मराठी बातम्या /बातम्या /explainer /देशात फक्त पंतप्रधानांना मिळते SPG संरक्षण! काय आहे विशेष ज्यावर दिवसाला खर्च होतात 1 कोटी 62 लाख

देशात फक्त पंतप्रधानांना मिळते SPG संरक्षण! काय आहे विशेष ज्यावर दिवसाला खर्च होतात 1 कोटी 62 लाख

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान (Punjab Rally) सुरक्षेतील त्रुटींनंतर आता पंतप्रधानांची सुरक्षा (prime minister security) चर्चेत आहे. अशा परिस्थितीत देशाच्या पंतप्रधानांचे संरक्षण (SPG security) कसे होते आणि त्याची जबाबदारी कोणाची असते, हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान (Punjab Rally) सुरक्षेतील त्रुटींनंतर आता पंतप्रधानांची सुरक्षा (prime minister security) चर्चेत आहे. अशा परिस्थितीत देशाच्या पंतप्रधानांचे संरक्षण (SPG security) कसे होते आणि त्याची जबाबदारी कोणाची असते, हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान (Punjab Rally) सुरक्षेतील त्रुटींनंतर आता पंतप्रधानांची सुरक्षा (prime minister security) चर्चेत आहे. अशा परिस्थितीत देशाच्या पंतप्रधानांचे संरक्षण (SPG security) कसे होते आणि त्याची जबाबदारी कोणाची असते, हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 6 जानेवारी : पंजाब दौऱ्यात (Punjab Rally) पंतप्रधान नरेंद्र मोदी ((PM Narendra Modi) यांच्या ताफ्याला उड्डाणपुलावर 15 ते 20 मिनिटे थांबावे लागले. वास्तविक, काही आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने पंतप्रधानांचा ताफा बराच वेळ पुढे जाऊ शकला नाही. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील (prime minister security) या त्रुटींनंतर पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या सुरक्षेची चर्चा होत आहे. यावरुन आता राजकारणही सुरू झालं आहे. पंतप्रधानांना विशेष एसपीजी संरक्षण (SPG security) मिळते, जे पंतप्रधानांचे संरक्षण करते. ही सुरक्षा झेड प्लस (Z Plus) आणि सीआरपीएफ सुरक्षेपेक्षा (CRPF security) खूप वेगळी आहे, जी देशाच्या पंतप्रधानांना दिली जाते. अशा परिस्थितीत, एसपीजी सुरक्षेमध्ये का विशेष आहे? पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं.

पंतप्रधान मोदी ((PM Narendra Modi) यांना विशेष संरक्षण गट (SPG) संरक्षण देण्यात आलं आहे. संसदेने या संदर्भात कायदा देखील केला आहे, ज्यामध्ये केवळ देशाच्या पंतप्रधानांनाच SPG संरक्षण दिले जाईल अशी तरतूद करण्यात आहे. पंतप्रधानपद सोडल्यानंतर 5 वर्षे एसपीजी सुरक्षा असेल आणि नंतर ती काढून घेतली जाईल. अलीकडेच पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या ताफ्यात आणखी एका नव्या वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही अभेद्य किल्ल्याप्रमाणे या कारमध्ये अनेक सुरक्षा व्यवस्था आहेत ज्या शत्रूचा प्रत्येक कट हाणून पाडण्यास सक्षम आहेत. या गाडीची किंमत सुमारे 12 कोटी रुपये आहे.

SPG संरक्षण कोणाला मिळते?

पूर्वी पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांना SPG संरक्षण दिले जात होते. मात्र, अलीकडेच काँग्रेसच्या अनेक नेत्यांची ही सुरक्षा काढून घेण्यात आली असून, त्यानंतर पंतप्रधान हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना एसपीजी सुरक्षा देण्यात आली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये संसदेत विचारलेल्या प्रश्नात तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले होते की, सध्या फक्त एकाच व्यक्तीला एसपीजी संरक्षण मिळत आहे. मात्र, केंद्रीय गृहराज्यमंत्री रेड्डी यांनी कोणाचेही नाव घेतले नाही.

