जोधपूर, 6 डिसेंबर : Sawai Madhopur: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (katrina kaif) यांच्या लग्नाच्या चर्चा जोरात सुरू आहेत. दोघेही 9 डिसेंबर (गुरुवार) रोजी लग्न (wedding) करणार आहेत. राजस्थानमधील (Rajasthan) सवाई माधवपूरमध्ये या लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जेव्हापासून लोकांना याची माहिती मिळाली तेव्हापासून सवाई माधवपूरबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले आहेत. सवाई माधवपूर हे महान चौहान शासक राणा हमीर देव चौहान आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यानासाठी ओळखले जाते, जे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण केवळ राष्ट्रीय उद्यानासाठीच नाही तर मंदिरांसाठीही प्रसिद्ध आहे. सवाई माधवपूरचा इतिहास रणथंबोर किल्ल्याभोवती फिरतो. विंध्य आणि अरावलीने वेढलेल्या रणथंबोर किल्ल्याचे सौंदर्य नजरेसमोर येते.
भारतात अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्या अतिशय खास आणि अद्वितीय आहेत. विशेषतः राजस्थानमध्ये अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्या शेकडो वर्षे जुन्या आहेत तर काही हजारो वर्षे जुन्या आहेत. येथील वास्तूंना भारताची शान, वैभव आणि वारसाही म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका वारशाची ओळख करून देणार आहोत.
या किल्ल्याची ताकद आणि दुर्गम मार्ग यामुळे शत्रूंपासून संरक्षण मिळाले, विशेषत: दिल्ली आणि आग्र्याचे राज्यकर्ते येथे पोहोचू शकले नाहीत. किल्ल्याचे मुख्य शासक राव हमीर चौहान होते ज्यांनी 1296 च्या सुमारास इथं राज्य केलं. किल्ल्याची सुंदर वास्तुशिल्प आणि तलाव या बांधकामातील कला, प्रेम आणि ज्ञान दर्शवतात. किल्ल्याचा प्रत्येक भाग हा भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाचे प्रतीक आहे. किल्ल्याच्या आत गणेश मंदिर, जैन मंदिर, बादल महाल, जानवारा-भंवरा अन्ननगर, दिल्ली दरवाजा, हमीर महाल, हमीर कचारी, तोरण द्वार, महादेव छत्री, सरंजामदार वाडा, 32 खांब असलेली छत्री आणि मशीद अशी अनेक ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे आहेत.
सवाई माधवपूर जिल्ह्यातील रणथंबोर किल्ला हा भारतातील महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला चंबळ नदी आणि बनास नदीने वेढलेला घनदाट जंगल आणि सात डोंगरांनी वेढलेला एक अभेद्य किल्ला आहे. अरवली पर्वतरांग आणि विंध्याचल पर्वतराजींच्या मिलनस्थळी बांधलेला रणथंबोर किल्ला जागतिक वारसामध्ये समाविष्ट आहे. जाणून घेऊया येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळांबद्दल.
रणथंबोर राष्ट्रीय उद्यान Ranthambore National Park
रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे सवाई माधवपूरचे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हे उद्यान देशातील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. 1981 मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. 392 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेले हे उद्यान अरावली आणि विंध्य टेकड्यांमध्ये पसरलेले आहे. येथे असलेल्या तीन तलावांजवळ हे वाघ दिसण्याची शक्यता अधिक आहे. वाघांशिवाय चित्ताही येथे राहतात. हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी येथे येतात. येथे जीप सफारीचा आनंद लुटता येतो.
त्रिनेत्र गणेश मंदिर Trinetra Ganesh Temple
गणेश मंदिर हे सवाई माधोपूरचे मुख्य आकर्षण केंद्र आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक या गणेश मंदिराला भेट देऊन आनंद आणि समृद्धीचा आशीर्वाद घेतात. हे मंदिर सवाई माधवपूरपासून 12 किमी अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध रणथंबोर किल्ल्याच्या आत बांधले आहे. हे भारतातील सर्वात जुन्या गणेश मंदिरांपैकी एक आहे, जे 5 व्या शतकात बांधले गेले.
