
कोणत्याही ठिकाणी पंतप्रधानांच्या दौऱ्याची माहिती संबंधित राज्य सरकार आणि त्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना 15 दिवस ते एक महिना अगोदर पाठवली जाते. त्यानंतर, स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त राज्यातील उच्च अधिकारी एसपीजीच्या सहकार्याने सर्व व्यवस्था पार पाडतात. स्थानिक प्रशासन पंतप्रधानांचा मार्ग आणि पर्यायी मार्ग आधीच ठरवते. मात्र, यावर शिक्कामोर्तब एसपीजी अधिकारी करतात. यात ते बदलही करू शकतात.

पंतप्रधानांच्या दौऱ्यात राज्य प्रशासन आणि स्थानिक पोलीस बाह्य सुरक्षा घेरा म्हणून काम करतात. अंतर्गत सुरक्षा मंडळ पूर्णपणे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) कडे आहे. पंतप्रधानांना कोणत्या मार्गाने जायचे आहे हे 7 तास अगोदर ठरवले जाते. याअगोदरच तिथे सुरक्षेची तालीम केली जाते. वाटेत प्रत्येक 50-100 मीटर अंतरावर स्थानिक पोलीस आणि अधिकारी तैनात असतात. त्यांच्यासोबत गुप्तचर विभागाचे लोक असतात, जे क्षणोक्षणी नियंत्रण कक्षाला माहिती पाठवतात, जी एसपीजीलाही लगेच प्राप्त होते.

कधी कधी 4 ते 5 तासांपूर्वी पंतप्रधानांचा मार्ग बदलतो. पण बदललेला मार्गही आधीच ठरलेल्या पर्यायी मार्गानेच असतो. सुरक्षेचे वर्तुळ असे असते की, पंतप्रधान कुठेपर्यंत पोहोचले, याची माहिती नियंत्रण कक्षाला पोहोचते आणि नियंत्रण कक्ष वाटेत तैनात असलेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांपर्यंत पोहोचवतात. पोलीस ताफ्यासह धावणाऱ्या स्थानिक पोलिसांच्या पायलट कारला मार्गाचा ओके रिपोर्ट देत असते. ही माहिती एसपीजीलाही सातत्याने पाठवली जाते. दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्था आणि इतर व्यवस्था डीजीपी स्तरावरील पोलिस अधिकाऱ्याकडून मंजूर केल्यानंतरच पंतप्रधानांचा ताफा रस्त्याने जातो.

एसपीजीमध्ये पंतप्रधानांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सुरक्षा वर्तुळ असते. यामध्ये त्यांचे कमांडो आणि वाहने सतत फिरत असतात. पंतप्रधानांच्या ताफ्यात अनेक प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे. पंतप्रधानांच्या वाहनांच्या ताफ्यात म्हणजेच कारशेडमध्ये अनेक वाहनांचा समावेश असतो. ज्यामध्ये अॅडव्हान्स पायलट वॉर्निंग, टेक्निकल कार, व्हीव्हीआयपी कार, जॅमर व्हेइकल, त्यानंतर दोन व्हीव्हीआयपी कार आणि अॅम्ब्युलन्स आणि इतर गाड्यांचा समावेश आहे. एसपीजी कारकेडमध्ये समाविष्ट असलेल्या गाड्यांची कसून तपासणी करते.

पंतप्रधानांच्या ताफ्यात किमान पाच वाहने असतात. पहिले वाहन पायलट गाइड, त्यानंतर एसपीजीचे एस्कॉर्ट वाहन त्यापाठोपाठ पंतप्रधानांची गाडी, पुन्हा एसपीजीचे एस्कॉर्ट वाहनासह एक स्पेअर कारही सोबत असते. या सगळ्यांमागे स्थानिक एसएसपी, डीएम, एसआयबी आणि इतर अधिकाऱ्यांची वाहने धावतात. एसपीजी नेहमीच पंतप्रधानांना आपल्या वर्तुळात ठेवते.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तीन दिवस आधी ब्लू बुकनुसार एसपीजी सर्व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेते आणि त्या किती व्यवस्थित आहेत हे पाहते. संबंधित राज्याचे पोलीस, प्रशासन आणि गुप्तचर विभाग एकत्र येत सुरक्षेच्या सर्व बारीकसारीक गोष्टी पूर्ण करतात.. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी योजना निश्चित करण्यात आली आहे.

2006 मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही त्रिवेंद्रममध्ये सुरक्षेत चूक झाली होती. तर एकदा 25 जानेवारी 2000 रोजी पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान एसपीजी एजंटला गोळी चालवावी लागली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.