मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

जीवनात आनंद मिळवण्यासाठी महिलांनी काय करावं? तज्ञांनी सांगितला उपाय

जीवनात आनंद मिळवण्यासाठी महिलांनी काय करावं? तज्ञांनी सांगितला उपाय

एका विशिष्ट वयात स्वतःकडे लक्ष न दिल्यानं, स्वतःची काळजी न घेतल्यानं अभिनेत्री मंदिरा बेदीला (Actress Mandira Bedi) अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. स्वतःकडे खूप दुर्लक्ष केल्याची खंत आता वाटते, असं ती वयाच्या 45 वर्षी जाहीरपणे सांगते. आता स्वतःवर जितकं प्रेम करते, ते वयाच्या 20व्या किंवा 30व्या वर्षी केलं असतं तर किती बरं झालं असतं, असा प्रश्नही तिच्या मनात येतो.

एका विशिष्ट वयात स्वतःकडे लक्ष न दिल्यानं, स्वतःची काळजी न घेतल्यानं अभिनेत्री मंदिरा बेदीला (Actress Mandira Bedi) अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. स्वतःकडे खूप दुर्लक्ष केल्याची खंत आता वाटते, असं ती वयाच्या 45 वर्षी जाहीरपणे सांगते. आता स्वतःवर जितकं प्रेम करते, ते वयाच्या 20व्या किंवा 30व्या वर्षी केलं असतं तर किती बरं झालं असतं, असा प्रश्नही तिच्या मनात येतो.

एका विशिष्ट वयात स्वतःकडे लक्ष न दिल्यानं, स्वतःची काळजी न घेतल्यानं अभिनेत्री मंदिरा बेदीला (Actress Mandira Bedi) अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. स्वतःकडे खूप दुर्लक्ष केल्याची खंत आता वाटते, असं ती वयाच्या 45 वर्षी जाहीरपणे सांगते. आता स्वतःवर जितकं प्रेम करते, ते वयाच्या 20व्या किंवा 30व्या वर्षी केलं असतं तर किती बरं झालं असतं, असा प्रश्नही तिच्या मनात येतो.

पुढे वाचा ...

मुंबई, 4 डिसेंबर : धावपळीची जीवनशैली, वाढत्या जबाबदाऱ्या आणि ताणतणावामुळे बहुतांश व्यक्ती स्वतःच्या आरोग्याकडे (Health), व्यक्तिमत्त्वाकडे (Personality) दुर्लक्ष करतात. स्वतःची अशी एक स्पेस (Space) असते हेदेखील विसरून जातात. जीवनाच्या एका टप्प्यावर याची जाणीव होते आणि आपण काही गोष्टी गमावल्याची भावना मनात तयार होते. विशेषकरून महिलांच्या बाबतीत (Women) ही गोष्ट अधिक प्रमाणात घडते. घरातल्या जबाबदाऱ्या, कुटुंबाची देखभाल, नोकरीतले ताणतणाव आदी गोष्टींमुळे महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात. परंतु, ही गोष्ट भविष्यात महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकते, असं तज्ज्ञ सांगतात. स्वतःकडे दुर्लक्ष झाल्यानं भविष्यात होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी काही उपाय करता येणं शक्य आहे. महिलांनी स्वतःवर प्रेम करण्यासाठी नेमकं काय करावं, याविषयी तज्ज्ञांनी काही टिप्सदेखील सांगितल्या आहेत.

एका विशिष्ट वयात स्वतःकडे लक्ष न दिल्यानं, स्वतःची काळजी न घेतल्यानं अभिनेत्री मंदिरा बेदीला (Actress Mandira Bedi) अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. स्वतःकडे खूप दुर्लक्ष केल्याची खंत आता वाटते, असं ती वयाच्या 45 वर्षी जाहीरपणे सांगते. आता स्वतःवर जितकं प्रेम करते, ते वयाच्या 20व्या किंवा 30व्या वर्षी केलं असतं तर किती बरं झालं असतं, असा प्रश्नही तिच्या मनात येतो. या चुकीचं दुःख आता जाणवत असल्याचं मंदिरा बेदी सांगते; पण ही स्थिती केवळ मंदिरा बेदीची नाही, तर बहुतांश महिलांची आहे. यासाठी महिलांनी स्वतःची काळजी घेणं, स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे. स्वतःतले चांगले गुण विकसित करणं गरजेचं आहे. यासाठी काही उपाय नक्कीच करता येतील.

महिलांनी काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. तुम्ही काही चांगलं काम केलं असेल, तर त्याचं कौतुक तुम्ही स्वतः केलं पाहिजे. मिळवलेलं यश घरात फ्रेम करून लावलं पाहिजे. यातून तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल.

