जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / नवविवाहितेनं लग्नानंतर 3 महिन्यातच दिला बाळाला जन्म; पतीनं पत्नीविरोधात घेतली थेट कोर्टात धाव

नवविवाहितेनं लग्नानंतर 3 महिन्यातच दिला बाळाला जन्म; पतीनं पत्नीविरोधात घेतली थेट कोर्टात धाव

आधी एका मुलाला जन्म दिला नंतर तिला जुळ्या मुली झाला.

आधी एका मुलाला जन्म दिला नंतर तिला जुळ्या मुली झाला.

शारीरिक बदल पाहून पतीनं पत्नीला याबाबत विचारणाही केली होती. मात्र, गॅसमुळे पोट फुगल्याचं पत्नी सांगत असत. अखेर पती आपल्या पत्नीला अल्ट्रासाउंड करण्यासाठी घेऊन गेला

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ 26 ऑगस्ट : एका घटनेत एका नवविवाहितेनं लग्नानंतर तिसऱ्या महिन्यातच बाळाला जन्म दिला (A Woman Gives Birth to a Child After 3 Months of Marriage). पतीला याबाबत सुरुवातीपासूनच संशय होता. शारीरिक बदल पाहून पतीनं पत्नीला याबाबत विचारणाही केली होती. मात्र, गॅसमुळे पोट फुगल्याचं पत्नी सांगत असत. अखेर पती आपल्या पत्नीला अल्ट्रासाउंड करण्यासाठी घेऊन गेला आणि तेव्हा पत्नी गर्भवती असल्याचं समोर आलं. प्रकरण समोर आल्यानं पती आपल्या पत्नीसह सासरकडच्या लोकांवरही फसवणुकीचा आरोप करू लागला.. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये घडली आहे. एकतर्फी प्रेमातून नात्यातील तरुणीचा छळ; भररस्त्यात पीडितेला अडवून विकृत कृत्य मिळालेल्या माहितीनुसार, लोहियानगर येथील एका तरुणीचं मोहननगरमधील एका मुलासोबत 18 मार्चला लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसातच या मुलीचं पोट दिसू लागलं. यावर पतीनं सवाल केला असात आपल्याला गॅसचा त्रास असल्याचं तिनं म्हटलं. पत्नीचं हे उत्तर ऐकून पतीनं याकडे काही दिवस दुर्लक्ष केलं. महिला ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचलेल्या पतीनं म्हटलं, की लग्नानंतर एका महिन्यानंच त्याच्या पत्नीनं सांगितलं की ती गर्भवती आहे. हे ऐकून तो आनंदात होतात. या काळाता कोरोनाची दुसरी लाट सुरू होती. घरातून बाहेर पडणं धोकादायक होतं. यामुळे पतीनं व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून डॉक्टरांसोबत संपर्क साधला. डॉक्टरांनी सांगितलेली औषधं पती आपल्या पत्नीला देत होता. वृद्धानं पत्नीच्या जळत्या चितेवर घेतली उडी, हृदय पिळवटून टाकणारी घटना 25 जूनला तो आपल्या पत्नीला घेऊन औषधं घेण्यासाठी एका क्लिनिकमध्ये पोहोचला. चेकअपदरम्यान डॉक्टरांनी सांगितलं, की ही महिला आठ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून गर्भवती आहे. कधीही डिलिव्हरी होऊ शकते, असं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून पती चक्रावून गेला. त्यादिवसापर्यंत त्याच्या लग्नाला तीन महिने झाले होते. पतीनं यावरुन आपल्या पत्नीला सवाल करत गोंधळ घातला. यानंतर त्याची पत्नी आपल्या आई वडिलांसोबत माहेरी गेली. 26 जूनला महिलेनं मुलाला जन्म दिला. इकडे पतीनं आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. पतीनं कोर्टात जात न्यायाची मागणी केली आहे. तर या संपूर्ण घटनेनंतर पत्नी तणावात गेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात