Home /News /lifestyle /

Ration Card बनवताना ‘या’ गोष्टींची काळजी घेणं आवश्यक

Ration Card बनवताना ‘या’ गोष्टींची काळजी घेणं आवश्यक

रेशन कार्ड मिळण्यात अडचणी येऊ शकतात. अशाच काही बाबींबद्दल आम्ही आज माहिती देत आहोत, ज्यांची काळजी घेऊन आपण यातील समस्या टाळू शकता.

    मुंबई 17 जून: रेशन कार्ड (Ration Card) हे भारत सरकारची (Indian Government) मान्यता असलेल्या महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. यामुळे स्वस्त दरात धान्य मिळण्याच्या सुविधेचा लाभ घेता येतोच तसंच सरकारी कामांमध्ये आणि अन्य ठिकाणी ओळखपत्र म्हणूनही ते उपयोगी ठरते. त्यामुळं रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. तुम्हाला नवीन रेशन कार्ड बनवून घ्यायचे असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बर्‍याच वेळा रेशन कार्डसाठीच्या फॉर्ममध्ये अपूर्ण माहिती भरली जाते, त्यामुळं तो रद्द केला जाऊ शकतो. याशिवाय अन्य काही त्रुटी राहिल्यास रेशन कार्ड मिळण्यात अडचणी येऊ शकतात. अशाच काही बाबींबद्दल आम्ही आज माहिती देत आहोत, ज्यांची काळजी घेऊन आपण यातील समस्या टाळू शकता. सर्वप्रथम आपल्याला आवश्यक असलेले रेशन कार्ड कोणत्या श्रेणीचे असावे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर  आपण देत असलेले दस्तऐवज प्रमाणित आहेत की नाहीत, आपले वय बरोबर आहे की नाही, सर्व सदस्यांच्या वयात तफावत तर नाही नां, या बाबींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आर्थिक स्थितीनुसारच आपलं रेशन कार्ड बनवलं जातं, हेही लक्षात घ्या. SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! चुकूनही करू नका ही 3 कामं, वाचा बँकेने काय म्हटलं? रेशन कार्ड बनवताना या गोष्टी लक्षात ठेवाः 1) फी किती आहे हे जाणून घ्या : रेशनकार्ड बनविणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. सध्या देशात 4 प्रकारची रेशनकार्डस तयार केली जातात. काही राज्य सरकारं त्यांच्या राज्यात स्वतंत्र रेशनकार्डही बनवत आहेत. म्हणूनच, तुम्ही रेशन कार्ड बनवत असाल तर अर्ज करताना फॉर्ममध्ये चुका करू नका. केवळ आपल्या श्रेणीचा फॉर्म भरा. बर्‍याच राज्यांत रेशनकार्ड विनामूल्य बनवून दिली जातात, तर काही राज्यात 5  ते 40 रुपये शुल्क (Charges) आकारले जाते. 2) चार प्रकारची रेशनकार्डस असतात: रेशनकार्डचे अनेक प्रकार आहेत. आर्थिक स्थितीच्या आधारे बीपीएल (BPL), एपीएल (APL), एएवाय (AAY) आणि एवायवाय (AYY) अशा चार प्रकारची कार्डे बनविली जातात. रेशनकार्डच्या सहाय्यानं लोक सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत स्वस्त धान्य दुकानांत बाजारभावापेक्षा बर्‍याच कमी किंमतीत धान्य खरेदी करू शकतात. दरमहा केवळ 240 रुपये देऊन मिळवा 1 कोटींचा हेल्थ इन्शुरन्स, कॅशलेस क्लेम 20 मिनिटात होईल अप्रूव्ह 3) अर्ज करताना ही कागदपत्रं आवश्यक : रेशन कार्ड बनविण्यासाठी ओळख पुरावा (ID Proof) म्हणून आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, शासनानं दिलेलं कोणतंही ओळखपत्र, हेल्थ कार्ड,  ड्रायव्हिंग लायसन्स देता येईल. या व्यतिरिक्त पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो, उत्पन्नाचा दाखला, विजेचे बिल,  गॅस कनेक्शन बुक,  टेलिफोन बिल,  बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, भाडे कराराची कागदपत्रे पत्त्याचा पुरावा (Address Proof) म्हणून आवश्यक असतील. 4) रेशन कार्डद्वारे अनुदानित धान्य मिळते : याचा उपयोग अनुदानित किंमतीनं मिळणारे अन्नधान्य किंवा इतर सरकारी सुविधा घेण्यासाठी केला जातो. स्वस्त धान्य दुकानात रेशन कार्डावर साखर, गहू, तांदूळ, डाळी, तेल अशा अनेक जीवनावश्यक वस्तू अगदी स्वस्त किमतीत मिळतात. रेशन कार्डवर जितक्या व्यक्तींची नावं असतील त्या प्रमाणात अन्नधान्य मिळते. दारिद्र्यरेषेखालील तसंच आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांसाठी हा मोठा आधार आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Ration card

    पुढील बातम्या