जमिनीवर बसून जेवल्यामुळे आरोग्याला होतात इतके फायदे, वाचा जेवण्याची योग्य पद्धत

महिलांनी दररोज हसत-खेळत राहिलं पाहिजे. भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी, दुःखद घटना विसरल्या पाहिजेत. अशा गोष्टी विसरण्यासाठी काही विशिष्ट मार्गांचा अवलंब केला पाहिजे. स्वतःला जेव्हा सर्जनशील वाटतं, त्या वेळेकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा वेळी महिलांनी स्वतःसाठी आवर्जून वेळ काढला पाहिजे. काही नवा विचार केला पाहिजे. जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या नादात ती वेळ कदापि दवडू नये. स्वतःसाठी दिवसभरात एक वेळ निश्चित करावी आणि त्या वेळेचा वापर योग्य गोष्टींसाठी करावा. या गोष्टी केल्यास काही दिवसांत महिलांना त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल (Positive Changes) दिसेल.

तसंच, महिलांनी स्वतःची क्षमता प्रमाणापेक्षा जास्त वापरू नये. त्याचप्रमाणे कायम परफेक्ट (Perfect) राहण्याच्या प्रयत्नात अडकून राहू नये. नेहमीच स्वतःला परिपूर्णतेच्या वर्तुळात बसवण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. महिलांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातल्या कमकुवत बाबी ओळखून त्यात सुधारणा करावी. स्वतःची चूक माफ करायला शिकावं.

आरोग्य चांगलं असेल, तर आयुष्य जगणं सोपं होतं. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याकडे प्रथम लक्ष द्यावं. व्यायाम, योगासनं आणि पोषक आहार यास प्राधान्य द्यावं. वेळेवर झोपावं आणि उठावं. हे थोडंसं आत्मकेंद्रित होऊ शकतं; पण आरोग्य चांगलं राहिलं तरच तुम्ही जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल. काही जणींना एका विशिष्ट कक्षेबाहेर जाणं आवडत नाही. एखादी गोष्ट केली तर लोक काय म्हणतील, आपल्याला ती जमेल का, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येतात. अशा गोष्टींची त्यांना भीतीदेखील वाटते. मनाला त्रासदायक ठरणारे असे प्रश्न सर्वप्रथम बाजूला करावेत आणि जीवनाचा पूर्ण आनंद घ्यावा. हीच स्वतःवर प्रेम करण्याची सुरुवात असेल.

BMDTest: हाडांच्या त्रासाचे निदान होईल 25 मिनिटात; या चाचणीतून होणार सर्व खुलासा

दररोज काही नवीन शिकायला मिळत असेल, तर त्याचा जरूर लाभ घ्यावा. जेव्हा तुम्ही नवीन व्यक्तींना भेटाल किंवा कोणत्याही माध्यमातून नव्या व्यक्तींशी जोडल्या जाल तेव्हाच ही संधी तुम्हाला मिळेल. नव्या सवयी स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुम्ही केवळ घर, संसार या गोष्टींमध्ये आतापर्यंत अडकून पडला असाल, तर त्यातून काही वेळासाठी बाहेर पडा. काही तरी नवं शिकण्याचा प्रयत्न करा. एखादं कौशल्य (Skill) आत्मसात केलं तर तुमचं स्वतःवरचं प्रेम नक्कीच वाढेल.

तंत्रज्ञानाचा विस्तार कसा होतोय, सोशल मीडियाचा प्रभाव कसा वाढतोय, राजकारणात काय सुरू आहे, या प्रश्नांची उत्तरं फार कमी महिलांना माहिती असतात. स्वतःला जगासोबत ठेवणं हादेखील स्वतःची काळजी घेण्याचाच एक भाग आहे. जगभरात काय सुरू आहे, याची माहिती घेणं तुम्हाला मानसिकदृष्ट्या पुढे घेऊन जातं. अपडेट (Update) राहण्यासाठी कौशल्य शोधा, ते विकसित करा. नव्या गोष्टी शिकण्यासाठी कोर्सेस लावा. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट राहण्याचा प्रयत्न करा.

तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय आहे का? होणारे हे परिणाम जाणून घ्या

सोशल मीडियामुळे (Social Media) काही जणांना केवळ दुसऱ्याशी तुलना करण्याची सवय लागली आहे. अशी तुलना करणं बंद करावं. अशा तुलनेमुळे केवळ तणाव वाढतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नवं शिकायला मिळालं तर महिलांनी अशी संधी दवडू नये. ज्या महिलांनी यू-ट्यूब (You tube) किंवा फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून ओळख निर्माण केली आहे, त्यांचा आदर्श समोर ठेवावा. सोशल मीडियाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावं.

एकूणच आपण सर्वांपेक्षा वेगळ्या आहोत, अद्वितीय आहोत, हे स्वतःला पटवून द्या. जेव्हा कधी दुसऱ्यांविषयी मनात विचार येईल त्या वेळी आपण खूप चांगल्या आणि सुंदर आहोत, अशी भावनाही मनात येऊ द्या. दुसऱ्यांबरोबरच स्वतःची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. ज्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांसाठी करता, त्या स्वतःसाठीदेखील करा. महिलांनो, तुम्ही तुमची काळजी घेतली नाही तर अन्य कोणीही तुमची काळजी घेणार नाही, हे लक्षात ठेवा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ शालिनी जैन यांनी दिला आहे.

First published:

Tags: International women's day, Safety of indian women, Women