मराठी बातम्या /बातम्या /explainer /

दरवर्षी लाखो लोकांचा जीव वाचवणारं ‘निळं रक्त' काय आहे? जवळपास प्रत्येक लसीसाठी होतो वापर

दरवर्षी लाखो लोकांचा जीव वाचवणारं ‘निळं रक्त' काय आहे? जवळपास प्रत्येक लसीसाठी होतो वापर

घातक विषाणूंच्या विरोधात अगदी परिणामकारक असे इम्यून सेल्स (immune cells) या खेकड्यांच्या रक्तामध्ये (Blue blood) आढळून येतात

घातक विषाणूंच्या विरोधात अगदी परिणामकारक असे इम्यून सेल्स (immune cells) या खेकड्यांच्या रक्तामध्ये (Blue blood) आढळून येतात

घातक विषाणूंच्या विरोधात अगदी परिणामकारक असे इम्यून सेल्स (immune cells) या खेकड्यांच्या रक्तामध्ये (Blue blood) आढळून येतात

नवी दिल्ली 26 ऑगस्ट : कोरोनामुळे लसीकरणाचं आणि पर्यायाने लसींचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना लहानपणी ‘देवी’ची लस दिली गेली असेलच. तसेच, पोलिओचे डोसेसही आपण लहानपणी घेतले आहेत. लसीचं कामच आपल्या शरीराला आजारांपासून संरक्षण देणं असतं. अशा या लसींच्या निर्मितीसाठी निसर्गातील एक महत्त्वपूर्ण घटक मोलाचं योगदान देतो. हा घटक म्हणजे, हॉर्स शू खेकड्यांचं निळं (Horseshoe crab blue blood) रक्त! पृथ्वीवर तब्बल 45 कोटी वर्षांपासून, म्हणजेच अगदी डायनासोर्सच्याही आधीपासून अस्तित्वात असलेले हे खेकडे (Horseshoe crabs) आज कोट्यवधी लोकांचा जीव वाचवत आहेत. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हॉर्स शू खेकडे हे मे आणि जूनमधील पौर्णिमांच्या दरम्यान समुद्राला येणाऱ्या भरतीवेळी दिसून येतात. त्यांचं रक्त निळ्या रंगाचं असतं. घातक विषाणूंच्या विरोधात अगदी परिणामकारक असे इम्यून सेल्स (immune cells) या खेकड्यांच्या रक्तामध्ये (Blue blood) आढळून येतात. या रक्तात एक खास असं रसायन असतं, जे विषाणूच्या आजूबाजूला जमा होऊन, त्याला कैद (Blue blood against bacteria) करुन ठेवतं. म्हणजेच, रक्तामध्ये इतर घटक आणि विषाणूंमध्ये फरक करणंही या विशेष घटकामुळे शक्य होतं. आपण तयार करत असलेली वैद्यकीय उपकरणं आणि औषधं ही विषाणूरहित (Blue Blood medical usages) आहेत की नाही, हे तपासण्यासाठी शास्त्रज्ञ या निळ्या रक्ताचा उपयोग करतात. नवविवाहितेनं लग्नानंतर 3 महिन्यातच दिला बाळाला जन्म; पतीनं घेतली थेट कोर्टात धाव म्हणून यांचं रक्त असतं निळं साधारणपणे रक्ताचा रंग लाल असतो हे आपल्याला माहिती आहे. आपल्या रक्तामध्ये लोह (Iron) या खनिजाचे अंश असतात, त्यामुळे त्याचा रंग लाल होतो. मात्र, या खेकड्यांच्या रक्तामध्ये तांब्याचे (Copper) अंश असतात. त्यामुळे हॉर्स शू खेकड्यांच्या (Horseshoe Crabs) रक्ताचा रंग निळा होतो. Facebook वर आता छोट्या व्यवसायिकांना मिळणार कर्ज घेण्याची सुविधा,काय आहे प्रोसेस वैद्यकीय साधनं, उपकरणं, नव्या लसी, लसीकरणासाठी वापरण्यात येणारी साधनं या सर्व गोष्टी स्वच्छ आणि विषाणूरहित असणं गरजेचं असतं. या गोष्टी वापरण्यायोग्य आहेत याची खात्री करण्यासाठी हॉर्स शू क्रॅबच्या रक्ताचा वापर केला जातो. अगदी कोरोना लसीच्या निर्मितीदरम्यानही याचा (Horseshoe crab and Corona vaccine) वापर करण्यात आला आहे. पण या सर्व प्रक्रियेमध्ये दरवर्षी लाखो खेकड्यांचा जीव (Horseshoe crabs killed) जातो. दरवर्षी सुमारे पाच कोटी हॉर्स शू खेकड्यांना वैद्यकीय वापरासाठी म्हणून पकडले जाते. अशा प्रकारे काढलं जातं रक्त या खेकड्यांना पकडल्यानंतर त्यांच्या हृदयाजवळ कवचाला छिद्र पाडलं (How they extract blue blood) जातं. यातून मग केवळ 30 टक्के रक्त काढून घेतलं जातं. जेणेकरुन हे खेकडे जिवंत राहतील. मात्र, काही संशोधन अहवालांमध्ये असंही समोर आलं आहे, की एकूण खेकड्यांपैकी 10 ते 30 टक्के खेकड्यांना या प्रक्रियेत आपले प्राण गमवावे लागतात.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Blood bank, Vaccine

पुढील बातम्या