मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer: अमेरिकेतल्या लशी भारतात अद्याप का येईनात? कुठे अडलंय घोडं?

Explainer: अमेरिकेतल्या लशी भारतात अद्याप का येईनात? कुठे अडलंय घोडं?

 कोरोना वॅक्सिनच्या दोन डोसमधला गॅप फायदेशीर ?

कोरोना वॅक्सिनच्या दोन डोसमधला गॅप फायदेशीर ?

अमेरिकेतल्या फायझर (Pfizer) आणि मॉडर्ना (Moderna) या कंपन्यांच्या लशींची अद्याप वाट पाहावी लागत आहे. जॉन्सन अँड जॉन्सनचासुद्धा अजून पत्ता नाही. अमेरिकेतून येणार असलेल्या तिन्ही लशींच्या बाबतीत एक तांत्रिक अडचणही आहे.

नवी दिल्ली, 29 मे: कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाची (Covid-19 Vaccination) सुरुवात भारताने कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या लशींसह जानेवारीत केली. त्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यांत कोरोना योद्धे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लस उपलब्ध होती. नंतरच्या टप्प्यांत अधिकाधिक व्यक्तींसाठी लसीकरण खुलं झाल्यानंतर लशींचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला.

अन्य निवडक देशांमध्ये सध्या वापरल्या जात असलेल्या लशींना भारतात थेट वापरासाठी मंजुरी देण्याचा निर्णय भारताने एप्रिल महिन्यातच घेतला. त्यामुळे परदेशातल्या लशी भारतात येतील आणि तुटवडा कमी होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र त्या लशी आल्या नाहीत. रशियाच्या स्पुटनिक (Sptnik V) या लशीचे काही डोसेस भारतात दाखल झाले आहेत; मात्र अमेरिकेतल्या फायझर (Pfizer) आणि मॉडर्ना (Moderna) या कंपन्यांच्या लशींची अद्याप वाट पाहावी लागत आहे. जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस लसही अद्याप भारतात आलेलीच नाही.

Explainer: रेमडेसिवीरनंतर आता Mucormycosis आजारावरील औषधाची टंचाई; भारतात का होतं असं?

 या दोन लशींचा पुरवठा आणि वितरण यात काही अडचणी आहेत. कारण या लशींची साठवणूक शून्यापेक्षाही कमी तापमानात करावी लागते. या लशी लस देशभर उपलब्ध करून द्यायच्या असल्यास उत्तम कोल्ड चेन अर्थात शीतसाखळीची आवश्यकता आहे. ही गोष्ट आव्हानात्मक आहे.

अमेरिकेतून येणार असलेल्या तिन्ही लशींच्या बाबतीत एक तांत्रिक अडचणही आहे. या तिन्हींपैकी एकाही कंपनीने भारतात लसविक्रीसाठी परवानगीच मागितलेली नाही. या लशींना भारतात वेगवान प्रक्रियेने मंजुरी दिली जाईल, असं केंद्र सरकारने आधीच स्पष्ट केलं आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने या आठवड्याच्या सुरुवातीला दिलेल्या एका वृत्तानुसार, मॉडर्ना ही कंपनी सध्या सिंगल डोस लसही विकसित करून असून, ती पुढच्या वर्षी भारतात सादर करण्यावरच तिचा भर आहे. कारण सध्या मॉडर्ना कंपनीची जी लस तयार आहे, त्या लशीचे यंदा भारतात पाठवण्याकरिता पुरेसे डोसेस आधीच घेतलेल्या अन्य ऑर्डर्समुळे कंपनीकडे उपलब्ध नाहीत. सिप्ला या भारतीय कंपनीने मॉडर्नाकडून पाच कोटी डोसेसची मागणी आधीच केली आहे; मात्र त्याला केंद्र सरकारकडून कन्फर्मेशन आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे.

ब्लॅक फंगस रोगावरील उपचार खर्च कमी करण्याची मागणी, काय आहे ट्रीटमेंट?

जॉन्सन अँड जॉन्सन्स (Johnson & Johnsons) कंपनीच्या लशीच्या अमेरिकेतल्या आपत्कालीन वापराला फेब्रुवारी 2021मध्ये मंजुरी मिळाली; पण ही लस दिल्यानंतर काही जणांच्या रक्तात गुठळ्या झाल्याचं आढळलं. तसंच, कंपनीच्या अमेरिकेतल्या कारखान्यातही काही अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे काही काळासाठी या लशीच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. ती नंतर उठवण्यात आली. क्वाड व्हॅक्सिन पार्टनरशिप कार्यक्रमांतर्गत हैदराबादमधल्या बायोलॉजिकल ई या कंपनीने या लशीच्या एक अब्ज डोसेसची मागणी करून करार केल्याचं समजतं; मात्र हे सारे डोसेस भारतात वापरण्यासाठी नाहीत.

राहता राहिलं फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) कंपनीचं व्हॅक्सिन. अमेरिकेतल्या या बड्या औषध कंपनीने सांगितलं, की जुलै ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत भारताला पाच कोटी डोसेस पुरवण्यास कंपनी तयार आहे; पण त्यात काही कायदेशीर अडचणी उपस्थित झाल्या आहेत.

फायझर कंपनीने भारतात लस सादर करण्यासाठी पूर्वीच परवानगी मागितली होती; मात्र कंपनीने नंतर तो अर्ज मागे घेतला होता. तो नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून मागे घेतला होता, असं समजतं.

त्यानंतर भारताने परदेशात मान्यता मिळालेल्या लशींना थेट मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा कंपनीने तोच मुद्दा उपस्थित केला.

भारताने इंडेम्निटी बाँडवर (Indemnity Bond) सह्या कराव्यात अशी अमेरिकेची इच्छा आहे. म्हणजेच लशीचे कोणतेही साइड इफेक्ट्स झाले, तरी त्यासाठी कंपनीवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी हमी त्या कंपनीला हवी आहे. तशी हमी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये त्या कंपनीला मिळाली आहे; मात्र भारताने अशी हमी कोणत्याच अन्य लस उत्पादकांनाही दिलेली नाही. मॉडर्नाच्या लशीचे जगभरात कुठेही साइडइफेक्ट्स जाणवलेले नाहीत, असा कंपनीचा दावा आहे.

फायझरला भारतात स्थानिक पातळीवर चाचण्या घेण्यापासूनही सवलत हवी असल्याचं समजतं. भारताने मात्र कोणत्याही परदेशी लशीचा वापर करताना पहिल्या 100 जणांवर सात दिवस लक्ष ठेवलं जाईल, अशी भूमिका घेतली आहे.

EXPLAINER : लसीकरणापूर्वी, लस घेताना आणि लसीकरणानंतर, काय काळजी घ्याल?

फायझरची लस जेव्हा भारतात येईल, तेव्हा कोणत्या तरी प्रकारचं कायदेशीर रक्षण त्यात समाविष्ट केलं जाईल, असं सूत्रांनी रॉयटर्सला सांगितलं.

कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक व्ही या सगळ्या लशींनी सेफ्टी ट्रायल्स पूर्ण केल्यानंतरच भारतात त्यांच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

भारताकडून या तिन्ही अमेरिकी कंपन्यांना सर्व प्रकारचं साह्य देण्याची ग्वाही देण्यात आलेली आहे; मात्र सध्या तरी भारतात लशीच्या मंजुरीसाठी एकही प्रकरण प्रलंबित नाही. याचाच अर्थ असा, की अद्याप या तिन्ही कंपन्यांपैकी कोणीही भारतात मंजुरीसाठी अर्जच केलेला नाही.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, United States of America