Home /News /explainer /

Cold Wave In North India | उत्तर भारतात पारा झपाट्याने का घसरतोय! शास्त्रज्ञांचा इशारा काय सांगतो?

Cold Wave In North India | उत्तर भारतात पारा झपाट्याने का घसरतोय! शास्त्रज्ञांचा इशारा काय सांगतो?

Cold Weather In North India : उत्तर भारतात थंडी (Temperature) वाढत आहे. तापमान आता 3 अंशांच्या खाली पोहोचू लागले आहे. थंडी अचानक वाढण्याचे कारण काय? यामागे काही भौगोलिक कारण आहे का? एखाद्या ठिकाणाचे अक्षांश (Latitude) देखील यामध्ये काही भूमिका बजावतात का? आणि थंडी कधी वाढते असा समज आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या नजरेत कोणत्या तापमानाला कडाक्याची म्हणतात?

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 20 डिसेंबर : देशात थंडीचा कहर वाढू लागला आहे. विशेषतः उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पारा झपाट्याने घसरत चालला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा नेहमीपेक्षा जास्त थंडी असेल. यासाठी अनेक कारणे सांगितली जात आहेत. तसं उत्तरेकडील भागात थंडीची लाट तीव्र होण्याचे कारण म्हणजे हा प्रदेश अशांक्षाच्या (लेटीट्यूड) जवळ आहे. ला निना हे देखील थंडीमागील मोठं कारण सांगितलं जातं? काय आहे हा प्रकार? चला सविस्तर जाणून घेऊया. उदाहरणार्थ, जर आपण दिल्ली घेतली तर ती जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडने वेढलेली आहे. येथून वाहणारे थंड वारे दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारत गारठवतात. हे दरवर्षी घडते. पण, यावेळी हिवाळा कडक असू शकतो. यंदा 15 नोव्हेंबरपासून उंच भागात बर्फवृष्टी सुरू झाली असून थंडी वाढली आहे. याचे कारण वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे, त्यामुळे तेथून थंड वारे येत आहेत. अक्षांश रेषा किंवा लेटीट्यूटचा एखाद्या ठिकाणच्या हवामानाशी जवळून संबंध असतो. यावरून सूर्याचा प्रकाश आणि ऊर्जा एखाद्या ठिकाणी किती मिळेल हे ठरते. हेच कारण आहे की अक्षांशावर येणाऱ्या ठिकाणी थंडीत बर्फवृष्टी सामान्य आहे, तर विषुववृत्ताजवळील ठिकाणे सहसा उबदार असतात. याशिवाय, मध्य-अक्षांश देखील आहे. उष्ण कटिबंध आणि ध्रुवांच्यामध्ये येणारी ही ठिकाणे आहेत. येथील हवामान अनेकदा बदलते आणि विशेष अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे दिल्लीत थंडीचा लाट पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या ठिकाणाचे भौगोलिक स्थान सांगण्यासाठी त्या ठिकाणचे अक्षांश (latitude) आणि रेखांश (Longitude) वापरले जातात. कोणत्याही देशाचे किंवा ठिकाणाचे स्थान त्या ठिकाणच्या अक्षांश आणि रेखांशावरून ठरते. भारत हा खूप मोठा देश असल्याने त्याची वेगवेगळी राज्ये वेगवेगळ्या अक्षांशांमध्ये येतात. दिल्लीच्या आजूबाजूचा भाग त्याखाली येतो. त्यामुळेच तिथे बर्फ पडतो, त्याचा परिणाम संपूर्ण उत्तर भारतात दिसून येतो. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर.. याशिवाय सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर हेही थंडीचे कारण आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र, ज्या कक्षेत पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्या कक्षेत सूर्यापासून पृथ्वीचे अंतर प्रत्येकवेळी समान नसते. काहीशा लंबवर्तुळाकार (पूर्णपणे पॅराबॉलिक) कक्षेत प्रदक्षिणा घालत असताना एक वेळ अशी येते जेव्हा सूर्यापासून पृथ्वीचे अंतर खूप जास्त होते. या काळात सर्वाधिक थंडी असते. भारताच्या बाबतीतही तेच आहे. कडाक्याच्या थंडीच्या वेळी पृथ्वी फक्त सूर्यापासून दूर असतेच, त्याशिवाय सूर्याची किरणे थेट भारताच्या पृष्ठभागावर पडत नाहीत. वनस्पतींकडून पूर्वीपेक्षा जास्त CO2 शोषण! याचा वातावरणावर काय परिणाम होईल? दुसरे कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स, ज्याचा आपण वर हलकासा उल्लेख केला आहे. ही वादळं आहेत, जे त्यांच्याबरोबर भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागरातून ओलावा आणतात. भारतात पोहोचेपर्यंत यातील हवा खूप थंड झालेली असते. आणि जेव्हा ते हिमालयावर आदळतात तेव्हा उत्तर भारतात हिवाळ्यात पाऊस पडतो, अनेक ठिकाणी गारा आणि बर्फ पडतो. ला निना म्हणजे काय? what is la Nina हवामान खात्याने यंदा थंडीचा इशारा दिला असून, त्यामागे अन्य कारणे आहेत. एक कारण म्हणजे ला निना. हा एक स्पॅनिश शब्द आहे, ज्याचा अर्थ लहान मुलगी आहे. पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावर हवेचा दाब कमी असताना ही स्थिती उद्भवते. यामुळे समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात लक्षणीय घट होते. त्याचा थेट परिणाम जगाच्या तापमानावर होतो आणि तोही सरासरीपेक्षा जास्त थंड होतो. यादरम्यान, वायव्य भागात तापमान पूर्वीपेक्षा कमी होते, तर आग्नेय भागात हिवाळ्यातही तापमान जास्त राहते. त्याच्या उत्पत्तीची वेगवेगळी कारणे आहेत. मात्र, सर्वात सामान्य कारण म्हणजे जेव्हा व्यापारी वारे (पूर्वेकडून वाहणारा वारा) खूप वेगाने वाहत असतात. सूर्याच्या कोरोनाने भारतीय खगोलशास्त्रज्ञ अचंबित; जाणून घ्या काय आहे रहस्य कडाक्याची थंडी कधी म्हणतात? एकंदरीत यंदाची थंडी आपल्याला गोठवणार, अशा इशारा शास्त्रज्ञ वेळोवेळी देत आहेत. पण, थंडीला कडाक्याची थंडी कधी म्हणतात. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हवामानशास्त्रज्ञ त्याची सामान्य तापमानाशी तुलना करून याचा अंदाज लावतात. जर तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअसने सामान्यपेक्षा कमी झाले तर ते थंड मानले जाते. दुसरीकडे, जर हे तापमान 6 ते 7 अंशांनी कमी झाले तर ते तीव्र थंडीच्या श्रेणीत येते.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Climate change, Delhi News, Weather update, Winter

    पुढील बातम्या