श्री चौथ माता जी मंदिर Shri Chauth Mata Ji Temple
चौथ का बरवडा शहरात सवाई माधवपूरपासून 22 किलोमीटर अंतरावर श्री चौथ माताजीचे मंदिर आहे. राजस्थानातील प्रसिद्ध अकरा मंदिरांमध्ये समाविष्ट असलेले श्री चौथ भवानी मातेचे मंदिर राजपुताना शैलीतील पांढऱ्या संगमरवरीमध्ये साकारले आहे. या मंदिराची स्थापना महाराज भीमसिंह चौहान यांनी 1451 मध्ये बारवारा गावात अरवली पर्वत रांगेतील शक्तीगिरी पर्वतावर 1100 फूट उंचीवर केली होती. हे मंदिर राजस्थानातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अकरा मंदिरांपैकी एक आहे.
खंडार किल्ला Khandar Fort
मध्ययुगीन काळात बांधलेला तारागडचा खंडार किल्ला सवाई माधवपूरपासून 47 किमी अंतरावर आहे. या किल्ल्याच्या बांधकामाबद्दल स्पष्टपणे काहीही सांगता येत नाही. परंतु, हे निश्चित आहे की 12व्या शतकात हा किल्ला प्रगतीच्या शिखरावर होता. हा किल्ला प्राचीन भारतीय स्थापत्य शैलीत बांधला गेला आहे. त्याची भौगोलिक स्थिती अशी आहे की त्यावर हल्ला करणे शत्रूला कठीण होते. त्यामुळे या किल्ल्याला अजिंक्य किल्ला असेही म्हटले जात असे. या गडाखाली शिवाचे प्राचीन मंदिर असून याचा आकार चंद्रकोरी आहे. या गडाच्या माथ्यावर एक प्राचीन माँ जयंती मंदिर देखील आहे. या किल्ल्यावर अनेक कुंडे आणि मंदिरं आहेत.
अर्णेश्वर महादेव सप्त कुंड
भगवान शिवाला समर्पित असलेले हे मंदिर सप्त कुंडांसाठी ओळखले जाते. येथे अनेक लोकं पिकनिकसाठी येतात. दर महिन्याच्या चतुर्दशीला या ठिकाणी जत्रा भरते. त्याच बरोबर या मोठ्या तलावात सतत कोसळणारे गाईच्या मुखातून वाहणारे पाणी सर्वांना आकर्षित करते.
कसं पोहचणार, लग्नाला (विकी कौशल-कतरिना) नाही फिरायला? how to reach sawai madhopur from mumbai
Hampi | हंपी: इतिहास आणि पौराणिक कथा जिवंत करणारी नगरी!
हवाईमार्गे
मुंबई हे देशातील इतर प्रमुख शहरांशी नियमित विमानसेवेने जोडलेले आहे. मात्र, सवाई माधवपूर हे देशातील इतर प्रमुख शहरांशी नियमित फ्लाइटने जोडलेले नाही. इथं जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ जयपूरमध्ये (Jaipur International Airport) 105 किमी अंतरावर आहे.
रेल्वे
मुंबईहून सवाई मोधवपूर या ठिकाणी जाण्यासाठी भरपूर रेल्वे गाड्या आहेत. ज्या मुंबईतील अनेक भागातून तुम्हाला मिळू शकतात. रणथंभोर या रेल्वेस्थानकापर्यंत या मिळतील. इथं पोहचण्यासाठी तुम्हाला 15 ते 20 तासांचा कालवधी लागू शकतो.
रस्ता..
तुमचं स्वतःच वाहन किंवा सरकारी अथवा खाजगी बसने तुम्ही इथं पोहचू शकता. मुंबईपासून सवाई मोधपूर 1 हजार 151 किलोमीटर दूर आहे. इथं पोहचायला तुम्हाला 20 तासापर्यंतचा कालवधी लागू शकतो. राजस्थान खूपच सुंदर आहे. त्यामुळे या रोडट्रीपमध्येही तुम्हाला प्रवासा खूप आनंद घेता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Katrina kaif, Vicky kaushal