मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अशी होते चंद्राची निर्मिती; दुर्मिळ क्षण पहिल्यांदाच झाला कॅमेऱ्यात कैद

अशी होते चंद्राची निर्मिती; दुर्मिळ क्षण पहिल्यांदाच झाला कॅमेऱ्यात कैद

आपल्या सूर्यमालेपासून ३७० प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या एका ग्रहाला तीन उपग्रह असल्याचे वैज्ञानिकांना दिसून आले आहे. यामधील एक उपग्रह हा अजूनही तयार होतो आहे.

आपल्या सूर्यमालेपासून ३७० प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या एका ग्रहाला तीन उपग्रह असल्याचे वैज्ञानिकांना दिसून आले आहे. यामधील एक उपग्रह हा अजूनही तयार होतो आहे.

आपल्या सूर्यमालेपासून ३७० प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या एका ग्रहाला तीन उपग्रह असल्याचे वैज्ञानिकांना दिसून आले आहे. यामधील एक उपग्रह हा अजूनही तयार होतो आहे.

नवी दिल्ली 23 जुलै: ‘बिग बँग’ या महाविस्फोटातून हे विश्व निर्माण झाले, असे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे. अशा विस्फोटांमधूनच तारे आणि ग्रहांची निर्मिती झाली. तसेच एखाद्या ताऱ्याचा स्फोट झाल्यानंतर त्याठिकाणी ‘ब्लॅक होल’ तयार होते हेदेखील आपल्याला माहिती आहे. या सगळ्यानंतर आता पहिल्यांदाच वैज्ञानिकांना उपग्रहांची निर्मिती कशी होते हे पहायला मिळालं आहे. आपल्या सूर्यमालेपासून दूर असणाऱ्या एका सूर्यमालेत हा चंद्र तयार होतो आहे. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

आपल्या पृथ्वीला एकच उपग्रह, म्हणजेच चंद्र आहे. त्याप्रमाणेच आपल्या सूर्यमालेतील गुरू आणि शनि ग्रहांना बरेच उपग्रह आहेत. आपल्या सूर्यमालेपासून ३७० प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या एका ग्रहाला तीन उपग्रह असल्याचे वैज्ञानिकांना दिसून आले आहे. यामधील एक उपग्रह हा अजूनही तयार होतो आहे. चिलीमधील अटकामा वाळवंटात असणाऱ्या अल्मा वेधशाळेतील (ALMA Observatory) शक्तिशाली दुर्बिणीने या ग्रहाचे फोटो टिपले आहे. पीडीएस 70 असं या ग्रहाचं नाव आहे (Planet PDS 70). हा ग्रह आपल्या सूर्यमालेतील गुरू ग्रहाप्रमाणेच आहे. तसेच, या ग्रहाला आपल्या शनी ग्रहाप्रमाणे एक कडंही आहे. धूळ, वायू आणि लहान खडकांपासून बनलेल्या या कड्यामध्ये उजव्या बाजूला हा नवा तयार होत असलेला उपग्रह आहे असं या फोटोंमध्ये दिसत आहे. या उपग्रहाला वैज्ञानिकांनी पीडीएस 70 सी (PDS 70 C) असं नाव दिले आहे.

बापरे! इथे ब्रेडच्या पॅकेटसाठी द्यावे लागतात पोतं भरून पैसे; वजनावर घेतात नोटा

शनी किंवा पीडीएस 70 या ग्रहांच्या भोवताली असलेल्या या गोल कड्यांना सर्कमप्लॅनेटरी डिस्क म्हणतात. (Circumplanetary Disk) या कड्यांमुळेच उपग्रहांच्या निर्मितीची प्रक्रिया समजली असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. वैज्ञानिकांनी आतापर्यंत आपल्या सूर्यमालेबाहेरील 4,400 ग्रहांचा शोध लावला आहे. या ग्रहांना एक्सोप्लॅनेट (Exoplanets) म्हणतात. मात्र, उपग्रह तयार होण्याची प्रक्रिया पहिल्यांदाच दिसून आली आहे. ग्रॅनोबल विद्यापीठातील ॲस्ट्रोनॉमर, आणि हा उपग्रह शोधणाऱ्या पथकाच्या प्रमुख मरियम बेनिस्टी यांनी सांगितले, की हा एक अभूतपूर्व क्षण आहे. या शोधामुळे आता ग्रह तयार होण्याच्या आमच्या सिद्धांताला आणखी बळकटी मिळणार आहे. ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये 22 जुलैला हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.

पीडीएस 70 या ग्रहाचं वजन हे जवळपास आपल्या सूर्याएवढं आहे. हा ग्रह सुमारे 50 लाख वर्षे वयाचा असल्याचा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. पीडीएस 70 आणि त्याच्या या नव्या उपग्रहातील अंतर हे पृथ्वी आणि सूर्यादरम्यानच्या अंतरापेक्षा 33 पट अधिक आहे. युरोपियन सदर्न ऑब्जर्व्हेटरीचे वैज्ञानिक, आणि या संशोधनाबाबत लिहिणारे स्टेफानो फचिनी यांनी सांगितले, की पीडीएस-सी मोठ्या प्रमाणात धूळ आणि वायू आपल्याकडे ओढून घेत आहे.

बापरे! इथे ब्रेडच्या पॅकेटसाठी द्यावे लागतात पोतं भरून पैसे; वजनावर घेतात नोटा

हार्वर्ड स्मिथसोनियस सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्समधील ॲस्ट्रोनॉमर रिचर्ड रिग यांनी सांगितले, की अशा कड्यांमधून वायू आणि धूळ आपल्याकडे ओढून घेत ग्रह किंवा उपग्रह तयार होण्याच्या प्रक्रियेला कोअर अक्रीशन (Core Accretion) म्हणतात. या ग्रहाची, आणि त्याच्या चंद्रांची गुरुत्वाकर्षण शक्ती खूप जास्त असल्याचे रिग यांनी स्पष्ट केले. तसेच, या ग्रहाच्या बाजूने असलेल्या कड्यामध्ये एवढी धूळ, वायू आणि खडक आहेत, की आणखी तीन उपग्रहांची निर्मिती होऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

First published:

Tags: Moon, Viral news