काबूल, 16 ऑगस्ट: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) परिस्थिती पुन्हा बदलली आहे. अफगाणिस्तानमधील जास्तहून अधिक जागांवर तालिबाननं कब्जा केला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपीत अशरफ गनी (Ashraf Ghani) देश सोडून गेलेत. काही नागरिक अफगाणिस्तान सोडून भारतात आलेत.
काबूल इंटरनॅशनल एयरपोर्टवर (Kabul International Airport) आता कमर्शियल फ्लाइट्सची (Flights) उड्डाण थांबवण्यात आलीत. विमानतळावर गोळीबार होत आहे. मोठ्या संख्येनं नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता विमानांची उड्डाण थांबवण्यात आल्यानं नागरिक आतमध्येच अडकून बसले आहेत.
Another day begins in Kabul, a sea of people rushing into the Kabul airport terminal. #AFG pic.twitter.com/UekpGJ2MWd
— Jawad Sukhanyar (@JawadSukhanyar) August 16, 2021
अफगाणिस्तानला पुन्हा इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान (आयइए) जाहीर करण्याची तयारी तालिबानने सुरु केली आहे. तालिबानने काबूलवर ताबा मिळवण्यास सुरुवात करत असताना नागरिकांनी पलायन करण्यासाठी विमानतळावर गर्दी केली. रविवारी संध्याकाळपासून नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आज सकाळी सुद्धा हजारो नागरिकांची गर्दी विमानतळावर आहे.
हेही वाचा- अफगाणिस्तान सोडल्यानंतर अशरफ गनींची FB Post, सांगितलं देश सोडण्याचं कारण
सध्या अफगाणिस्तानमध्ये देशातून पळ काढण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ सुरु आहे. अशातच विमानतळ परिसरात रात्रभर गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे.
Another Saigon moment: chaotic scenes at Kabul International Airport. No security. None. pic.twitter.com/6BuXqBTHWk
— Saad Mohseni (@saadmohseni) August 15, 2021
काबूलवर ताबा मिळवल्याने विमानांची उड्डाणेही रद्द झाली.त्यामुळे विमानतळावर हजारो लोकांची गर्दी झाली आहे.
NOW - Chaos at #Kabul airport: Hundreds want to leave Afghanistan and are panicking. Gunshots can be heard.pic.twitter.com/JW1jHRgcIq
— Disclose.tv (@disclosetv) August 15, 2021
रविवारी रात्री तालिबानने काबूलमधील अनेक भागांवर कब्जा मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर संपूर्ण शहरावर ताबा मिळवल्यास सुरुवात केली आहे. काबूलमधील हमीत करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजारो लोकांची गर्दी पहायला मिळाली. तालिबाननं अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे देशाबाहेर पडण्यासाठी हवाईमार्ग हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे.
काबूलमधून एअर इंडियाचा विमान दिल्लीत दाखल
भारतातील दूतावासात काम करणारे कर्मचाऱ्यांसहीत अफगाणिस्तानात राहणाऱ्या 129 भारतीय आणि इतर प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं एक विशेष विमान भारतात दाखल झालं आहे. अफगाणिस्तानमध्ये भारतानं आपले दूतावास बंद केले आहे. भारतासह इतर देशांनीही अफगाणिस्तानमधील आपले दूतावास बंद करुन कर्मचाऱ्यांना माघारी बोलावले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Kabul, Taliban