Corona Vaccination : मी डायबेटिक, ब्लड प्रेशर, हार्ट पेशंट रुग्ण आहे; मला कोरोना लस घेता येईल का?

Corona Vaccination : मी डायबेटिक, ब्लड प्रेशर, हार्ट पेशंट रुग्ण आहे; मला कोरोना लस घेता येईल का?

कोरोना लस (covid 19 vaccine) कुणी घ्यावी आणि कुणी नाही? याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) महाराष्ट्रातील अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे (Dr. Avinash bhondwe) यांनी मार्गदर्शन केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मार्च  : आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सनंतर सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण (Corona vaccination do and don'ts) होत आहे. आता 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांना इतर आजार आहेत आणि 60 पेक्षा जास्त वयाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक त्यांना ही लस (corona vaccine) दिली जात होती. पण आता 1 एप्रिलपासून  45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस (Covid 19 vaccine) दिली जाणार आहे. पण सरसकट सर्वांनाच कोरोना लस  घेता येईल असं नाही. काही जणांना विशिष्ट परिस्थितीत लस घेता येणार नाही. त्यामुळे मला कोरोना लस घेता येईल का? असा प्रश्न तुमच्याही मनात असेल. तुमच्या अशाच काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळतील.

कोरोना लस कुणाला घेता येईल आणि कुणाला नाही? याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) महाराष्ट्रातील अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे (Dr. Avinash bhondwe) यांनी मार्गदर्शन केलं आहे.

1) माझी बायको डायबेटिक आहे. ती लस घेऊ शकते का? (My wife is diabetic. Can she get Covid-19 vaccinated?)

डायबेटिज हा कोमॉर्बिड म्हणजे दीर्घकालीन आजारात गणला जातो. अशांना कोरोनाची लागण लवकर होते आणि झाल्यावर रुग्णाची तब्येत गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलीच पाहिजे. 1 मार्चपासून सुरू झालेल्या लसीकरणाच्या टप्प्यात 45 वर्षावरील वयाच्या कोमोर्बिड आजार असलेल्या व्यक्तींना हे लसीकरण उपलब्ध आहे. 60 वर्षांच्या वरील व्यक्तींनी आपलं नाव नोंदणी करून लस घ्यावी. 45 ते 59 वर्षे वयाच्या व्यक्तींना नाव नोंदवून घ्यावं आणि लसीकरणाला जाताना आपल्या डॉक्टरांकडून विहित नमुन्यातले सर्टिफिकेट घेऊन जाणं आवश्यक आहे.

2) मला दोन वेळा हार्ट अटॅक येऊन गेला आहे. मी लस घेऊ शकतो का? (I've had two heart attacks. Can I get vaccinated?)

हृदयविकाराचा झटका येणं हेदेखील कोमॉर्बिड म्हणजे दीर्घकालीन आजारामध्ये मोडतं. त्यामुळे लसीकरण नक्कीच करून घ्यावं. नोंदणी आणि लसीकरणाबाबतीत वरीलप्रमाणेच नियम आहेत.

3)  माझी नुकतीच बायपास सर्जरी झाली आहे. मी कोरोना लस घेऊ शकतो का? (I recently had bypass surgery. Can I get the corona vaccine?)

बायपास शस्त्रक्रिया हृदयविकारामध्येच केली जात असते. हा आजारही कोमॉर्बिड आजारांमध्ये येत असल्याने जरूर लसीकरण करून घ्यावं.

4) पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर माझ्या नवऱ्याला भरपूर औषधं आणि अनेक गोळ्या सुरू आहेत. त्यानं लस घ्यायची का? (My husband has been on a lot of medications and several pills since he had a paralysis attack. Should he get vaccinated?)

पॅरालिसिस म्हणजेच लकवा किंवा अर्धांगवायू. या आजाराचा समावेश कोमॉर्बिड आजारात होतो. त्यामुळेच त्यांनीही लसीकरण करून घ्यावं. नोंदणी आणि लसीकरणाबाबत वरीलप्रमाणेच नियम आहेत.

5) माझ्या वडिलांना कोरोना होऊन ते पंधरा दिवसांपूर्वीच पूर्ण बरे झाले आहेत. त्यांना लस द्यायची का? (My father had a corona and he was completely healed a fortnight ago. Should he get vaccinated?)

