Cloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय? आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...

Cloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय? आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...

Cloudburst in Maharashtra: मागील दोन दिवसांपासून रत्नागिरीसह कोकणात (Konkan) पावसानं अक्षरशः हाहाकार (Heavy rainfall) उडवला आहे. गुरुवारी राज्यात तब्बल 13 ठिकाणी ढगफुटी झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै: मागील दोन दिवसांपासून रत्नागिरीसह कोकणात पावसानं अक्षरशः हाहाकार उडवला आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. गुरुवारी राज्यात तब्बल 13 ठिकाणी ढगफुटी झाली आहे. तर चिपळून परिसरात दोन दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे. यामुळे कोकणातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. अवघ्या दोन दिवसात संपूर्ण कोकणात जलप्रलयची स्थिती नेमकी कशी तयार झाली. यामागे दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे अतिवृष्टी आणि दुसरं म्हणजे ढगफुटी.

ढगफुटी म्हणजे काय?

अगदी थोड्या कालावधीत जास्तीत जास्त पाऊस कोसळला तर त्याला ढगफुटी म्हणता येते. जेव्हा एका मिनिटाच्या आत तब्बल दोन इंचाहून अधिक पाऊस कोसळतो त्याला आपण ढगफुटी म्हणू शकतो. खरंतर, ढगफुटी या शब्दातच याचा अर्थ दडला आहे. एखादी पाण्याची भली मोठी टाकी हवेत पकडली आणि तिचा तळचं निघाला त्यावेळी टाकीतील पाणी जसं वेगानं खाली कोसळेल. ढगफुटी होतानाही असंच घडतं. फरक एवढाचं की इकडे टाकीचा तळ निघतो तिकडे आभाळ फाटतं.

हेही वाचा-अशी होते चंद्राची निर्मिती; दुर्मिळ क्षण पहिल्यांदाच झाला कॅमेऱ्यात कैद

पण टाकी ही काही हजार लिटरपर्यंत असून शकते. पण ढगांचं तसं नसतं. ढग हे कित्येक मैल पसरलेले असतात. एखाद्या संपूर्ण शहाराला पाण्याखाली घेण्याची ताकद एखाद्या ढगात असून शकते. अशा आक्राळ विक्राळ ढगाला, खालच्या बाजूने भगदाड पडलं तर, अब्जावधी गॅलन पाणी भरलेले हे ढग जमीनीच्या दिशेनं कोसळतात. आकाशातील पाण्याचा ढग अक्षरशः फाटतो आणि अगदी कमी वेळात पाण्याचा जणू स्तंभच जमिनीवर झेप घेतो.

हेही वाचा-साताऱ्यात घरांवर दरड कोसळली, 7 ते 8 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

खरंतर, पाण्याच्या बाष्पीभवनामुळे ढग तयार होतात हे पाठ्यपुस्तकात आपण शिकलो आहोत. पण जेव्हा गरम हवा आणि आर्द्रता वाढते तेव्हा ढगामधील पाण्याचं प्रमाण देखील वाढतं. अब्जावधी थेंब जेव्हा ढगांमध्ये विखुरले जातात तेव्हा जोरदार पाऊस पडतो. पण कधीकधी या ढगांमध्ये वेगाने वर चढणारा हवेचा स्तंभ निर्माण होतो. हा स्तंभ पाण्याच्या थेंबांना घेऊन वरच्या दिशेनं जातो. यामुळे आकाशात चक्रीय स्थिती तयार होऊन अनेक ढग एकत्र येतात.

हेही वाचा-Video : पुणेकरांनो, नदीचं पाणी वाढणार; खडकवासल्यातून विसर्गाला सुरुवात

याचा आकारमान आपल्या कल्पनेपेक्षा खूपच मोठा असतो. यातील पाण्याचे थेंब 3.5 मिमीहून मोठे असू शकतात. अनेक ढग एकत्र आल्यानंतर हवेचा स्तंभ जितक्या वेगानं वरच्या दिशेला गेलेला त्याच्यापेक्षा अधिक वेगान जमिनीच्या दिशेनं झेपावतो. टाकीचा खालचा भाग फुटल्याप्रमाणे जमिनीवर पाऊस कोसळतो. यालाच ढगफुटी म्हणतात. कमी वेळात खूप जास्त पाऊस झाल्यानं हे पाणी जमिनीत न मुरता जिकडे वाट मिळेल, त्या दिशेने पुढे सरकते. या पाण्याचा प्रवाह इतका जास्त असतो की, वाटेत येणारी झाडं, घरं, वाहनं देखील प्रवाहासोबत वाहून जातात.

Published by: News18 Desk
First published: July 23, 2021, 5:13 PM IST

ताज्या बातम्या