मराठी बातम्या /बातम्या /explainer /

वाद घालताना लोक मोठमोठ्याने का ओरडतात? स्टॅनफोर्ड विद्यापीठात संधोशन

वाद घालताना लोक मोठमोठ्याने का ओरडतात? स्टॅनफोर्ड विद्यापीठात संधोशन

माणसांच्या (Humans) वर्तनावर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, ओरडण्याच्या (Shouting) कृतीचा कधीच फायदा होत नाही आणि याचे कारण म्हणजे आत्मविश्वासाचा (confidence) अभाव.

माणसांच्या (Humans) वर्तनावर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, ओरडण्याच्या (Shouting) कृतीचा कधीच फायदा होत नाही आणि याचे कारण म्हणजे आत्मविश्वासाचा (confidence) अभाव.

माणसांच्या (Humans) वर्तनावर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, ओरडण्याच्या (Shouting) कृतीचा कधीच फायदा होत नाही आणि याचे कारण म्हणजे आत्मविश्वासाचा (confidence) अभाव.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 4 डिसेंबर : जगात दिवसेंदिवस गोंगाट वाढत आहे. ध्वनी प्रदूषण ही आधीच मोठी समस्या बनत चालली आहे, पण त्यासोबतच माणसांमध्ये ओरडण्याची प्रवृत्तीही वाढत आहे. सामान्यतः लोक रागात असताना ओरडतात (Shouting) किंवा चर्चा विकोपाला गेली तरी आवाज आपोआप वाढायला लागतो. पण कितीही वाद झाला तरी आरडाओरडा कधीच कुणाला मदत करत नाही. आरडाओरडा करून विरोधकांचे मन वळवू शकत नाही. अशा परिस्थितीत माणूस का ओरडतो असा प्रश्न पडतो. एका नव्या संशोधनात या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. याचं उत्तर आहे आत्मविश्वासाचा अभाव (lack of Confidence).

आत्मविश्वासाचा अभाव

मानवी वर्तनावर जगात अनेक प्रकारची संशोधने झाली आहेत. यामध्ये ओरडण्याच्या वर्तनाचा अभ्यास समाविष्ट आहे. कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या सहयोगी प्राध्यापक आणि सामाजिक मानसशास्त्रज्ञ व्हेनेसा बोन्स यांनी यावर अभ्यास केला. त्यांचं हे संशोधन वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे. यातील एका लेखात ते म्हणतात, आपल्या मतांवर अतिविश्वास असणारी लोकं आणि आत्मविश्वासाचा अभाव असणाऱ्या लोकांमध्यो ओरडण्याचं प्रमाण जास्त आहे.

फक्त अतिआत्मविश्वासाबद्दल?

बऱ्याच काळापर्यंत असं वाटत होतं की लोकांमध्ये अतिआत्मविश्वास असण्याची कारणं संशोधक शोधत होती. मात्र, 2002 मध्ये स्टॅनफोर्ड संशोधकांनी केलेल्या तीन सर्वेक्षणात असे आढळून आले की सहभागींनी स्वतःला इतरांपेक्षा कमी पक्षपाती असल्याचे सांगितले. अनेक सहभागींना तर त्यांचं मत इतरांपेक्षा पक्षपाती असल्याचे माहिती असूनही त्यांची ते बदलयाची इच्छा नव्हती.

यापूर्वी ही धारणा होती

तत्सम पद्धतींचा वापर करून संशोधकांना असे आढळून आले की सरासरी व्यक्ती स्वतःला नैतिकता, कलात्मकता, क्रीडा इत्यादी अनेक बाबतीत इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो, जे सांख्यिकीयदृष्ट्या शक्य नाही. या परिणामांच्या विपरीत अलीकडील संशोधनाने एका वेगळ्या निकालाकडे लक्ष वेधलं आहे.

जीवनात आनंद मिळवण्यासाठी महिलांनी काय करावं? तज्ञांनी सांगितला उपाय

सामाजिक समस्यांवर सर्वेक्षण

जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकॉलॉजी मधील 2017 च्या अभ्यासात, सहभागींना कोणाचे अधिक मित्र आहेत, कोण सामाजिक गटांमध्ये अधिक भाग घेतो, कोणाचे सोशल नेटवर्क मोठं आहे अशा प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले होते. या अभ्यासातील सहभागींनी अनेक गैर-सामाजिक बाबींमध्ये अतिआत्मविश्वास दाखवला.

एका दिवसात किती मांस खावं? ब्रिटीशांनी सेवन कमी का केलं?

सामाजिक बाबतीत कमी आत्मविश्वास

या अभ्यासाच्या परिणामांमध्ये असे आढळून आले की जेव्हा आपल्या सामाजिक कौशल्यांबद्दल आपल्या विश्वासाचा विचार केला जातो तेव्हा सहभागींमध्ये या संदर्भात आत्मविश्वासाचा अभाव दिसून आला. त्यांनी हे मान्य केलं की त्यांचे इतरांपेक्षा कमी मित्र आहेत, त्यांचे मित्र मंडळी लहान आहे, त्यांचे सोशल नेटवर्कही कमी आहे.

आत्मविश्वासावर परिणाम होतो

गेल्या पाच वर्षांत प्रकाशित झालेल्या इतर अनेक अभ्यासांतही लोकांचा सामाजिक विषयांवरचा विश्वास कमी असल्याचे दिसून आले आहे. स्वतःला इतरांपेक्षा अधिक नैतिक आणि कमी पक्षपाती मानन्याचा लोकांचा विश्वास त्यांच्यात अतिआत्मविश्वास निर्माण करतो. त्याचप्रमाणे, लक्ष न देणे किंवा इतरांच्या बोलण्याकडे लक्ष न देणे अशा सवयींमुळे आत्मविश्वास कमी होतो. ओरडणे म्हणजे ही उणीव भरून काढण्याचा एक प्रयत्न आहे.

हाडांच्या दुखापतीकडे करू नका दुर्लक्ष; असू शकतं मोठ्या आजाराचं संकेत

आपण ओरडतो कारण आपल्याला वाटतं की लोक इतर मार्गाने ऐकणार नाहीत. ही प्रभावी पद्धत अगदी उलट परिणाम देते. लोक प्रिस्क्रिप्टिव्ह सूचनांऐवजी सौम्य, विनम्र सूचना घेण्यास प्राधान्य देतात. वास्तविकता अशी आहे की जेव्हा आपण बोलत असताना, चर्चा करताना आणि सूचना देताना सभ्य असतो तेव्हा आपल्या शब्दांचा अधिक प्रभाव पडतो.

First published: