मराठी बातम्या /बातम्या /explainer /20 वर्षांनी अफगाणिस्तानात तालिबाननं पुन्हा काढलं डोकं वर; का, कधी आणि कोणी केली या संघटनेची स्थापना?

20 वर्षांनी अफगाणिस्तानात तालिबाननं पुन्हा काढलं डोकं वर; का, कधी आणि कोणी केली या संघटनेची स्थापना?

नुकतंच तालिबान या दहशतवादी संघटनेनं (Taliban in Afghanistan) अफगाणिस्तानातील (Afghanistan Crisis) एकेका प्रांतावर कब्जा करत संपूर्ण देशावरच आपला अंमल प्रस्थापित केला आहे. जागतिक स्तरावरून या दहशतवाद्यांचा निषेध होत आहे.

नुकतंच तालिबान या दहशतवादी संघटनेनं (Taliban in Afghanistan) अफगाणिस्तानातील (Afghanistan Crisis) एकेका प्रांतावर कब्जा करत संपूर्ण देशावरच आपला अंमल प्रस्थापित केला आहे. जागतिक स्तरावरून या दहशतवाद्यांचा निषेध होत आहे.

नुकतंच तालिबान या दहशतवादी संघटनेनं (Taliban in Afghanistan) अफगाणिस्तानातील (Afghanistan Crisis) एकेका प्रांतावर कब्जा करत संपूर्ण देशावरच आपला अंमल प्रस्थापित केला आहे. जागतिक स्तरावरून या दहशतवाद्यांचा निषेध होत आहे.

  काबूल, 16 ऑगस्ट: जगभरात कट्टरपंथी लोक आपला आग्रह, कट्टरता पसरवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करतात. अनेक धर्मांचे प्रचारक आपला धर्म जगभर पोहोचवण्यासाठी बळजबरीने धर्मांतर करणं, एखादा भूभाग आपल्या अंमलाखाली आणणं असे प्रकार करत असतात. यापैकी काही धर्मांचे अनुयायी हिंसा, बंदुका, गोळ्या, युद्ध माणसांच्या कत्तली अशा मार्गांनी जगाला आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करतात. आपली दहशत निर्माण करतात अशांनाच दहशतवादी म्हटलं जातं.

  भारताचा शेजारी असलेल्या अफगाणिस्तानातही (Afghanistan Crisis update) सध्या असाच दहशतवादाचा भयंकर प्रकार सुरू आहे. जगातल्या कुठल्या देशाने अनुभवला नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात या देशाने दहशतवादाचा फटका सोसला आहे. नुकतंच तालिबान या दहशतवादी संघटनेनं (Taliban in Afghanistan) अफगाणिस्तानातील (Afghanistan Crisis) एकेका प्रांतावर कब्जा करत संपूर्ण देशावरच आपला अंमल प्रस्थापित केला आहे. जागतिक स्तरावरून या दहशतवाद्यांचा निषेध होत आहे. पण अफगाणिस्तानचा इतिहास (Taliban History) पाहिलात तर तो असाच आहे.

  Afghanistan Crisis: काबूल विमानतळावरील गोळीबाराचा LIVE VIDEO

  जहीर शाह यांच्या काळात रशियासोबत असलेल्या अफगाणिस्तानाने आधुनिकतेचा अनुभव घेतला होता पण 1990 च्या दशकात तालिबाननेही (Taliban Latest News) या देशावर राज्य केलं आणि या देशाला मध्य युगात घेऊन गेलं. त्यानंतर अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यानंतर अमेरिकी लष्कर आणि नाटो सैन्याने अफगाणिस्तानला तालिबानच्या क्रूर कब्ज्यातून बाहेर काढलं होतं. त्यानंतरच्या 20 वर्षांत देश आता कुठे पायावर उभा राहत होता तेवढ्यात पुन्हा तालिबाननी देशावर कब्जा मिळवला आहे. एप्रिल 2021 ला अमेरिकेने जाहीर केलं होतं की सप्टेंबर 2021पर्यंत त्यांचं सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडेल. त्यानंतर तालिबानने हल्ले वाढवले आणि आज देशावर कब्जा मिळवला.

  तालिबानच्या राज्यात इस्लाम धर्मातला शरिया कायदा लागू केला जातो. अपराध्याला चाबकाचे फटके देणं, रस्त्यांवर माणसांची कत्तल, पुरुषांना दाढी वाढवण्याची सक्ती, महिलांना पुरुषांसोबत घराबाहेर जाण्याची परवानगी असणं, संगीत ऐकण्यावर बंदी अशा मध्य युगातल्या जाचक अटी त्या भागातील नागरिकांवर लागू होतात. आता तर अफगाणिस्तानावर तालिबानने कब्जा मिळवला असल्याने तिथले नागरिक घर-संपत्ती सोडून शेजारच्या देशात आश्रयाला जात आहेत.

  ''भारताशी चांगले संबंध हवेत'', तालिबानकडून भूमिका स्पष्ट

  तालिबान म्हणजे काय? 

  1994 मध्ये मुल्ला मोहम्मद उमर याने आपल्या समर्थकांसोबत तालिबान या संघटनेची स्थापना केली. अफगाणिस्तानातील गृहयुद्धात भ्रष्टाचार आणि होणाऱ्या अनंत अपराधांना आव्हान देण्यासाठी हा गट स्थापन झाला होता. तालिबानचा पुश्तू भाषेतील अर्थ आहे 'विद्यार्थ्यांनो', मुल्ला उमरचे विद्यार्थी किंवा चेले या अर्थी हा शब्द वापरला जातो.1980 च्या काळात अफगाणिस्तानातून सोव्हियत संघाला देशाबाहेर हकलणाऱ्या गटातील मुजाहिदीन बंडखोरांचा समावेश या गटात करण्यात आला होता. या गटाने 1996 पर्यंत अफगाणिस्तानातील बहुतांश भागावर पाच वर्षं राज्य केलं.

  11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमानांद्वारे दहशतवादी हल्ला करून ते उद्धवस्त केले गेले तेव्हा तालिबान संघटना जगाच्या पटलावर सगळ्यांना माहीत झाली. या हल्ल्याचा मास्टर माइंड अल कायदाचा ओसामा बिन लादेन होता असं मानलं गेलं. त्यानंतर 7 ऑक्टोबर 2001 ला अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानातील तालिबानवर लष्करी हल्ले करण्यात आले आणि डिसेंबर 2001 च्या पहिल्या आठवड्यात तालिबानची सत्ता संपुष्टात आली.

  20 वर्षांनी पुन्हा तालिबानने काढलंय डोकं वर

  2001 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातील डोंगरी भागांत तालिबानला सीमित केलं होतं पण 2021 मध्ये त्यांनी नाटो सैन्यावर हल्ला करून पुन्हा डोकं वर काढलं. 2015 मध्ये तालिबानने युद्धदृष्ट्या महत्त्वाच्या कुंडूज परिसरावर कब्जा करून आपण पुन्हा देशावर कब्जा करणार असल्याचे संकेत दिले होते. अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपला हस्तक्षेप कमी करायला सुरुवात केली आणि तालिबानची सत्ता अधिक मजबूत झाली. पाकिस्तानी दहशतवादी संघटना, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या मदतीने तालिबान अधिक मजबूत झालं.

  अफगाणिस्तानातून परत येण्याच्या प्रक्रियेत अमेरिकेने तालिबानशी शांततेची चर्चा सुरू केली. या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या पण त्या निष्फळ ठरल्या. तालिबानने अफगाणिस्तानातील शहरं आणि सैनिकी तळ काबीज करायला सुरुवात केली. एप्रिल 2021 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून परतणार असल्याचं जाहीर केल्यावर तर तालिबानने जोरदार आगेकूच सुरू केली. 90 हजार तालिबानी दहशतवाद्यांनी 3 लाखांहून अधिक अफगाणी लष्करी फौजेला नतमस्तक व्हायला भाग पाडलं. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी, त्यांचे सहकारी, अफगाणी सैन्याचे कमांडर अब्दुल रशीद दोस्तम आणि इतर अनेकांना ताजिकिस्तान आणि इराणमध्ये शरणार्थी म्हणून जावं लागलं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Afghanistan, Taliban