काबूल, 16 ऑगस्ट: अफगाणिस्तानचे (afghanistan) राष्ट्रपती अशरफ गनी (Afghan President Ashraf Ghani ) यांनी देश सोडल्यावर तालिबानी (Taliban) दहशतवादी काबूल (Kabul)मध्ये घुसले. तालिबानी दहशतवाद्यांनी अवघ्या आठवडाभरात जवळपास संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. त्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आहे. दरम्यान आता समोर आलेल्या माहितीनुसार, तालिबानला भारताशी (India)चांगले संबंध ठेवायचे असल्याचं बोलत आहे. आजतकनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
आज तकाशी झालेल्या संवादादरम्यान तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, त्यांना भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. अफगाणिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक पूर्णपणे सुरक्षित असतील आणि कोणाला घाबरण्याची गरज नाही.
तालिबानचे प्रवक्ते Zabihullah Mujahid म्हणाला की, आम्हाला भारतासोबत चांगले आणि मजबूत संबंध हवे आहेत. सर्व राजनयिक येथे सुरक्षित असतील. कोणालाही देश सोडण्याची गरज नाही. आता एकीकडे तालिबानला भारताशी चांगले संबंध हवे आहेत दुसरीकडे भारताचे पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या संघर्षावर काही बोलायचे नाही.
राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी सोडला देश, अफगणिस्तानवर सत्तास्थापनेच्या समीप तालिबान
भारत आणि पाकिस्तानाच्या वादात हस्तक्षेप करायचं नाही आहे. दोन्ही देशांना त्यांच्या समस्या आहेत. यामध्ये तालिबान कोणतीही भूमिका बजावणार नाही, असंही तालिबानच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे.
तालिबान लवकरच करणार घोषणा
आता तालिबान लवकरच संपूर्ण अफगाणिस्तानवर आपल्या राज्याची औपचारिक घोषणा करणार असल्याचं समजतंय. हा दहशतवादी समूह राष्ट्रपती भवनातून लवकरचइस्लामिक एमिरेट ऑफ अफगानिस्तानची घोषणा करेल, असं एपी या वृत्तसंस्थेनं तालिबानच्या एका नेत्याच्या हवाल्याने म्हटलं आहे. तालिबानची राजवट असताना सप्टेंबर 2001 पर्यंत हेच देशाचे नाव होते.
At present, we are completing a series of steps to secure the Hamid Karzai International Airport (in Afghanistan) to enable the safe departure of US and allied personnel from Afghanistan via civilian and military flights: US Dept of State & Dept of Defence in a joint statement
— ANI (@ANI) August 16, 2021
तालिबानी नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एपीला ही माहिती दिली. कारण त्याला माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नाही.
तालिबानी दहशतवाद्यांनी रविवारी काबूलमध्ये प्रवेश केला. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याने आता अफगाणिस्तान प्रशासनाच्या हाती फारसे काही उरलेले नाही. महिलांचे अधिकार हिरावून तालिबान पूर्वीप्रमाणे अमानुष राजवट सुरू करेल, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Taliban