जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Video : पुणेकरांनो, नदीचं पाणी वाढणार; खडकवासल्यातून विसर्गाला सुरुवात

Video : पुणेकरांनो, नदीचं पाणी वाढणार; खडकवासल्यातून विसर्गाला सुरुवात

Video : पुणेकरांनो, नदीचं पाणी वाढणार; खडकवासल्यातून विसर्गाला सुरुवात

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी सर्वात छोट्या खडकवासला (Khadakwasla dam) धरणातून पाण्याचा पहिला विसर्ग सोडण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 22 जुलै : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी सर्वात छोट्या खडकवासला (Khadakwasla dam) धरणातून पाण्याचा पहिला विसर्ग सोडण्यात आला आहे. धरण क्षेत्रातील पाण्याचा साठा 88 टक्क्यांचा (88 percent) पुढे गेल्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय़ घेण्यात आला. गुरुवारी (Thursday) संध्याकाळी 5 वाजल्यापासून हा विसर्ग सोडायला सुरुवात झाली. यामुळे शहरातील मुळा आणि मुठा या नद्यांमध्ये पाणी येणार आहे.

जाहिरात

खडकवासला धरण भरले पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी खडकवासला हे सर्वात छोटे धरण आहे. आजूबाजूच्या डोंगराळ परिसरातून तसेच सिंहगड परिसरातून येणारे पाणी खडकवासल्यात जमा होते.

त्यामुळे इतर धरणांच्या तुलनेत हे धरण लवकर भरते. धरणातील पाणीसाठी 85 टक्क्यांच्या वर गेल्यानंतर त्यातून पाण्याचा विसर्ग केला जातो. विशेषतः पावसाळ्यात हा नियम काटेकोरपणे पाळण्यात येतो. मोठा पाऊस झाला, तर धरणाच्या भिंतींवर अतिरिक्त भार येऊ नये, यासाठी हा विसर्ग करण्यात येतो.

जाहिरात

पर्यटकांची गर्दी दर पावसाळ्यात खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक गर्दी करत असतात. गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या उद्रेकामुळे पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. हे वाचा - LIVE: रत्नागिरी-खेडच्या शिरगावातला पूल गेला वाहून, 12 वाड्यांचा संपर्क तुटला मात्र तरीही या भागातून प्रवास करणारे पर्यटक काही वेळ या धरणाच्या परिसरात थांबून खडकवासला धरणाचं पाणी पाहून पुढे जाणं पसंत करतात. गेले दोन झालेल्या पावसामुळे हे धरणं भरलं असून पुणेकरांच्या वर्षभराच्या पाण्याची बेगमी व्हायला सुरुवात झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात