Home /News /explainer /

Explainer: विवाह नोंदणी करणं का आहे आवश्यक? Marriage Certificate बद्दल जाणून घ्या सर्व माहिती ...

Explainer: विवाह नोंदणी करणं का आहे आवश्यक? Marriage Certificate बद्दल जाणून घ्या सर्व माहिती ...

Marriage Certificate किंवा लग्नाचं प्रमाणपत्र न घेतल्यानं अनेक कायदेशीर बाबींमध्ये अडथळे येतात. ते कसं मिळवायचं, कुठे आणि कसा करायचा अर्ज? वाचा सगळ्या प्रश्नांची उत्तरं...

    नवी दिल्ली, 18 जून: सध्या तृणमूल कॉंग्रेसची (TMC MP) खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहां (Nusrat Jahan) आणि उद्योगपती निखिल जैन यांचं लग्न मोडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तुर्कस्तानात लग्न केल्यानं ते भारतात वैध नाही त्यामुळे आपल्याला घटस्फोटाची (Divorce) आवश्यकता नाही, असं नुसरत जहाँचं म्हणणं आहे. यामुळे देशातील विवाह नोंदणी कायद्यावर (Marriage Registration Act) चर्चा सुरू झाली. लग्नाचं प्रमाणपत्र न घेतल्यानं अनेक कायदेशीर बाबींमध्ये अडथळे येतात. त्यामुळं विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेणं महत्त्वाचं आहे. जाणून घेऊ याबाबत सर्व माहिती... भारतातील विवाह प्रमाणपत्राचं महत्त्व काय आहे? आपण विवाहित आहोत याची ही एक प्रकारची अधिकृत घोषणा असते. भारतात विवाह नोंदणीसाठी दोन कायदे आहेत. एक म्हणजे हिंदू विवाह कायदा (1955) (Hindu Marriage Act-1955) आणि दुसरा विशेष विवाह कायदा (1954). हिंदू विवाह कायद्यांतर्गत,  दोन्ही पक्ष अविवाहित किंवा घटस्फोटित असतील किंवा पहिल्या लग्नाच्या वेळी जोडीदार जिवंत नसेल तर लग्न केले जाऊ शकते. हा कायदा हिंदूंना लागू आहे, तर विशेष कायदा भारतातील सर्व नागरिकांना लागू आहे. हे दोन्ही कायदे हे निश्चित करतात की, एखाद्या जोडप्यानं लग्न केले आहे आणि दोघांवर एकमेकांबद्दल काही कायदेशीर जबाबदाऱ्या आहेत. 2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लग्नाचे प्रमाणपत्र बनवण्याचा निर्णय घेतला. स्त्रियांना त्यांचा हक्क मिळवून देणे हा त्याचा हेतू होता. नोंदणी केली नसेल तर काय होते ? एखाद्यानं लग्नाची नोंदणी केली नाही, तर त्याचा विवाह अवैध ठरतो का? या प्रश्नाचे उत्तर आहे -नाही. विवाहाची नोंदणी केली नाही आणि सामाजिक पुरावे असतील, तर ते लग्न वैध आहे. घटस्फोटाची कारवाईही याच पद्धतीनं केली जाईल. विवाहाची नोंदणी करणं हा लग्नाचा कायदेशीर पुरावा आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र अनेक ठिकाणी महत्त्वाचे ठरते. मुलाचा ताबा मिळवणे, विमा दावा, बँकेतील नॉमिनेशन आणि वारसा हक्कासाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त आहे. हे ही वाचा:खांद्यावर हात ठेवला आणि...; नवऱ्याच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरी शॉक देशात विवाह नोंदणी प्रमाणपत्र कोण जारी करते? हिंदू कायद्यांतर्गत विवाह नोंदणीसाठी, पती-पत्नी ज्या भागात राहतात त्या भागाच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करता येईल. हा अर्ज सरकारी सुट्टीचा दिवस वगळता कोणत्याही दिवशी करता येतो. देशात कोठेही विवाह नोंदणीसाठी अर्ज करता येतो का ? हा अर्ज ज्या भागात त्या जोडप्याचे वास्तव्य आहे त्या क्षेत्राच्या दंडाधिकाऱ्याच्या कार्यालयात करता येतो. हे केवळ ऑफलाइन नोंदणीसाठी आहे. आता ऑनलाइन नोंदणीदेखील करता येते. पासपोर्टसाठी अर्ज करताना लग्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे का? नवीन पासपोर्ट नियमांनुसार वर्ष 2018 मध्ये पासपोर्ट(Passport) बनविताना विवाह प्रमाणपत्र आवश्यक नाही, असा निर्णय घेण्यात आला. लग्नात अडचणी येत असलेल्या स्त्रियांना पासपोर्टमध्येही यामुळे अडचणी येत होत्या. अशा प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. आता लग्नाशिवाय जन्मलेल्या मुलांकडेही पासपोर्ट असू शकतो. मात्र यासाठी काही वेगळे नियम आहेत. विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी किती वेळ लागेल? आता ही प्रक्रिया खूपच वेगवान झाली आहे. आता केवळ 7 ते 15 दिवसात प्रमाणपत्र मिळते. मात्र  यासाठी जोडप्याला दंडाधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन काही फॉर्म भरावे लागतात. याशिवाय ऑनलाइन नोंदणीमध्ये (online Registration) कार्यालयात अपॉईंटमेंट मिळण्यास काही दिवसांचा कालावधी लागतो. हिंदू विवाह कायद्याअंतर्गत अपॉईंटमेंट मिळण्यास सुमारे 15  दिवस लागतात, विशेष विवाह कायद्यांतर्गत 30 दिवसांचा कालावधी लागू शकतो. हे ही वाचा: Ration Card बनवताना ‘या’ गोष्टींची काळजी घेणं आवश्यक लग्नाचे प्रमाणपत्र बनवणे महाग आहे का? त्यासाठी किती खर्च येतो ? हिंदू विवाह कायद्यांतर्गत विवाह नोंदणीसाठी फक्त 100 रुपये शुल्क आहे. ही अर्जाची फी आहे. तर विशेष विवाह कायद्यात ही फी 150 रुपये आहे. याशिवाय अर्जासह जमा कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रासाठी 400 ते 500 रुपये खर्च येतो. विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? ऑनलाइन नोंदणी करायची असेल तर त्यासाठी संबंधित राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. ज्या जिल्ह्यात आपण राहतो तो जिल्हा निवडा. इथं नोंदणीचा पर्याय मिळेल ज्यावर क्लिक करून आपल्याला सर्व माहिती भरावी लागेल. सर्व माहिती काळजीपूर्वक तपासल्यानंतर सबमिट करा. यानंतर नोंदणीसाठी तारीख मिळते. हिंदू विवाह कायद्यांतर्गत सुमारे दोन आठवड्यांच्या आत आणि विशेष कायद्यांतर्गत एका महिन्यात नोंदणी केली जाते.
    Published by:Prem Indorkar
    First published:

    Tags: Marriage, Wedding rules

    पुढील बातम्या