मराठी बातम्या /बातम्या /explainer /तेव्हा पहिल्यांदा माजी पंतप्रधानांच्या संरक्षणासाठी SPG कमांडोने झाडली होती गोळी!

तेव्हा पहिल्यांदा माजी पंतप्रधानांच्या संरक्षणासाठी SPG कमांडोने झाडली होती गोळी!

SPG Protection For Prime Minister : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या फिरोजपूरच्या रॅलीत संरक्षणात मोठी चूक राहिल्याने त्यांना दौरा मध्येच रद्द करावा लागला. यापूर्वीही अशाच एका घटनेत माजी पंतप्रधानांच्या संरक्षणात असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला (SPG) गोळीबार करावा लागला. यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 6 जानेवारी : पंजाब दौऱ्यात (Punjab Rally) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पंजाबमधील फिरोजपूर दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत गडबड झाल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. ही बाब गंभीर आहे. या घटनेनंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेवरुन (prime minister security) राजकारण तापलं आहे. यापूर्वीही अशाच एका गंभीर परिस्थितीत पंतप्रधानांचे संरक्षण करणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ला गोळीबार करावा लागला. यामध्ये एकाचा जीवही गेला होता. काय घडलं होतं त्या दिवशी चला जाणून घेऊया.

ही घटना 25 जानेवारी 2000 ची आहे. त्यांचे टार्गेट माजी पंतप्रधान चंद्रशेखर होते. घडलं असं की माजी पंतप्रधान चंद्रशेखर प्रवास करत असलेल्या रेल्वेच्या डब्यात विद्यार्थ्यांच्या एका गटाने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या संरक्षणासाठी एसपीजी तैनात होती. त्यावेळी माजी पंतप्रधानांनाही हे संरक्षण मिळत होते. आता या कायद्यात सुधारणा करण्यात आली. आता माजी पंतप्रधानांना पदावरून दूर झाल्यानंतर केवळ एक वर्षासाठी हे संरक्षण मिळते.

गाझीपूरच्या सआदत स्टेशनवर घडली घटना

सआदत स्थानकावर रेल्वे थांबली होती. हे स्टेशन उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे तणाव निर्माण झाल्याने गोंधळ झाला. विद्यार्थ्यांची गर्दी अधिकच अनियंत्रित झाली. त्यानंतर एसपीजीला गोळीबार करावा लागला. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. त्यानंतर चंद्रशेखर यांचे एसपीजी संरक्षण काढून घेण्यात आले. यामुळे तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकार टीका झाली होती.

देशात फक्त पंतप्रधानांना मिळते SPG संरक्षण! काय आहे विशेष?

चंद्रशेखर थोडक्यात वाचले

त्यानंतर माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यासोबत आणखी एक घटना घडली. साहिबाबाद येथे मगध एक्सप्रेसने नवी दिल्लीहून बलियाला जात असताना त्यांच्या खिडकीत मोठा आवाज झाला. हा अपघात 2003 साली झाला होता. चंद्रशेखर यांच्यावर कोणीतरी गोळी चालवली होती. जी एसी खिडकीमध्ये अडकल्याने त्यांचा जीव वाचल्याने एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांना सांगितले.

पंतप्रधानांच्या ताफ्यावर दगडफेक

ज्येष्ठ पत्रकार रमेश परिदा यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर 1993 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या ताफ्यावर बिहारमध्ये भाजपच्या लोकांनी दगडफेक केल्याची घटना नमूद केली आहे. तेव्हा बिहारमध्ये लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री होते. त्यावेळी कोणतीही तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली नाही. पंतप्रधानांचा काही वेळात पुढे गेला.

पंतप्रधानांची सुरक्षा कशी असते? 7 पॉइंट्समध्ये जाणून घ्या

मनमोहन सिंग यांच्या ताफ्यातील सुरक्षेतही त्रुटी

2006 मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्रिवेंद्रममध्ये त्यांच्या संरक्षणात त्रुटी राहिली होती. पण, त्यावेळी मनमोहन सिंग यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण झाला नाही.

First published:
top videos

    Tags: Pm modi, Police Security, Z security