मराठी बातम्या /बातम्या /explainer /Inside Story: फिरोजपूर फ्लायओव्हरवर 'त्या' 20 मिनिटांत नेमकं काय घडलं? पंतप्रधानांच्या सुरक्षेत कशी झाली चूक

Inside Story: फिरोजपूर फ्लायओव्हरवर 'त्या' 20 मिनिटांत नेमकं काय घडलं? पंतप्रधानांच्या सुरक्षेत कशी झाली चूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान (Punjab Rally) सुरक्षेतील त्रुटींनंतर आता पंतप्रधानांची सुरक्षा (prime minister security) चर्चेत आहे. अशा परिस्थितीत फिरोजपूर फ्लायओव्हरवर नेमकं काय घडलं हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान (Punjab Rally) सुरक्षेतील त्रुटींनंतर आता पंतप्रधानांची सुरक्षा (prime minister security) चर्चेत आहे. अशा परिस्थितीत फिरोजपूर फ्लायओव्हरवर नेमकं काय घडलं हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान (Punjab Rally) सुरक्षेतील त्रुटींनंतर आता पंतप्रधानांची सुरक्षा (prime minister security) चर्चेत आहे. अशा परिस्थितीत फिरोजपूर फ्लायओव्हरवर नेमकं काय घडलं हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 6 जानेवारी : पंजाब दौऱ्यात (Punjab Rally) पंतप्रधान नरेंद्र मोदी ((PM Narendra Modi) यांच्या ताफ्याला उड्डाणपुलावर 15 ते 20 मिनिटे थांबावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील (prime minister security) या त्रुटींनंतर पुन्हा एकदा त्यांच्या सुरक्षेवरुन राजकारण सुरू झालं आहे. अशी परिस्थिती का निर्माण झाली? हे समजून घेण्यासाठी फिरोजपूर फ्लायओव्हरवर नेमकं काय घडलं? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. यात नेमकी कोणाची चूक होती? स्थानिक प्रशासन की पंतप्रधानांना संरक्षण देणाऱ्या एजन्सीची?

    पंजाबमधील मोगा-फिरोजपूर महामार्गावर (Moga-Ferozepur highway) पियारेनाना गावानजीकचा परिसर बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी मोकळा होता. परंतु, त्यानंतर भारतीय किसान युनियनचे (क्रांतीकारी) नेते सुरजितसिंग फूल (Surjit Singh Phool) यांच्या नेतृत्वाखाली 50 शेतकरी तिथं पोहोचले आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांनी रस्ता रोखून धरला. मात्र, त्यांना तिथून हटवण्यासाठी पोलिसांनी (Police) बळाचा वापर केला नाही.

    दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा (Prime Minister Narendra Modi's Cavalcade) दुपारी दीड वाजल्यापासून सुमारे 20 मिनिटं भारत-पाकिस्तान सीमेपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरील एका उड्डाणपुलाच्या (Flyover) मध्यभागी अडकून पडला. यावेळी आंदोलक पंतप्रधान मोदी यांच्या वाहनांपासून सुमारे 150 मीटर अंतरावर होते. या आंदोलकांमुळे मोदी यांच्या ताफ्याला पुढे जाता आलं नाही, अशी माहिती `न्यूज18 डॉट कॉम`ला मिळाली.

    आकस्मिक मार्गाचा वापर

    यावेळी पंतप्रधानांच्या गाडीला घेराव घालण्यासाठी एसपीजीने (SPG) व्यूहरचना आखत आपली वाहनं रस्त्याच्या दुतर्फा उभी केली. यापूर्वी ड्रोन आणि टिफीन बॉम्ब सापडल्यानं हा परिसर नेहमीच हाय अलर्टवर असतो. पंतप्रधान भटिंडा इथून विमानाने फिरोजपूरजवळ एका जाहीर सभेसाठी जाणार होते. हवामान बिघडल्याने त्यांनी विमानाऐवजी रस्त्याच्या मार्गे जाण्याचा निर्णय घेतला. याबाबत केंद्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की ``पंतप्रधानांना भटिंडावरून (Bhatinda) फिरोजपूरला (Ferozepur) हवाई मार्गाने जाणं शक्य नसल्यास सुमारे 100 किलोमीटरच्या मोगा-फिरोजपूर महामार्गाला `आकस्मिक मार्ग` म्हणून पंजाब पोलिसांकडून मंजुरी देण्यात आली होती.’ पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली ते मेरठ प्रवास अशाच पद्धतीनं आणि कोणत्याही अडथळ्याविना केला होता.

    देशात फक्त पंतप्रधानांना मिळते SPG संरक्षण! काय आहे विशेष?

