मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हाडांच्या दुखापतीकडे करू नका दुर्लक्ष; असू शकतं मोठ्या आजाराचं संकेत

हाडांच्या दुखापतीकडे करू नका दुर्लक्ष; असू शकतं मोठ्या आजाराचं संकेत

- हाडांना ताकद देते
नारळाचे पाणी केवळ उच्च रक्तदाब नियंत्रित करत नाही, तर हाडांशी संबंधित अनेक आजारांवरही त्याचा फायदा होतो. नारळाच्या पाण्यात कॅल्शियम असते, जे दात आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे.

- हाडांना ताकद देते नारळाचे पाणी केवळ उच्च रक्तदाब नियंत्रित करत नाही, तर हाडांशी संबंधित अनेक आजारांवरही त्याचा फायदा होतो. नारळाच्या पाण्यात कॅल्शियम असते, जे दात आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे.

वाढत्या वयानुसार आपली हाडं ठिसूळ (brittle bones) होतात, ही गोष्ट तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे कधी एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या शरीरातलं हाड मोडलं, की आपण सगळा दोष वयाच्या माथी मारून मोकळे होतो; मात्र वाढलेलं वय हेच प्रत्येक वेळी हाड मोडण्याचं कारण असेल असं नाही.

पुढे वाचा ...

 मुंबई,4  डिसेंबर-    वाढत्या वयानुसार आपली हाडं ठिसूळ   (brittle bones)   होतात, ही गोष्ट तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे कधी एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या शरीरातलं हाड मोडलं, की आपण सगळा दोष वयाच्या माथी मारून मोकळे होतो; मात्र वाढलेलं वय हेच प्रत्येक वेळी हाड मोडण्याचं कारण असेल असं नाही. काही वेळा हाड मोडणं ही ऑस्टिओपोरॉसिसची   (Osteoporosis)   सुरुवातसुद्धा असू शकते. ऑस्टिओपोरॉसिस ही सहज आढळणारी समस्या आहे. जागतिक पातळीवर 200 दशलक्षांहून अधिक नागरिक या आजारानं ग्रस्त आहेत. एका अभ्यासानुसार, भारतातल्या 6.9 ते 18.3 टक्के नागरिकांना ऑस्टिओपोरॉसिस आहे. यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. विशेषत: मेनोपॉज (Menopause) अर्थात मासिक पाळी थांबल्यानंतर महिलांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. 'लाइव्ह हिदुस्तान'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

हा आजार का होतो, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता असते, तेव्हा हाडं कमकुवत होऊ लागतात. तज्ज्ञांच्या मते, ही समस्या विशेषतः वृद्धांमध्ये असते. शरीरातल्या हार्मोन्समधल्या बदलांमुळे असं होतं. कमकुवत पचनसंस्थेमुळेदेखील (Digestive system) शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवते. मेनोपॉजमुळे महिलांमध्ये कॅल्शियम कमी होण्याचं प्रमाण जास्त आहे. मेनोपॉजदरम्यान इस्ट्रोजेन (Estrogen) नावाच्या हॉर्मोनची कमतरता जाणवते. हे हॉर्मोन हाडांमध्ये कॅल्शियम जमा करण्यास मदत करते. विशेष म्हणजे ही समस्या केवळ वृद्धांनाच नाही, तर लहान वयातही जाणवू शकते. मधुमेह, संधिवात, किडनी, यकृताचे गंभीर आजार असल्यास ऑस्टिओपोरोसिसचा त्रास जाणवू शकतो.

ऑस्टिओपोरॉसिसची लक्षणं (Symptoms of osteoporosis)

आरोग्याची कोणतीही समस्या अचानक तयार होत नाही. समस्या पूर्णपणे समोर येण्याअगोदर तिची काही लक्षणं दिसतात. ऑस्टिओपोरॉसिसचीदेखील काही लक्षणं आहेत. हाडं आणि सांधे दुखणं, स्नायू कमकुवत झाल्याची जाणीव होणं, अशी लक्षणं दिसू लागतात. कधी कधी किरकोळ दुखापत होऊन मणका, नितंब आणि मनगटाची हाडं तुटण्याचाही धोका असतो. यापैकी एखादी समस्या तुम्हाला जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

खाण्या-पिण्याच्या सवयी बदलण्याची आवश्यकता

आपल्या शरीरातल्या हाडांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी व्हिटॅमिन-डी (Vitamin-D) आणि कॅल्शियम (Calcium) या दोन घटकांची सर्वांत जास्त गरज असते. या दोन घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असलेल्या खाद्यपदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करावा. सूर्यप्रकाशातून नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन डी मिळतं. शरीरातली कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी विविध खाद्यपदार्थांचीही मदत घेऊ शकता. शाकाहारी असाल, तर दूध, दुधाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, चिया सीड्स, नाचणी, सोया मिल्क, बदाम अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश करू शकता. मांसाहारी व्यक्ती सार्डिन, साल्मन मासे खाऊ शकतात. व्हिटॅमिन डीसाठी मशरूम हा एक चांगला पर्याय आहे.

(हे वाचा:Skin Care : झोपण्यापूर्वी या गोष्टी करण्यास विसरू नका; पिंपल्स होतील लगेच कमी)

आपल्यापैकी जवळपास सर्वांचीच सकाळ चहा किंवा कॉफी पिऊन सुरू होते; मात्र असं करण्यानं आपण नकळत आपल्या हाडांच्या आरोग्यावर ताण टाकत आहोत. चहा आणि कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळं (Caffeine) आपलं शरीर ऑस्टिओपोरॉसिससाठी अनुकूल होतं. दररोज 300 मिलीग्रॅमपेक्षा जास्त प्रमाणात कॅफीन घेतल्यास लघवीवाटे कॅल्शियम बाहेर जाण्याचं प्रमाण वाढतं. ज्या महिला दिवसाला चारपेक्षा जास्त कप कॉफी किंवा चहा पितात त्यांना ऑस्टिओपोरॉसिसचा धोका जास्त असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

हाडं मजबूत करण्यासाठी चांगल्या आहारासोबत व्यायामाचीही (Exercise) आवश्यकता असते. व्यायामामुळे हाडांची झीज कमी होते. आठवड्यातून तीन ते चार दिवस व्यायाम केल्यानं स्नायू आणि हाडांमधलं रक्ताभिसरण व्यवस्थित राहतं. हाडांच्या मजबुतीसाठी प्राणायामही (Pranayama) फायद्याचा आहे. खोल श्वासोच्छ्वास आणि श्वास रोखून ठेवल्यानं आयसोमेट्रिक आकुंचन होतं. त्यामुळे स्नायू बळकट होतात.ऑस्टिओपोरॉसिस ही एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे हाडांच्या लहानात लहान दुखापतींकडेदेखील दुर्लक्ष करू नका.

First published:

Tags: Fitness, Health Tips