ज्यांना कोरोनाची लागण होऊ गेली आहे, अशांनी त्यातून बरे झाल्या दिवसानंतर 45 दिवसांनी लसीकरण करून घ्यावं.

6) या टप्प्यात 45 च्या खालच्या वयाच्या लोकांना लस घेता येत नाही. पण आम्ही आमच्या बाळाचं प्लॅनिंग करत आहोत. माझी बायको गरोदर राहिली तर तिला नंतर लस घेता येईल का? (People under the age of 45 cannot be vaccinated at this stage. But we are planning our baby. If my wife is pregnant, can she get vaccinated later?)

आजमितीला भारतात आणि जगभरात ज्या लशी उपलब्ध झाल्या आहेत, त्या 18 वर्षांखालील मुलं आणि गरोदर स्त्रियांनी घेऊ नयेत असं सांगितलं गेलं आहे. याचं कारण या लशींच्या चाचण्या या 18 वर्षांवरील व्यक्तींच्या आणि गरोदर नसलेल्या स्त्रियांच्याच घेतल्या गेल्या आहेत.

हे वाचा - मोदींव्यतिरिक्त अमेरिका, इस्राईलसह कोणत्या देशांच्या नेत्यांनी घेतलीये लस?

सध्या 18 वर्षांखालील मुला-मुलींच्या लशींच्या चाचण्या सुरू होत आहेत. त्या चाचण्यांमध्ये ती लस या वयोगटाला सुरक्षित आहे असं लक्षात आल्यावरच त्यांचं लसीकरण होऊ शकेल. हीच गोष्ट गरोदर स्त्रियांची आहे. गरोदर स्त्रियांना जेव्हा त्यांच्यासाठी सुरक्षित लस संशोधित होऊन उपलब्ध होईल तेव्हाच त्यांचं लसीकरण होऊ शकेल.

7) सध्या प्रेग्नन्सीमध्ये कोरोना लस घेता येत नाही पण जर गरोदरपणात कोरोना झाला असेल तर डिलीव्हरीनंतर कोरोना लस घेता येईल का? (Corona may have occurred during pregnancy but can be vaccinated after delivery?)

गरोदरावस्थेमध्ये कोरोना झाला असेल तर तिची प्रसूती झाल्यावर एक वर्षाने त्या स्त्रीला लस घेता येईल.

8)  नेहमीच्या ब्लड प्रेशर, डायबेटिसच्या गोळ्या घेऊन लस घेतली तर चालेल ना? (Is it okay to get vaccinated with regular blood pressure and diabetes pills?)

लस घ्यायला जाताना बीपी, मधुमेह किंवा इतर कोणत्याही आजाराच्या गोळ्या आपल्या नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे घ्याव्यातच.

9) लस घेताना खाऊन जायला हवं का? (Should I eat while taking the vaccine?)

लस घेण्यापूर्वी किमान 3 तास आधी काही खाऊन जावं. उपाशी पोटी कोणतीही वेदना सहन करण्याची शक्ती कमी असते. लशीचं इंजेक्शन घेताना जरी फारच कमी दुखत असलं, तरी रिकाम्यापोटी लस घेऊ नये.

10) लस घेतल्यानंतर काय होतं? साइड इफेक्ट्स काय? (What happens after vaccination? What are the side effects?)

आपल्या देशात कोरोनाच्या ज्या लशी दिल्या जात आहेत, त्याने कोणतेही गंभीर साईड इफेक्ट्स होत नाहीत. लस घेताना किंचितसं दुखतं, दुसऱ्या दिवशी इंजेक्शनच्या जागी दंडावर सूज येते. ती दोन-तीन दिवसानंतर आपोआप कमी होते. काही व्यक्तींना दोन दिवस ताप येतो, अंग-हातपाय दुखतात, खूप गळून गेल्यासारखं वाटतं. मात्र ही लक्षणंही दोन-तीन दिवसात त्वरित कमी होतात.

हे वाचा - Corona vaccine ची जादू; फक्त कोरोनाच नाही तर 'या' आजारांनाही देतेय टक्कर

क्वचित प्रसंगी काहींना लस घेतल्यानंतर गरगरतं, पण त्यासाठी आपल्याला अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबवलं जातं. काही इतर त्रास झाल्यास डॉक्टर्स आणि उपचाराची सोय असते. कोरोनाची लस घेतल्यावर भारतात आजपर्यंत एकही गंभीर घटना घडलेली नाही. लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे.

