20 मे रोजी एकनाथ शिंदेंना मातोश्रीवर बोलावलं होतं आणि त्यांनी मुख्यमंत्री व्हायचंय का? ही विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांनी नकार दिला आणि नंतर बंडखोरी केली, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
मुंबई, 4 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानभवनात विश्वासदर्शक ठराव जिंकला. मात्र सभागृहाबाहेरील शिंदे गट आणि शिवसेनेचा संघर्ष अद्याप सुरु आहे. शिवसेना (Shivsena) कुणाची हा प्रश्न अजून कायम आहे. याबाबतची कायदेशीर लढाईल सुरुच आहे. शिवसेना संपणार नाही. आम्ही त्यांचावर करवाई करू. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी काही नाही. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी म्हटलं.
आदित्य ठाकरे यांनी पुढे म्हटलं की, शिवसेनेची कोर्टात लढाई सुरु आहे, आमचा व्हीपच खरा व्हीप आहे, हे कोर्टात आम्ही सिद्ध करु असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. जे पळाले त्यांना शिवसेना संपवायची होती. मात्र शिवसेना कधीही संपणार नाही. सध्या सर्व आमदार एका बबलमध्ये राहतायेत. कधी गोवा, कधी सूरत तर कधी गुवाहाटी येथे ते राहतायेत. मात्र त्यांना कधीतरी त्यांच्या मतदारसंघात जावं लागेल. तेव्हा मतदारांचं म्हणणं काय आहे त्यावेळी काही स्पष्टता येईल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने; दोघांमधील संवाद कॅमेऱ्यात कैदएकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाबाबत विचारणा केली होती
20 मे रोजी एकनाथ शिंदेंना मातोश्रीवर बोलावलं होतं आणि त्यांनी मुख्यमंत्री व्हायचंय का? ही विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांनी नकार दिला आणि नंतर बंडखोरी केली, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीसांनी बाहेर राहून मदत करणाऱ्या अदृष्य हातांचे मानले आभार, कोण आहेत ते अदृष्य हात
राज्यातील हे सरकार फार काळ टीकणार नाही. मध्यावधी निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत. प्रचंड ताकदीने शिवसेना विधानसभेत पुन्हा दिमाखात भगवा फडकवून दाखवेल, असा पुररुच्चार आदित्य ठाकरे यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.