झेड प्लसपेक्षा हे संरक्षण वेगळे कसे?

देशातील प्रतिष्ठित व्यक्तींना सरकारकडून संरक्षण दिले जाते, ज्यामध्ये अनेक लेव्हलच्या संरक्षणाचा समावेश आहे. सुरक्षेच्या या स्तरांमध्ये सर्वात वरची सुरक्षा SPG आहे, जी सध्या केवळ पंतप्रधानांना दिली जाते. यामध्ये अनेक सैनिक पंतप्रधानांचे संरक्षण करतात. यानंतर झेड प्लस सुरक्षेचा क्रमांक येतो, ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या सुरक्षेसाठी 55 सैनिक तैनात असतात. त्याचवेळी झेड सुरक्षेत 22 सुरक्षा कर्मचारी, वाय सुरक्षेत 11 आणि एक्समध्ये 2 सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत.

पंतप्रधानांंवरील हल्ल्याचा कट कुणाचा? दोन मिनिटांच्या व्हिडीओत खळबळजनक दावे

SPG संरक्षण म्हणजे काय?

देशाची सुरक्षा एजन्सी NSG, ITBP आणि CRPF प्रमाणे SPG ही देखील एक सुरक्षा एजन्सी आहे. देशाच्या महत्त्वाच्या पदांवर बसलेल्या मान्यवरांना सुरक्षा प्रदान करणे हे त्यांचे काम आहे. आता पंतप्रधानांच्या संरक्षणाची जबाबदारी एसपीजीकडे आहे. सध्या एसपीजीमध्ये सुमारे 3000 सैनिक आहेत. ते विशेष प्रशिक्षित असून शस्त्रास्त्रांच्या बाबतीतही त्यांच्याकडे प्रगत शस्त्रे आहेत. ते पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतात.

एसपीजीची स्थापना कशी झाली?

1981 पूर्वी भारताच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिसांच्या पोलिस उपायुक्तांची होती. यानंतर सुरक्षेसाठी एसटीएफची स्थापना करण्यात आली. दरम्यान, 1984 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या सूचनेनुसार 1985 मध्ये एक विशेष युनिट स्थापन करण्यात आले, ज्याला विशेष संरक्षण युनिट असे नाव देण्यात आले. या युनिटला पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी मिळाली. आता हे युनिट देशातील अनेक लोकांना विशेष संरक्षण देते.

सुरक्षा व्यवस्था चोख होती, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

एसपीजी सुरक्षा विशेष का आहे?

एसपीजी सुरक्षेबद्दल बोलायचे तर, एसपीजी कमांडोना फिजिकल, शूटिंग, वॉर, प्रॉक्सिमिटी प्रोटेक्शन (क्लोज सिक्युरिटी स्ट्रॅटेजी) चे विशेष प्रशिक्षण दिले जाते. पंतप्रधानांच्या सुरक्षेत गुंतलेले सुरक्षा कर्मचारी बिझनेस सूट, स्पेशल ग्लासेस, कम्युनिकेशन इअरपीस परिधान करतात. याशिवाय कमांडोना खास बंदुका दिल्या जातात, त्या अतिशय अत्याधुनिक गन असून त्या खास तयार केल्या जातात. कमांडो त्यांच्या सुरक्षिततेसाठी हलके वजनाचे बुलेटप्रूफ जॅकेट आणि सहकारी कमांडोशी बोलण्यासाठी ते कानात इअर प्लग किंवा वॉकी-टॉकी वापरतात.

पंतप्रधान कुठे जात असतील तर तिथल्या सुरक्षेची जबाबदारीही एसपीजीची असते. त्यावेळी ते स्थानिक पोलिसांच्या मदतीने पंतप्रधानांचे संरक्षण करतात. यादरम्यान, ते प्रथम मार्ग, घटनास्थळाच्या सुरक्षेची माहिती घेतात आणि संपूर्ण व्यवस्था पाहिल्यानंतर पंतप्रधान तेथे पोहोचतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवर दररोज एक कोटी 62 लाख रुपये खर्च केले जातात.

First published:
top videos

    Tags: Pm modi, Police Security, Z security