    ट्रॉलीच्या मदतीनं रस्ता रोखला

    पंतप्रधान मोदी भटिंडावरून निघाले तेव्हा हा मार्ग मोकळा आणि सुरक्षित असल्याचं आश्वासन पंजाब पोलिसांनी एसजीपींना दिलं होतं. मंगळवारी संध्याकाळी हा मार्ग भारतीय किसान संघर्ष समितीनं रोखला होता. मात्र, चर्चेनंतर पहाटे हा मार्ग मोकळा करण्यात आला. पंजाब सरकारनं याबाबत लेखी आश्वासन दिलं होतं. परंतु, बुधवारी सकाळी 11 वाजता भारतीय किसान युनियनचे (क्रांतीकारी) 50 कार्यकर्ते सुरजितसिंग फूल यांच्या नेतृत्वाखाली पियारेनाना गावाजवळील महामार्गावर दाखल झाले आणि त्यांनी पंतप्रधानांच्या रॅलीच्या ठिकाणापासून 8 किलोमीटर अलीकडे ट्रॉलीच्या मदतीनं रस्ता अडवला. यावेळी पियारेनाना येथून स्थानिक ग्रामस्थांना गोळा करण्यासाठी स्पीकरवरून घोषणा देण्यात आल्या आणि काही वेळातच सुमारे 150 आंदोलकांचा जमाव महामार्गावर आला. तोपर्यंत पंतप्रधान मोदी भटिंडाहून बजाखाना-कोटकपुरा-फरीदकोटमार्गे फिरोजपूरला जाण्यासाठी निघाले होते.

    याबाबत `न्यूज18 डॉट कॉम`ने सुरजितसिंग यांच्याशी संवाद साधला. ``पंतप्रधानांना थांबवण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. खरं तर पंजाब पोलिसांनी (Punjab Police) रस्ता रिकामा करण्यास सांगेपर्यंत पंतप्रधान या मार्गावरून जाणार आहेत, याची आम्हाला कल्पना देखील नव्हती``, असा दावा त्यांनी केला.

    पंतप्रधान या मार्गावरून जाणार होते याची माहिती नव्हती : आंदोलक

    ``पंतप्रधान या मार्गावरून जाणार आहेत हे आम्हाला माहिती नव्हते. उड्डाणपुलावर पंतप्रधानांचा ताफा असल्याचं ग्रामस्थांनी नंतर सांगितलं. पंतप्रधानांचा ताफा रोखण्याचं कोणतंही नियोजन नव्हतं. आम्हाला दुपारी 12.50 ते 1 वाजेच्या सुमारास पोलिसांनी सांगितलं की आम्हाला हा रस्ता मोकळा करावा लागेल. मात्र, यावर आमचा विश्वास बसला नाही. पोलीस खोटं बोलत आहेत असं आम्हाला वाटलं. सर्वसामान्यपणे पंतप्रधानांचा ताफा जायचा असेल तर संबंधित मार्ग किमान 2 ते 3 तास आधी मोकळा केला जातो. त्यामुळे आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवला नाही,``, असं फूल यांनी सांगितलं.

    पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेवर दररोज खर्च होतात 1 कोटी 62 लाख! कशी असते व्यवस्था?

    या प्रकरणात फिरोजपूर आणि मोगाच्या एसएसपींची भूमिका चुकीची वाटत असल्यानं, पंजाब सरकारने पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान झालेल्या सुरक्षेच्या त्रुटींबाबत तीन दिवसांत अहवाल देण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

    पंतप्रधानांच्या मार्गाचा तपशील लीक केल्यानंतर पंजाब पोलिसांशी संगनमत करूनच महामार्गवर आंदोलक जमले,`` असा आरोप भाजपनं (BJP) केला आहे.

    महामार्ग वाहतुकीसाठी खुला असल्यानं आणि भाजप समर्थकांसह बसेसही त्यावरून रॅलीच्या ठिकाणी जात असल्यानं उड्डाणपुलावर पंतप्रधानांचा ताफा आंदोलक आणि भाजप समर्थकांच्या मधोमध अडकून पडला. यावेळी पुढं जाणं शक्य नसल्यानं आणि एसजीपीला सीएमओकडून प्रतिसाद न मिळाल्यानं पंतप्रधान मोदी या ठिकाणाहून 20 मिनिटांनंतर मागे फिरले.

    पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी स्पष्ट केलं की ``हिंसाचाराची शक्यता असल्यानं आंदोलकांना हटवण्यासाठी बळाचा वापर करण्यास परवानगी दिली नाही. या निर्णयाला 2015 मधील पार्श्वभूमी आहे. 2015 मध्ये पंजाब पोलिसांना फरिदकोट जवळच्या कोटकापुरा आणि बरगारी भागात बळाचा वापर करावा लागला होता. यात आंदोलकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात राजकीय सत्तापालट झाला होता.``

    याबाबत पंजाब पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं `न्यूज 18 डॉट कॉम`ला सांगितलं की ``पंतप्रधानांचा संपूर्ण मार्ग हा एका संवेदनशील भागातून जात होता. हा मार्ग जिथे शेतकरी आंदोलन शिगेला पोहोचले त्या माळवा प्रदेशातून जात होता. त्यामुळे एसपीजींनी मार्ग मोकळा असल्याचं आश्वासन देऊनही पंजाब पोलीस पंतप्रधानांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले. आता या प्रकरणाची चौकशी होईल व जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल.``

    First published:
    top videos

      Tags: Pm modi, Security, Z security