जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / Sulli Deals ते Bulli Bai व्हाया GitHub काय आहे प्रकरण? जिथे मुस्लिम महिलांच्या फोटोंवर लावली गेली बोली

Sulli Deals ते Bulli Bai व्हाया GitHub काय आहे प्रकरण? जिथे मुस्लिम महिलांच्या फोटोंवर लावली गेली बोली

Sulli Deals ते Bulli Bai व्हाया GitHub काय आहे प्रकरण? जिथे मुस्लिम महिलांच्या फोटोंवर लावली गेली बोली

Bulli Bai: रिपॉजिटरी होस्टिंग सेवा गिटहब (GitHub) वर तयार केलेल्या वादग्रस्त मोबाइल अॅपने मुस्लिम महिलांच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो अपलोड केल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. ‘बुल्ली बाई’ (Bulli Bai) नावाचे हे अॅप मुस्लिम महिलांच्या फोटोंचा कथित लिलाव करताना आढळून आले. यापूर्वी सुल्ली डील्स (Sulli Deals) नावाचे असेच एक अॅप वादात सापडले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 जानेवारी : बुल्लीबाई (Bulli Bai) हे नाव समोर आल्यानंतर सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वास्तविक एका वादग्रस्त अॅपवर मुस्लिम महिलांचे छायाचित्र परवानगीशिवाय अपलोड करण्यात आले आहे. यासोबत फोटोंसोबत किंमत टॅग - डील ऑफ द डे असे लिहिले आहे. म्हणजेच महिलांच्या लिलावासाठी हा किमतीचा टॅग लावण्यात आला आहे. मागीलवर्षी सुल्ली डील्स (Sulli Deals) नावाने असाच प्रकार उघडकीस आला होता. बुल्ली बाई, सुल्ली डील्स आणि गिटहब (GitHub) म्हणजे काय? याबद्दल आता विस्ताराने माहिती घेऊयात. काय आहे प्रकरण? रिपॉजिटरी होस्टिंग सेवा गिटहब (GitHub) वर तयार केलेल्या वादग्रस्त मोबाइल अॅपमध्ये मुस्लिम महिलांच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो अपलोड केल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. ‘बुल्ली बाई’ (Bulli Bai) नावाचे हे अॅप मुस्लिम महिलांच्या फोटोंचा कथित लिलाव करताना आढळून आले. काही महिन्यांपूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी असेच एक अॅप ‘सुली डील’ (Sulli Deal) तयार केले, ज्यामध्ये शेकडो मुस्लिम महिलांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून घेतलेली छायाचित्रे अपलोड आणि लिलाव करण्यात आली. सोशल मीडियावर नाराजी पसरल्यानंतर हे अॅप काढून टाकण्यात आले होते. यानंतर एका महिला पत्रकाराने सोशल मीडिया आणि इंटरनेटवर मुस्लिम महिलांचा छळ आणि अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध त्वरित एफआयआर नोंदवून तपास करण्याची मागणी केली आहे. तिच्या वतीने तक्रारीत म्हटले आहे, की “आज सकाळी मला हे समजल्यानंतर धक्का बसला की bullibai.github.io नावाच्या वेबसाइट/पोर्टलवर माझा एक आक्षेपार्ह फोटो आहे, ज्यामध्ये छेडछाड करण्यात आली आहे. यावर तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे. कारण, माझ्यासारख्या स्वतंत्र महिला आणि पत्रकारांना त्रास देणे हा यामागील उद्देश आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्याचं Whatsapp हॅक करून मागत होते पैसे, असे शोधले गुन्हेगार गिटहब काय आहे? What is Github एका रिपोर्टनुसार, गिटहब (GitHub) एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. म्हणजेच यूजर्स याद्वारे अॅप्स तयार आणि शेअर करण्याची परवानगी देतात. GitHub वरील कोणीही वैयक्तिक किंवा प्रशासकीय नावाने अॅप तयार करण्यास सक्षम आहे. तसेच लोक GitHub वर त्यांचे अॅप देखील विकू शकतात. बुल्ली बाई काय आहे? What Is Bullibai बुल्ली बाई (Bully by) गिटहब (GitHub) नावाच्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सोशल मीडियावरील लोकांच्या माहितीनुसार, हे अॅप उघडताच एका मुस्लिम महिलेचा चेहरा समोर येतो. याला बुल्ली बाई असे नाव देण्यात आलं आहे. किंमत टॅगसह मुस्लिम महिलांचे आक्षेपार्ह फोटो शेअर केले आहेत. यासोबतच बुल्लीबाई या ट्विटर हँडलवरूनही त्याचा प्रचार केला जात आहे. या अॅपद्वारे मुस्लिम महिलांना बुक करता येईल, असे ट्विटर हँडलवर लिहिले आहे. वडिलांचं धाकट्या मुलावर होतं प्रेम, रागावलेल्या थोरल्याने केला खून सुल्ली डील्स (Sulli Deals) 4 जुलै 2021 रोजी, अनेक ट्विटर (Twitter) वापरकर्त्यांनी सुल्ली डील्स (Sulli Deals) नावाच्या अॅपचे स्क्रीनशॉट शेअर केले जे GitHub वर अज्ञात गटाकडून पोस्ट करण्यात आले होते. अॅपवर “सुली डील ऑफ द डे” अशी टॅगलाइन होती आणि हे मुस्लिम महिलांच्या फोटोंसह पोस्ट करण्यात आले होते. ‘सुल्ली’ हा महिलांबद्दल वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे. यामुळे बुल्ली बाई सारखे नाव असलेले सुली डील्स अॅपही वादात सापडले होते. ते गिटहबवरच तयार केले गेले होते. सोशल मीडियावरून घेतलेल्या मुस्लिम महिलांचे फोटो या अॅपवर अपलोड करण्यात आले होते. वादामुळे हे फोटो नंतर अॅपवरून हटवण्यात आले. बुल्ली बाई अॅप देखील असेच आहे. जिथे महिलांचे फोटो शेअर करून प्राइस टॅग लावले गेले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात