मुंबई, 21 डिसेंबर : आज 21 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. दरवर्षी हा दिवस बदलत राहतो. गेल्या वर्षी हा दिवस 22 डिसेंबरला होता. या वर्षातील सर्वात लहान दिवसाला हिवाळी संक्रांती (Winter solstice) म्हणतात. जाणून घ्या, यामागचे शास्त्र काय आहे आणि या दिवसाच्या आधी आणि नंतर काय बदल होतात.
सर्वप्रथम संक्रांती म्हणजे काय ते समजून घेऊ. हा लॅटिन शब्द आहे, ज्याचा अर्थ सूर्यास्त असा होतो. पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते आणि सूर्याकडे दिशा बदलते. अशा परिस्थितीत पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या संपर्कात येतो तो संक्रांती या शब्दाशी संबंधित आहे.
उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस
आजचा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस आहे. याचा अर्थ या दिवशी सूर्य पृथ्वीच्या या भागात सर्वात कमी काळ राहील. दुसरीकडे, दक्षिण गोलार्धात आज सूर्य सर्वात जास्त काळ राहील आणि अशा प्रकारे या भागात येणाऱ्या देशांना या दिवशी सर्वात मोठा दिवस दिसेल. उदाहरणार्थ, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत आजपासून उन्हाळा सुरू होत आहे.
जगाच्या एका भागात सर्वात मोठा दिवस तर दुसरीकडे सर्वात लहान
यावरून असं लक्षात येतं, की आजचा दिवस जगातील दोन भागांमध्ये विभिन्न असणार आहे. म्हणजे एकीकडे सर्वात लहान तर दुसरीकडे सर्वात मोठा. दिवस लहान किंवा मोठा असण्याचे कारण म्हणजे पृथ्वीची स्थिती. इतर सर्व ग्रहांप्रमाणे आपला ग्रह त्याच्या अक्षावर सुमारे 23.5 अंश झुकलेला आहे. परिणामी आपल्या अक्षावर फिरत असल्याने सूर्याची किरणे एका ठिकाणी जास्त आणि इतर ठिकाणी कमी पडतात. जेथे सूर्यप्रकाश थोड्या काळासाठी येतो तिथे दिवस लहान असतो, तर जास्त प्रकाशाने दिवस मोठा होतो.
पृथ्वीचं झुकण्याचं कारण काय?
पृथ्वी आपल्या अक्षावर एका विशिष्ट कोनात का झुकलेली असते, हा प्रश्न अनेकदा पडतो. शास्त्रज्ञांकडे सध्या याबद्दल विशेष माहिती नाही किंवा याबद्दल त्यांना जास्त माहिती नाही. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की जेव्हा सूर्यमाला आकार घेत होती, त्या दरम्यान पृथ्वीची एका ग्रहाशी जोरदार टक्कर झाली आणि त्यानंतरच पृथ्वी आपल्या अक्षावर तिरकी झाली असावी.
सूर्यापासूनचे अंतर 6 महिने वाढते
आता उत्तर गोलार्धाबद्दल बोलूया, म्हणजे वर्षाचे 6 महिने हा भाग सूर्याकडे झुकलेला असतो. त्यामुळे या संपूर्ण काळात येथे भरपूर सूर्यप्रकाश येतो. त्यामुळे या महिन्यांत उष्णता कायम राहते. त्याचवेळी उर्वरित 6 महिन्यांत हा भाग सूर्यापासून दूर जातो, तेव्हापासून दिवसाचा कालावधी कमी होऊ लागतो.
-83 अंश सेल्सिअस तापमानात लोकं कशी राहत असतील?
सूर्य उत्तरायणातून दक्षिणायनाकडे
जर आपल्या भाषेत समजायचे झाले तर या दिवशी सूर्य मकर राशीतून उत्तरायणाकडून दक्षिणायनात प्रवेश करतो. या दिवसापासून थंडी वाढू लागते. म्हणजे, उत्तर भारतात अजून कडाक्याची थंडी वाढणार आहे. या दिवसापासून थंडी पडेल आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता असते.
उन्हाळी संक्रांती म्हणजे काय?
दुसरीकडे, हिवाळी संक्रांतीप्रमाणे, उन्हाळी संक्रांती देखील आहे, म्हणजेच वर्षातील सर्वात मोठा दिवस. या दिवशी सर्वात लहान रात्र असते. हा दिवस 20 ते 23 जून दरम्यान कोणत्याही दिवशी येतो. आणखी एक वेळ आहे ज्यामध्ये दिवस आणि रात्र समान होतात. हा काळ एक-दोन दिवसांचा नसून 21 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत येतो. यावेळी सूर्य आणि चंद्र आकाशात जवळजवळ समसमान काळसाठी येतात.
या दिवशी सणही साजरे केले जातात
प्राचीन काळी लोक या दिवसाच्या आधारे अनेक गोष्टी ठरवत असत आणि सणही याच पद्धतीने साजरे केले जात असत. आध्यात्मिकदृष्ट्या हा दिवस नवीन गोष्टींचे स्वागत करण्याचा दिवस आहे. वेल्सच्या भाषेत या दिवसाला "अल्बन अर्थन" (Alban Arthan) म्हणजेच हिवाळ्याचा प्रकाश म्हणतात. हा दिवस ब्रिटनच्या या भागात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. असे मानले जाते की हे दिवस आणि त्याच्याशी संबंधित सण मानवी इतिहासातील सर्वात जुने सण आहेत.
उत्तर भारतात पारा झपाट्याने का घसरतोय! शास्त्रज्ञांचा इशारा काय सांगतो?
रोममध्येही हा दिवस साजरा करण्याची संस्कृती आहे. त्याला सॅटर्नलिया (Saturnalia) म्हणतात. म्हणजेच रोममध्ये पिकांची देवता मानल्या जाणाऱ्या शनीचा दिवस. त्याचा उत्सव 17 डिसेंबरपासून सुरू होतो आणि पुढील सात दिवस चालतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather, Weather update, Winter