मुंबई, 4 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) यांनी आज विधानभवनात विश्वासदर्शक ठराव जिंकला. मात्र, सभागृहाबाहेरील शिंदे गट आणि शिवसेनेचा संघर्ष अद्याप सुरु आहे. शिवसेना (Shivsena) कुणाची हा यावरुन हा वाद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचीच खरी शिवसेना असा दावा केला आहे. तर याबाबतची कायदेशीर लढाईल सुरुच आहे. शिवसेना संपणार नाही. आम्ही त्यांचावर करवाई करू. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी काही नाही. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं आदित्य ठाकरे
(Aaditya Thackeray) यांनी म्हटलं. ज्या व्हिपीवरुन हा गोंधळ सुरू आहे, ते नेमकं काय आहे?
एक दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे
(Eknath Shinde) गटाने बाजी मारली होती. सभापती राहुल नार्वेकर यांनीही एकनाथ शिंदे यांना नेता म्हणून मान्यता दिली आहे. शिवसेनेकडून अजय चौधरी यांची विधीमंडळ पक्षनेते करण्यात आली. उद्धव गटातील सुनील प्रभू यांची मुख्य व्हीप
(Whip) पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अखेर व्हीप म्हणजे काय आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर काय कारवाई केली जाते?
व्हिप म्हणजे काय? What is Whip
जेव्हा फ्लोर टेस्ट असते तेव्हा पक्ष आपल्या आमदारांना व्हिप जारी करतो. प्रत्यक्षात आमदारांना क्रॉस व्होटिंग करू नये म्हणून व्हीप जारी केला जातो. व्हीप हा कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकारी असतो, ज्याचे काम विधिमंडळात पक्षाची शिस्त सुनिश्चित करणे असते. त्याला व्हिप म्हणतात. सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर याचा अर्थ असा की संघटनेच्या या व्यक्तीने पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या वैयक्तिक विचारसरणी किंवा स्वतःच्या इच्छेपेक्षा पक्षाने ठरवलेल्या नियमांचे किंवा निर्णयांचे पालन केले पाहिजे याची खात्री करणे आवश्यक आहे. जेव्हा फ्लोअर टेस्ट होते तेव्हा पक्ष आपल्या सर्व सदस्यांना व्हिपद्वारे एकत्र करतो आणि त्यांना विधिमंडळात उपस्थित राहण्याचे आदेश देतो.
शिवसेना कधीच संपणार नाही, व्हीपचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार; आदित्य ठाकरेंचा इशारा
व्हिप अनेक प्रकार आहेत
व्हिपचे तीन प्रकार आहेत - एक लाइन व्हिप, दोन ओळींचा व्हिप आणि तीन ओळींचा व्हिप. वन लाईन व्हिपमध्ये सदस्यांना मतदान करण्याची माहिती दिली जाते. या स्थितीत पक्षाचे सदस्य स्वतःचा निर्णय घेऊ शकतात. त्याला एक व्हिप म्हणतात. दोन ओळींच्या व्हिपमध्ये सभासदांना मतदानाच्या वेळी सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येतात. त्यामध्ये मतदानासाठी विशेष सूचना देण्यात येतात. तीन ओळींच्या व्हिपमध्ये सदस्यांना पक्षानुसार मतदान करण्यास सांगितले जाते. हा सर्वात यशस्वी व्हिप मानला जातो. व्हीपचे उल्लंघन केल्यास पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत सभागृहातून बडतर्फी होऊ शकते. शिवसेना आणि शिंदे गट दोघांनीही एकमेकांच्या विरोधात कारवाई केली आहे. आता न्यायालय काय निर्णय देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.