे. मुलांमध्ये जन्मतःच चांगली प्रतिकारशक्ती असते. अँटीबॉडीज वाढण्याआधी मुलांच्या शरीरातील प्रतिकारक यंत्रणा आधी न्युट्रो फिल्ससारख्या पेशींच्या सहायानं शरीरात घुसलेल्या विषाणूंना ओळखून त्यावर मात करते,असं गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियातील (Austrelia) संशोधकांनी नेचर कम्युनिकेशन्सच्या (Nature Communications) एका संशोधन पत्रिकेत म्हटलं होतं. मुलांच्या श्वसनमार्गामध्ये ‘एसीई 2’(ACE-2)नावाच्या सेल रिसेप्टर्स असतात त्याद्वारे कोरोनाचा विषाणू आपल्या पेशींमध्ये प्रवेश मिळवतात. असा एक सिद्धांत मांडण्यात आला आहे. नवीन संशोधनातून एक विरोधाभासी निष्कर्ष असा पुढं आला आहे की,प्रतिजैविक पातळी तरुण प्रौढांसाठी सर्वात कमी होती;परंतु वयानुसार त्यात वाढ झाली. वृद्ध लोकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. दरम्यान,या संशोधनाच्या लेखकांनी हे मान्य केलं आहे की,मोठ्या वयातील व्यक्तींनां संसर्ग होण्यातली वाढ,त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागण्याचं मोठं प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण याबाबत ते स्पष्टपणे काही सांगू शकत नाहीत. केले. लठ्ठपणा(Obesity)ही कोविड-19च्या संसर्गासाठी मोठा जोखीम घटक आहे.सायटोकाईन स्टॉर्म नावाच्या प्रक्रियेमुळंरोगप्रतिकारक यंत्रणा कमजोर पडते आणि अवयव निकामी होत जातात. लठ्ठ लोकांमध्ये साइटोकाईन्स नावाच्या सिग्नलिंग प्रोटीनची पातळी अगदी प्राथमिक स्तरावर असल्यानं अँटीबॉडीज निर्माण होण्यावर परिणाम होतो,असंही संशोधकांनी नमूद केलं आहे.
First published:

Tags: Coronavirus, Covid-19

पुढील बातम्या