11) लस घेतल्यानंतर मला ताप आला तर काय करायचं? कुठली गोळी घ्यायची? (What to do if I get fever after vaccination? Which pill to take?)

लस घेतल्यावर 100 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ताप आल्यास पॅरासिटेमॉलची 500 मिलिग्रॅमची एक गोळी घ्यावी. मात्र ताप येईल म्हणून लसीकरणाआधी ती मुळीच घेऊ नये.

12) लस घेतल्यानंतर कोरोना होऊ शकतो का? (Can I get infected with coronavirus even after vaccination?)

कोरोनाची लस ही एम-आरएनए पद्धतीची आहे. ती घेतल्यामुळे कोरोना होत नाही. मात्र लशीचा पहिला डोस घेतल्यावर 15 दिवसांनी त्या व्यक्तीमध्ये प्रतिपिंडे तयार होऊ लागतात. त्यानंतर शरीरात 50 टक्के प्रतिकार शक्ती येते. पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. तो घेतल्यानंतर 15 दिवसांनी शरीरात एकूण 95 टक्के प्रतिपिंडे तयार होतात. याचाच अर्थ लस घेतली तरी आपण कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलो, तर पहिल्या 15 दिवसात बाधा होण्याची शक्यता 100 टक्के असते, 15 दिवस ते 43 दिवस या काळात ही शक्यता 50 टक्के असते. त्यानंतरही पुढे बाह्य संसर्गामुळे कोरोना होण्याची शक्यता 95 टक्के राहते.

हे वाचा - Covaxin की Covishield; तुम्हाला घेता येईल का तुमच्या पसंतीची कोरोना लस?

कोरोनाच्या सध्याच्या लशीचा परिणाम 1 वर्ष टिकतो असं सध्या सांगितलं जात आहे. याचा अर्थ एक वर्षानंतर बाह्य संसर्गामुळे पुन्हा कोरोनाची बाधा होण्याची शक्यता टाळता येत नाही.

13) माझ्या व्यवसायासाठी मला फिरावं लागतं. लस घेतल्यानंतर मी लगेच प्रवास करू शकतो का? (I have to travel for my business. Can I travel immediately after vaccination?)

लस घेतल्यानंतर काही व्यक्तींना गरगरू शकतं. त्यापुढील 3 ते 7 दिवसात ताप येणं, अंग दुखणं, मळमळणं अशी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे लस घेतल्यावर किमान आठवडाभर खूप लांबच्या प्रवासाला लगेच जाऊ नये. आपल्या गावातील अत्यावश्यक कामांसाठी आपण फिरू शकता. आपल्या कामाला जायलाही हरकत नसते.

14) शारिरीक कष्टाची कामं करते. लस घेऊन लगेच कामाला जाऊ शकते का? (I am doing physical hardwork. Can I get vaccinated and go to work immediately?)

आपल्या रोजच्या कामांना हरकत नसते. शारीरिक कष्टाची कामं असल्यास किमान दोन-तीन दिवस तब्येतीचं निरीक्षण करावं लागतं. ताप, अंगदुखी असे त्रास असल्यास शक्तीची कामं होऊ शकत नाहीत. साहजिकच किमान तीन दिवस कामावरून रजा घ्यावी.

15) लस घेतल्यानंतर स्तनपान करू शकतो का? (Can I breastfeed after vaccination?)

ज्या महिलांना एक वर्षाचे बाळ आहे आणि ज्या त्यांना स्तनपान करतात, अशा मातांनी लस घेऊ नये. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना फारशा स्पष्ट नाहीत. मात्र मातेने लस घेतल्यावर त्याचा अंश तिच्या दुधात उतरतो. त्याचा परिणाम बालकांवर काय होतो यावर संशोधन झालं नसल्याने सध्यातरी एक वर्षापर्यंत वयाचे बाळ असलेल्या स्त्रियांनी लस घेऊ नये. त्यामुळे स्तनपानाचा प्रश्न येतच नाही.

संकलन - प्रिया लाड

Published by: Priya Lad
First published: March 23, 2021, 9:00 PM IST

ताज्या बातम्या