Home /News /explainer /

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेवर दररोज खर्च होतात 1 कोटी 62 लाख! कशी असते व्यवस्था?

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेवर दररोज खर्च होतात 1 कोटी 62 लाख! कशी असते व्यवस्था?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Prime Minister Modi) सुरक्षेत गंभीर चूक झाल्यामुळे त्यांची पंजाबमध्ये होणारी रॅली अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    चंदीगड, 5 जानेवारी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब भागात (Prime Minister Modi's Punjab rally) जाणार होते. मात्र, त्यांच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्यामुळे ही रॅली अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज फिरोजपूर येथे पंतप्रधान मोदींच्या रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. काही आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला अडवलं. त्यामुळे 15 ते 20 मिनिटांपर्यंत हा ताफा फ्लायओव्हरवरच अडकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवर दररोज एक कोटी 62 लाख रुपये खर्च केले जातात. अशा स्थितीत ही चूक कशी घडली हे समोर येईलच. मात्र, मोदी यांची सुरक्षा व्यवस्था कशी असते? हेही जाणून घेणे महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष संरक्षण गट (SPG) संरक्षण देण्यात आलं आहे. संसदेने या संदर्भात कायदा देखील केला आहे, ज्यामध्ये केवळ देशाच्या पंतप्रधानांनाच SPG संरक्षण दिले जाईल अशी तरतूद करण्यात आली होती. पंतप्रधानपद सोडल्यानंतर 5 वर्षे एसपीजी सुरक्षा असेल आणि नंतर ती काढून घेतली जाईल. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या ताफ्यात आणखी एका नव्या वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही अभेद्य किल्ल्याप्रमाणे या कारमध्ये अनेक सुरक्षा व्यवस्था आहेत ज्या शत्रूचा प्रत्येक कट हाणून पाडण्यास सक्षम आहेत. या गाडीची किंमत सुमारे 12 कोटी रुपये आहे. कशा असते मोदी यांची सुरक्षा व्यवस्था? SPG म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप देशाच्या पंतप्रधानांचे संरक्षण करतात. एसपीजीचे कमांडो इतके वेगवान आणि चपळ आहेत की पंतप्रधान जिथे जातात तिथे प्रत्येक कोपऱ्यावर नजर ठेवून असतात. एसपीजी कमांडोंचा पंतप्रधानांभोवती नेहमीच गरांडा असतो. हल्ला झाल्यास, त्यांचे काम पंतप्रधानांना घेरणे आणि त्यांना सुरक्षित ठेवणे तसेच हल्लेखोराला पकडणे हे आहे. एसपीजी कमांडो नेहमीच काळा गॉगल घालतात जेणेकरून ते प्रत्येक बाजूला लक्ष ठेवू शकतील. प्रत्येक संशयितावर लक्ष ठेवता यावे आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून ते काळा गॉगल वापरतात. एसपीजी कमांडोंना मीडियाशी बोलण्यास मनाई आहे. याशिवाय, त्यांना कोणतेही पुस्तक, पत्र किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज प्रकाशित करण्यास किंवा प्रकाशनात मदत करण्याची परवानगी नाही. उन्हाळ्यात हे एसपीजी कमांडो सफारी सूटमध्ये दिसतात, तर हिवाळ्यात ते फॉर्मल सूट घातलेले दिसतात. त्यांच्या कानामध्ये संदेशवहनासाठी वायरलेस उपकरण असते. एसपीजी कमांडोकडेही गुप्त शस्त्रेही असतात. याशिवाय वैयक्तिक नोमॅक्स कव्हरॉल्स, बुलेटप्रूट व्हेस्ट, हातमोजे, कोपर आणि गुडघ्यांसाठी पॅड्स समाविष्ट आहेत. SPG ची स्थापना 1988 साली झाली. SPG 4 भागात काम करते. ऑपरेशन्स, ट्रेनिंग, इंटेलिजन्स आणि टूर आणि प्रशासन. (Intelligence and tours)
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Pm modi, Pm narenda modi, Punjab

    पुढील बातम्या